Brain Eating Amoeba esakal
आरोग्य

Brain Eating Amoeba : पालेभाज्यांवरील रोगास अमिबा जबाबदार; सेंद्रिय भाजीपाला खाणाऱ्यांनो सावध व्हा

सेंद्रिय पालेभाज्यांवर रोगकारक अमीबा स्यूडोमोनास, साल्मोनेला सारख्या मानवी रोगजनकांमुळे मानवी आरोग्यास धोका असल्याचे सांगितले गेलेय

सकाळ ऑनलाईन टीम

Brain Eating Amoeba : कुठलाही नवा आजार किंवा व्हायरस पसरू लागला की जनतेची आरोग्यविषयक चिंता वाढते. आता परत एक चिंता वाढवणारी बाब उघडकीस आली आहे. यात सेंद्रिय पालेभाज्यांवर रोगकारक अमीबा स्यूडोमोनास, साल्मोनेला सारख्या मानवी रोगजनकांमुळे मानवी आरोग्यास धोका असल्याचे सांगितले गेलेय.

लिस्बन, पोर्तुगाल (२३-२६ एप्रिल) येथे या वर्षीच्या युरोपियन काँग्रेस ऑफ क्लिनिकल मायक्रोबायोलॉजी अँड इन्फेक्शियस डिसीजेस (ECCMID) मध्ये सादर केले जाणारे नवीन संशोधन सूचित करते की सेंद्रिय पालेभाज्यांवर राहणारे रोगकारक अमीबा स्यूडोमोनास, साल्मोनेला सारख्या मानवी रोगजनकांना आश्रय देऊ शकतात. (Health)

कच्च्या पालेभाज्या खाणाऱ्यांवर याचा विशेष प्रभाव होऊ शकतो. आरोग्याच्या खबरदारीच्या दृष्टीने सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या फळे आणि भाज्यांची मागणी वाढत चाललीय. मात्र अमीबा स्यूडोमोनास, साल्मोनेला सारख्या रोगजनकांमुळे भाज्या धुताना त्यातील जंतू तुमच्या शरीरात जाण्याचा धोका वाढतो.

तुमच्या रोजच्या वापरातला भाजीपाला अमिबाने दूषित होऊ शकतो. तुमच्या पचनशक्तीवर त्याचा परिणाम होतो. याचे प्रमाण तपासण्यासाठी संशोधकांनी एक मेटाजेनोमिक तंत्र वापरले जे FLA मधील सर्व जीवाणूंमध्ये DNA ओळखते. प्रत्येक नमुन्यात कोणत्या प्रकारचे सूक्ष्मजंतू (मायक्रोबायोम) आहेत हे निर्धारित करण्यासाठी परिणामांचे मूल्यांकन केले गेले.

या संशोधनात फ्लेव्होबॅक्टेरियम (10% भाजीपाला नमुन्यांमध्ये आढळतात) आणि स्यूडोमोनास (10%) हे मुख्य जिवाणू प्रकार ओळखले गेले, ज्यापैकी काही जंतूके मानवांमध्ये रोग निर्माण करत नाहीत. तर नमुन्यांपैकी एक तृतीयांश (34%) मध्ये 52 संभाव्य रोग-उद्भवणारे जीवाणू आहेत ज्यात लेजिओनेला, साल्मोनेला आणि आर्कोबॅक्टर यांचा समावेश आहे. या संसर्गामुळे निमोनिया आणि गॅस्ट्रोइंटेस्टाइनल आजाराचा धोका वाढतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange : दोन दिवसांत निर्णय घ्या, नाहीतर पाणीत्याग... जरांगेंचा निर्धार! मुसळधार पावसामुळे मुंबईत मराठा आंदोलकांचे हाल

Latest Marathi News Updates : जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उद्या मोर्चा; सकल मराठा समाज, मराठी भाषकांतर्फे आयोजन

Chandrashekhar Bawankule: काँग्रेसने केला ओबीसींवर अन्याय : बावनकुळे; महायुती सरकारनेच मराठा समाजाला दिला न्याय

Nagpur Crime: क्षुल्लक कारणावरून मारहाण, युवकाचा मृत्यू; एका आरोपीला जलालखेडा पोलिसांकडून अटक

Weekend Breakfast Recipe: वीकेंडला बनवा खास, सकाळी नाश्त्यात आस्वाद घ्या बीट ओट्स थालीपीठचा

SCROLL FOR NEXT