diabetes causes and symptoms 
आरोग्य

Diabetes: मधुमेहाचा सेक्स लाईफवर होऊ शकतो गंभीर परिणाम; पुरूषांना नपुंसकत्वाचा धोका

डायबेटिस असणाऱ्या व्यक्तींमध्ये लो सेक्स ड्राईव्ह दिसून येत असल्याचं डॉक्टरांनी सांगितले आहे.

Sudesh

मधुमेहाचा आपल्या शरीरावर मोठ्या प्रमाणात परिणाम होतो हे सर्वांनाच माहिती आहे. मात्र, यामुळे आपल्या सेक्स लाईफवर काय परिणाम होतो याबाबत आपल्याकडे अगदी कमी बोललं जातं. हाय ब्लड शुगर आणि टाईप २ डायबेटिस या दोन्हीमुळे महिला व पुरूषांच्या लैंगिक आरोग्यावर दुष्परिणाम होत असल्याचं रिसर्चमध्ये समोर आलं आहे.

मधुमेहाचा थेट परिणाम होऊन किडनीचे विकार, हृदयविकार, वजन वाढणे अशा बऱ्याच समस्या उद्भवतात. मात्र त्यासोबतच, लैंगिक आरोग्यावर देखील याचा गंभीर परिणाम (Diabetes effect on sexual health) होतो. डायबेटिस असणाऱ्या व्यक्तींमध्ये लो सेक्स ड्राईव्ह दिसून येत असल्याचं डॉक्टरांनी सांगितले आहे.

हाय ब्लड शुगर

मधुमेह आणि लैंगिक आरोग्य यामध्ये महत्त्वाचा फॅक्टर म्हणजे हाय ब्लड शुगर असलेल्या लोकांमध्ये लिबिडो कमी प्रमाणात दिसून येतो. म्हणजेच, डायबेटिस असणाऱ्या व्यक्तींना सेक्सची इच्छाच कमी होते. तसंच, लैंगिक समाधान आणि आनंद मिळवण्याचा स्तरही अगदी कमी असतो, असं रिसर्चमध्ये दिसून आलंय.

पुरूषांना नपुंसकतेचा धोका

अमेरिकन डायबेटिस असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार, डायबेटिस असणाऱ्या पुरूषांमध्ये इरेक्टाईल डिस्फंक्शन (Diabetes and erectile dysfunction) आणि प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन अशा समस्या दिसून आल्या. तसेच, मधुमेहामुळे हार्मोन्सच्या फ्लोमध्ये अडथळा येण्याचा, आणि नसांना इजा पोहोचण्याचा देखील धोका असतो. यामुळेही लैंगिक क्षमतेवर परिणाम होतो.

महिलांमध्ये काय धोके?

मधुमेह असलेल्या महिलांमध्ये वेगाने वजन वाढणे, आणि मोठ्या प्रमाणात हार्मोनल इम्बॅलन्स दिसून येतो. यामुळे पुढे पीसीओएसची लक्षणं दिसून येतात. याचा सेक्शुअल हेल्थवर परिणाम होतो. लैंगिक इच्छा कमी होणे, व्हजायनल ड्रायनेस आणि इतर लक्षणंही यामुळे दिसून येतात.

या गोष्टी हाय ब्लड शुगर लेव्हल असणाऱ्या व्यक्तींसोबतच, टाईप २ डायबेटिस असणाऱ्या व्यक्तींमध्येही दिसून येतात. केवळ या आजारामुळेच नाही, तर कित्येक वेळा मधुमेहाच्या औषधांमुळेही ही लक्षणं दिसून येतात. त्यामुळे डॉक्टरांना भेटून समस्येचे मूळ ओळखणे गरजेचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Explainer: फडणवीस आणि शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका; पण राज ठाकरेंसाठी 'मवाळ भूमिका', नेमकं समीकरण काय? वाचा सोप्या शब्दात

IND vs ENG 2nd Test: २६९, १००* ! शुभमन गिलचे शतक अन् ५४ वर्षांपूर्वीचा विक्रम उद्ध्वस्त; एकाही भारतीयाला नव्हता जमला हा पराक्रम

SBI Bank Manager Viral Video : ''तुला iPhone देईन, शारीरिक संबंध ठेव..’’ म्हणत, महिला कर्मचारीशी घृणास्पद कृत्य करणाऱ्या SBI व्यवस्थापकाचा भांडोफोड!

Yavatmal News: लाखो विद्यार्थ्यांचा खडतर प्रवास! शिक्षणासाठी खेड्यातून ‘अप-डाऊन’, सवलतीच्या पासचा दिलासा पण...

Pune Crime : ४० दिवसांच्या मुलीची साडेतीन लाखांत विक्री; आई-वडिलांसह सहा जणांना अटक

SCROLL FOR NEXT