pregnancy tips
pregnancy tips google
आरोग्य

गरोदरपणात छातीत दुखत असेल तर दुर्लक्ष करू नका; हे उपाय करा

नमिता धुरी

मुंबई : गरोदरपणात प्रत्येक स्त्री तिच्या आहाराकडे विशेष लक्ष देते. योग्य लक्ष देऊनही, हार्मोन्समधील बदलांमुळे महिलांना अॅसिडिटीच्या समस्येचा सामना करावा लागतो, ज्यामुळे छातीत दुखणे सारख्या समस्या दिसू लागल्या आहेत.

अधूनमधून छातीत दुखत असेल तर ते नॉर्मल आहे कारण अशा वेदना अॅसिडिटीमुळे होऊ शकतात. पण गर्भधारणेदरम्यान छातीत दुखत राहिल्यास ते इतर आजाराचे लक्षण असू शकते.

जर तुम्हाला छातीत दुखू लागल्याने अस्वस्थ वाटू लागले असेल, तसेच श्वास घेण्यास त्रास किंवा इतर कोणत्याही प्रकारचा त्रास जाणवू लागला असेल, तर या दुखण्याकडे आम्लपित्त म्हणून दुर्लक्ष करू नका. वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.

छातीत दुखण्याचे कारण काय आहे, त्याबाबत कोणती खबरदारी घेतली पाहिजे आणि त्यापासून बचाव करण्याचे उपाय काय आहेत किंवा त्यावर उपचार काय आहेत हे वेळीच समजून घेतले तर हा त्रास कमी होऊ शकतो.

छातीत दुखणे सामान्य आहे का ?

गर्भधारणेदरम्यान ऍसिडिटीसारखे जडपणा जाणवणे सामान्य आहे. पण छातीत दुखण्याबरोबरच हात सुन्न होत असतील, श्वास घेण्यास त्रास होत असेल, तर असे होणे सामान्य नाही.

गर्भधारणेदरम्यान छातीत दुखणे काही सामान्य कारणांमुळे असू शकते जसे की तळलेले अन्न, अपचन, हार्मोन्स वाढणे. डीप वेन थ्रोम्बोसिस, सीएचडी असे विविध प्रकारचे इन्फेक्शन देखील छातीत दुखण्याचे कारण आहे. जर तुम्ही दम्याचे रुग्ण असाल, तर अस्थमा हे देखील एक कारण आहे ज्यामुळे तुम्हाला गर्भधारणेदरम्यान जडपणा, घट्टपणा किंवा श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.

तुम्हाला छातीत दुखणे तसेच चक्कर येणे, उलट्या होणे, हात सुन्न होणे यांसारख्या समस्या असतील तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. पण अपचन किंवा अॅसिडिटीमुळे तुम्हाला छातीत सामान्य दुखत असेल तर काही गोष्टींची काळजी घेऊन तुम्ही त्यापासून आराम मिळवू शकता.

उदाहरणार्थ, कंबरेखाली उशी घेऊन झोपा. यामुळे श्वास घेणे सोपे होते, अन्न खाल्ल्यानंतर लगेच झोपू नका, एकाच वेळी भरपूर अन्न खाऊ नका, थोडे जेवण घ्या. मसालेदार पदार्थ खाणे टाळा आणि तणावापासून दूर राहा.

काही घरगुती उपाय अॅसिडिटी कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतात. उदाहरणार्थ, कोमट दुधात मधाचे सेवन करणे, भिजवलेले बदाम खाणे यामुळेही अॅसिडिटी कमी होण्यास मदत होते. नारळाचे पाणी प्यायल्याने शरीरातील अॅसिडिटी कमी होते, तर अजवाईनचे पाणी प्यायल्याने अपचनातही मदत होते.

गरोदरपणात शक्यतो संतुलित आहार घ्यावा. आपल्या आहारात फळे, दूध, प्रथिने नियमितपणे घ्यावीत. पण तरीही काही फळे आणि भाज्या आहेत ज्यामुळे गॅस होतो. गॅसचा त्रास जास्त असेल तर दुग्धजन्य पदार्थ, बीन्स, ब्रोकोली, फ्लॉवर, बाहेरील मिठाई, मसालेदार पदार्थ खाणे टाळावे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT