Tea Making Mistake  esakal
आरोग्य

Tea Making Mistake : चहा बनवताना केलेल्या 'या' चुका ठरतील घातक, वेळीच सावध व्हा नाहीतर...

चहा बनवताना काही चुका झाल्या तर तुम्हाला आणखी त्रास सहन करावा लागू शकतो

सकाळ ऑनलाईन टीम

Tea Making Mistake : आपल्यापैकी असे बरेच लोक आहेत जे आपल्या दिवसाची सुरुवात 'बेड टी'ने करतात आणि दिवसभरात अनेक कप चहा पितात. भारतील कोट्यावधी लोकांचे सकाळच्या चहाशिवाय भाग नाही. आपल्या देशात हे पाण्यानंतर दुसरे सर्वाधिक सेवन केले जाणारे पेय आहे.

आले, काळी मिरी, तुळस आणि वेलची यांसारख्या गोष्टी चवीसाठी चहामध्ये घातल्या जातात. जास्त प्रमाणात दूध आणि साखरेचा चहा पिणेही तितकेच धोकादायक आहे, पण तो बनवताना काही चुका झाल्या तर तुम्हाला आणखी त्रास सहन करावा लागू शकतो.

चहा बनवताना अशा चुका करू नका

  • चहा बनवणे हा काही लोकांचा छंद असतो, पण यादरम्यान अनेकदा आपल्याकडून काही चुका होतात ज्या योग्य नसतात.

  • अनेक लोक आधी दूध उकळतात आणि पूर्णपणे उकळल्यावर त्यात पाणी, साखर आणि चहाची पाने मिसळतात, ही पद्धत चुकीची आहे.

  • काही लोकांना कडक चहा पिण्याची इच्छा असते, अशावेळी ते चहा जास्त प्रमाणात उकळतात, जे आरोग्यासाठी हानिकारक आहे.

  • चहाचे सर्व घटक एकत्र मिसळून जास्त वेळ उकळल्यास पोटात अॅसिडिटीचा त्रास होऊ शकतो.

  • जे लोक चहामध्ये जास्त साखर घालतात, त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी वाढते, ज्यामुळे भविष्यात लठ्ठपणा आणि मधुमेह होऊ शकतो.

चहा बनवण्याची योग्य पद्धत

ब्रिटीश स्टँडर्ड्स इन्स्टिट्यूशननुसार, चहा बनवण्यासाठी सर्वप्रथम 2 भांडी घ्या. एकात दूध उकळा आणि दुसऱ्यात पाणी उकळा. चमच्याने मधेच दूध ढवळत राहा. आता उकळत्या पाण्यात चहाची पाने आणि साखर मिसळा आणि तुमचे आवडते मसाले देखील घाला. (Health News)

दोन्ही भांड्यांमध्ये उकळ आल्यानंतर पाणी आणि चहापत्ती असलेल्या मिश्रणात उकळलेले दूध मिसळा. ते पुन्हा उकळवा आणि नंतर गॅसवरून काढून कपमध्ये गाळून घ्या. हे करण्यामागचा उद्देश असा आहे की दूध आणि चहापत्ती असलेले पाणी जास्त वेळ एकत्र उकळू नये, कारण त्यामुळे तुमचं पोट खराब होऊ शकते.(Tea)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ज्वारीच्या कोठारात यंदा हरभरा-करडईची पेरणी! अतिवृष्टीमुळे मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांना ५७० कोटींचा फटका; ऑक्टोबर उजाडला तरी नाही 'मालदंडी'ची पेरणी

Dmart Offers : डीमार्टमध्ये खरेदीला जाताय? तर चुकूनही विसरू नका 'या' 2 गोष्टी, नाहीतर स्वतःचं नुकसान करून घ्याल..!

आजचे राशिभविष्य - 07 ऑक्टोबर 2025

Yashasvi Jaiswal: मला एक दिवस कॅप्टन व्हायचंय! जैस्वालची 'मन की बात'; शुभमन गिलसमोर उभा राहिला स्पर्धक

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 07 ऑक्टोबर 2025

SCROLL FOR NEXT