diabetes  sakal
आरोग्य

Health Care Tips : घराच्या घरी व्यायाम करा अन् मधुमेहावर नियंत्रण मिळवा! जाणून घ्या

तुमच्या जीवनशैलीत काही गोष्टींचा समावेश करून शुगर नियंत्रणात ठेवता येऊ शकतं.

सकाळ डिजिटल टीम

व्यायाम करणे प्रत्येकासाठी चांगले आहे. पण जर एखाद्याला मधुमेहाचा त्रास असेल तर त्याच्यासाठी व्यायाम करणे अधिक महत्त्वाचे ठरते. जर एखाद्याला मधुमेह असेल आणि त्याने व्यायाम केला तर त्याचे मोठे फायदे होऊ शकतात.

जसे की, रक्तातील साखर आणि रक्तदाब कमी करणे, ऊर्जा वाढणे आणि चांगली झोप येण्यास मदत करणे इ. टाइप 2 मधुमेह असलेल्या लोकांना व्यायामाचा खूप फायदा होतो. त्यामुळे रुग्णांनी रोज व्यायाम करावा. आता जाणून घ्या कोणत्या व्यायामामुळे मधुमेह कमी होण्यास मदत होते.

डान्स

जर एखाद्या व्यक्तीने आठवड्यातून 3 दिवस 25 मिनिटे डान्स केले तर ते रक्तातील साखर आणि तणाव कमी करण्यास खूप मदत करू शकते. यासोबतच कॅलरीजही बर्न होतील ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होईल. लठ्ठपणामुळे मधुमेहाचा धोका वाढतो.

बागकाम

बागकाम हा एक व्यायाम आहे. ज्यामुळे तुमच्या शरीराला खूप फायदे होतात. कारण तुमच्या सांध्यांवर खूप ताण येत असतो. तुम्ही अनेकदा उठता-बसता किंवा खड्डा खोदता. या सर्व अ‍ॅक्टिव्हिटीज एरोबिक्स प्रकारच्या अ‍ॅक्टिव्हिटीज आहेत. यामुळे तुमची ताकद टिकून राहते. याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे झाडांसोबत राहिल्याने तुमची तणावाची पातळी कमी होते.

योग आणि प्राणायाम

या दोन्ही गोष्टी केल्याने तुमचा लठ्ठपणा, ब्लड शुगर लेव्हल नियंत्रित राहते. यामुळे तुमच्या शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत होते. लक्षात ठेवण्यासारकी गोष्ट म्हणजे, तुम्ही नेहमी योग्य योग शिक्षकाकडून शिकून घेतलं पाहिजे. कारण चुकीचा योग करून उपयोग नाही.

पायऱ्या चढणे

घराच्या किंवा ऑफिसच्या पायऱ्या चढण्यानेही रक्तप्रवाह वाढतो. त्यामुळे शरीरात जास्त प्रमाणात इन्सुलिन तयार होते. ज्यामुळे तुमची ब्लड शुगर लेव्हल नियंत्रित राहते. पण ज्या रुग्णांना सांधेदुखी किंवा कोणतीही समस्या असेल त्यांनी हा व्यायाम अजिबात करू नये. कारण त्याचा तुमच्या सांध्यांवर खूप प्रभाव पडतो आणि अनेक वेळा असं करण्यात आणखी त्रास होऊ शकतो.

Metro Project : पुणे, पिंपरी चिंचवडमधील मेट्रो प्रकल्पाला राज्य सरकारचा बूस्टर

Pune Ganpati Viarjan : गणेश विसर्जन सोहळ्यास सकाळी साडेनऊ वाजता प्रारंभ; ढोलताशा पथकांवर मर्यादा, स्थिर वादनास बंदी

Latest Maharashtra News Updates : कोकणात गेलेल्या मुंबईकरांचा परतीचा; मुंबई गोवा महामार्गावर वाहतुक कोंडी

Irfan Pathan: 'चाहत्यांमध्ये वाद की पीआरचं कारस्थान?', धोनीवर हुक्का पिण्याचा आरोप करणाऱ्या Viral Video वर इरफानची पोस्ट चर्चेत

Navi Mumbai Crime: आदेश मोडून दिघ्यात परतला, हद्दपारीचा आरोपी पोलिसांच्या पुन्हा जाळ्यात

SCROLL FOR NEXT