How to Lose Belly Fat sakal
आरोग्य

How to Lose Belly Fat: पोटाचा घेर कमी करायचाय? जेवणानंतर 15 मिनिटे करा 'हा' योगा

वजनवाढ हा कोणता आजार नाही पण यामुळे अनेक आजार होण्याची शक्यता असते

सकाळ डिजिटल टीम

हल्ली वजन वाढीच्या समस्यांमध्ये वाढ दिसून येत आहे. लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच वजनवाढीचा प्रॉब्लेम दिसून येत आहे. खरं तर वजनवाढ हा कोणता आजार नाही पण यामुळे अनेक आजार होण्याची शक्यता असते.

जसे की बॅड कोलेस्ट्रॉल, हाय ब्लड प्रेशर, डायबिटीज, हार्ट अटॅक, हार्ट फेल्यूअर, कोरोनरी आर्टरी डिसिज आणि ट्रिपल वेसल डिसिजचाही धोका वाढतो. त्यामुळे शक्य असल्यास तुम्ही वेटला मेंटेन करणे गरजेचे आहे. यासाठी आज आम्ही तुम्हाला खास योगा सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.

वज्रासनने कमी करा वजन
वज्रासनद्वारे तुम्ही वाढलेलं वजन कमी करू शकता. या धावपळीच्या जगात रोज व्यायम करण्यासाठी वेळ मिळत नाही अशात तुम्ही जेवणानंतर योगा करू शकता. यामुळे तुम्ही पोटावरील चरबी दुर करू शकता. सोबतच तुमची इम्यूनिटी पण स्ट्रॉंग होणार. या वज्रासनमुळे तुम्ही तुमची पचनशक्ती आणि मसल्स पावर अधिक पावरफूर करू शकता. 

दुपारच्या जेवणानंतर तुम्ही 15 मिनटे काढू शकता. जर तुम्ही ऑफिसमध्ये असाल तर तुम्ही ब्रेक मध्ये वज्रासन करू शकता. यामुळे तुमच्या शरिराला अनेक फायदे होतील. जसे की पाचन तंत्र मजबूत करणे, ब्लड सर्कुलेशन व्यवस्थित होणे.

विशेष म्हणजे जे लोक एका ठिकाणी तासन् तास बसून काम करतात. त्यांच्यासाठी वज्रासन अधिक फायदेशीर ठरेल. यामुळे तुमच्या पायाच्या मसल्सवर अधिक प्रेशर पडेल आणि ब्लड सर्कुलेशन रेगुलर बेसिसवर होणार ज्यामुळे तुमची बॉडी शेपमध्ये येणार.

वज्रासनचे फायदे

1. वज्रासन वजन कमी करण्यासाठी आणि शरीराला फिट ठेवण्यासाठी मदत करते.
2. मन आणि डोकं शांत ठेवण्यासाठी वज्रासन अधिक फायदेशीर ठरतं.
3. या योगामुळे डोळ्यांची दृष्टी वाढते.
4. जेवण पचण्यासाठीसुद्धा वज्रासन फायदेशीर आहे.
5. हात पाय दुखणे, पाठदुखी इत्यादींपासूनही वज्रासन केल्याने आराम मिळतो.

6. शरीरातील ब्लड सर्कुलेशन नीट करण्यासाठी आणि आजारांपासून दुर करण्यासाठी वज्रासन फायदेशीर आहे.
7. वज्रासनमध्ये बसल्याने डायजेस्टिव पावर वाढतो.
8. नियमित हा योगा केल्यानेही एनर्जी वाढते.

9.वज्रासन केल्याने बॉडीचा मिडल पोस्चर स्ट्रेट राहते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT