Diet Tips esakal
आरोग्य

Diet Tips : मसल्स बनवायचेत? हा घ्या डाएट प्लॅन

मसल्स वाढवून आकर्षक बॉडी बनवण्याची अनेकांची इच्छा असते. पण त्यासाठी नेमका कसा आहार घ्यावा, डाएट कसं असावं हे माहीत नसतं. तुमच्या याच प्रश्नांचे उत्तर इथे मिळेल.

सकाळ डिजिटल टीम

जेंव्हा स्नायू बळकट करण्याचा विषय येतो तेंव्हा तुमचा आहार हा तुमच्या ट्रेनिंग एवढाच महत्वाचा असतो. अशावेळी न्यूट्रीशनची चिंता वाटू शकते. जर तुम्हाला मसल गेन विषयी काही बेसिक गोष्टी समजून घ्यायच्या असतील त्यासाठी डाएट प्लॅनचा विचार करत असाल तर तो तुमच्या गरजांनुसार असावा.

तुम्ही मसल्स गेन करत असाल किंवा वजन कमी करत असाल तर या सर्व कॅलरी किंवा मॅक्रोज वर अवलंबून असतो. जर तुम्ही काही वेळापासून ट्रेनिंग घेत असाल तर मसल्स गेनचे रहस्य हे बर्न होणाऱ्या अधिक कॅलरीज घेणे यात आहे.

जेंव्हा तुम्ही एक होल फूड डाएट निवडता तेंव्हा सर्व धान्य, फळ, भाज्या, शेंगादाणे असे पदार्थ आवश्यक आहे. हे तुमचे प्रोटीन स्रोत आहेत.

मसल्स बनवण्यासाठी होल फूड डाएट

चौकस आहाराचा विचार करतो तेंव्हा आहाराचे प्रमाण आणि वेळा फार महत्वाच्या असतात. रोजचे पोषकतत्वापर्यंत पोहचण्यासाठी ६ मील करावे लागतील.

१ मीलः केळ, ओवा, काकडी, हिरवे सफरचंद, लिंबाचा रस, बदाम दूध, केळ्यासोबत प्रोटीन शेक.

२ मीलः तळलेल्या टोफूचे १-२ सर्विंग्ज, २ कप ओट मील, २ मोठे चमचे शेंगादाणे किंवा बदाम लोण्यासोबत खा.

३ मीलः खपली गव्हाची भाजी लावून केलेले सँडविच, आमटी सोबत अर्धी चपाती, स्प्राऊट्स, टोमॅटो व पनीर किंवा टोफू सोबत गडद हिरव्या रंगाचे सॅलेड खा.

४ मीलः २ कप दलिया चिमुटभर दालचीनी घलून, पीनट बटर सोबत १ सफरचंद, प्रोटीन शेक.

५ मीलः राजगीरा व ताज्या भाज्यांचे सॅलेड किंवा उकडलेल्या भाज्यांसोबत डाळीचे सूप, ग्रील्ड टोफू उकडलेल्या भाज्यांसोबत व मूठभर शेंगदाणे.

६ मीलः बनाना शेक किंवा प्रोटीन शेक, एक वाटी ब्रोकोली सूप

पहिले मील उठल्याबरोबर घ्यावे. आणि शेवटचे झोपण्यापूर्वी १-२ तास आधी. बाकी दिवसभरात २-३ तासांच्या अंतराने घ्यावे.

जर डाएट प्लॅन सुरू ठेवायचा असेल तर सोया असणारे प्रोटीन शेक निवडावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

History! फुटबॉल खेळणाऱ्या देशाचे क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये पदार्पण; इटलीचा संघ T20 World Cup 2026 स्पर्धेसाठी पात्र ठरला

IND vs ENG 3rd Test: शुभमन गिलने मोडला 'विराट' विक्रम! लोकेश राहुलच्या फिफ्टीने लढवला किल्ला, रिषभ पंत दुखापतीतून सावरला

IND vs ENG 3rd Test: OUT or NOT OUT? जो रूटने अफलातून झेल, नोंदवला वर्ल्ड रेकॉर्ड; राहुल द्रविडचा विक्रम मोडला, पण रंगलाय वाद

World Heritage status: अभिमानाची बाब! शिवरायांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या यादीत समावेश

Shambhuraj Desai : संजय राऊतांच्या वक्तव्याची पर्यटनमंत्री शंभुराज देसाईंनी उडवली खिल्ली

SCROLL FOR NEXT