Diet In Pregnancy
Diet In Pregnancy  esakal
आरोग्य

Pregnancy Diet : बाळाच्या आगमनाची चाहूल लागताच गर्भवती महिलांनी सुरू करावा हा फायबरयुक्त आहार

सकाळ ऑनलाईन टीम

Diet In Pregnancy : बाळाच्या आगमनाची चाहूल लागताच संपूर्ण कुटुंब आनंदी होते. परंतु गरोदरपणाचा काळ आई होत असलेल्या स्त्रीसाठी परीक्षा घेणारा असतो. शारीरिक व मानसिक दोन्ही प्रकारचे बदल ती अनुभवत असते.

शारीरिक बदलांमध्ये पचनाची सर्वाधिक समस्या या काळात असते. पोटाशी संबंधित समस्या निर्माण होतात. अशावेळी गर्भवतींनी आहारात द्रव पदार्थ, फायबरयुक्त आहार व भरपूर पाणी प्यावे. दिवसातून २० मिनिटे व्यायाम फायदेशीर आहे, असे निरिक्षण स्त्री व प्रसूतीरोग तज्ज्ञांनी नोंदविले आहे.

भरपूर पाणी पिणे गरजेचे

पुरेशा प्रमाणात पाणी पिल्यानेही अनेक आजारांपासून रक्षण होते. पाणी आणि द्रव पदार्थ प्यायल्याने गरोदरपणाच्या काळात अपचनापासून आराम मिळतो. गर्भवतींनी दिवसातून जास्तीत जास्त पाणी पिण्याचा प्रयत्न करावा. मात्र पाणी स्वच्छ आणि सुरक्षित असावे.

घ्यावा फायबरयुक्त आहार

जेवणात फायबरयुक्त आहार घ्यावा, जेणेकरून शरीरात मेटाबोलिझम वाढते. गर्भवती मातेने आहारात मटार, भाज्या, कडधान्ये यांचा समावेश करावा. यात फायबर असते. यामुळे पचन तंत्राला सहजपणे अन्न पचवण्यास मदत होते. बद्धकोष्ठतेची समस्या निर्माण होत नाही.

याशिवाय एकाच वेळेस खूप जास्त अन्न खाण्यापेक्षा थोड्या थोड्या वेळाने कमी कमी खावे. एकाच वेळी जास्त अन्न खाल्ल्याने पचन तंत्राला तो आहार पचवण्यास मेहनत करावी लागते.

व्यायामावर विशेष लक्ष

गरोदरपणात शरीराला सक्रीय ठेवणे गरजेचे आहे. यामुळे पचन तंत्र सक्षम होण्यास खूप मदत मिळते. व्यायामामुळे पोटाचे स्नायू योग्य प्रकारे काम करू लागतात. यामुळे बद्धकोष्ठता आणि गॅस सारख्या समस्यांपासून सुटका मिळते. दिवसातून २० मिनिटे व्यायाम करणेसुद्धा या काळात फायदेशीर ठरू शकते आणि नियमित व्यायाम केल्याने पचन मार्गात कोणताही अडथळा निर्माण होत नाही. (Pregnancy)

गर्भवतींनी आहार-विहाराकडे विशेष लक्ष द्यावे. आहारात मोड आलेली कडधान्ये, फळे, हिरव्या पालेभाज्यांचा समावेश मुबलक असावा. लोहयुक्त आहार अधिक बरा. तेलकट तुपकट पदार्थ टाळावे. हलकाफुलका व्यायाम नियमित २० मिनिटे तरी करावा. आवश्‍यक तीच योगासने करावी. शारीरिक मेहनत टाळावी. आनंदी व तणामुक्त राहावे.

-डॉ. सुषमा देशमुख, स्त्री व प्रसूतीरोग तज्ज्ञ, नागपूर.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Durgadi Fort : शिंदे-ठाकरे गटाचे दुर्गाडी देवीच्या पायथ्याशी घंटानाद आंदोलन; किल्ल्याजवळ तणावाचं वातावरण, काय आहे कारण?

Jammu-Kashmir Encounter: सुरक्षा दल अ‍ॅक्शन मोडमध्ये! काश्मीरमध्ये एका दहशतवाद्याला केलं ठार, शोध मोहीम सुरू

Latest Marathi Live Updates : शिंदे - ठाकरे गटाचे दुर्गाडी देवीच्या पायथ्याशी घंटानाद आंदोलन

Laxman Hake : लेखी आश्वासनाशिवाय उपचार नाही,उपोषणकर्ते ओबीसी नेते हाकेंची भूमिका;प्रकृती खालावली

Sant Nivruttinath Palkhi : निवृत्तिनाथ पालखी सोहळ्यात राज ठाकरे सहकुटुंब सहभागी होणार! त्र्यंबकेश्‍वराचे घेणार दर्शन

SCROLL FOR NEXT