Uric acid and bone disease sakal
आरोग्य

शरीरशास्त्र : युरिक ॲसिड आणि हाडांचे आजार

आपल्या शरीरात प्युरिनचे विघटन होऊन युरिक ॲसिडची निर्मिती होते. हे रक्तातून मूत्रपिंडापर्यंत पोहचते. तिथे प्रक्रिया होऊन लघवीवाटे शरीरातून बाहेर पडते.

डाॅ. अजय कोठारी

आपल्या शरीरात प्युरिनचे विघटन होऊन युरिक ॲसिडची निर्मिती होते. हे रक्तातून मूत्रपिंडापर्यंत पोहचते. तिथे प्रक्रिया होऊन लघवीवाटे शरीरातून बाहेर पडते.

युरिक ॲसिड कारणे

१) अतिरिक्त युरिक ॲसिड तयार होणे

२) लघवीवाटे पुरेसे युरिक ॲसिड शरीरातून बाहेर टाकले न गेल्यास. या व्यतिरिक्त खालील कारणेसुद्धा युरिक ॲसिड वाढवण्यात कारणीभूत ठरतात.

१) लठ्ठपणा २) मधुमेह ३) रक्तदाब ४) वाढलेले कोलेस्ट्रॉल ५) आनुवंशिक आजार ६) वयाच्या चाळीशीनंतर ७) रक्ताचा कर्करोग ८) मोठी शस्त्रक्रिया झाल्यानंतर ९) हायपोथारोडिसिम १०) सतत रंग, लिडच्या कारखान्यात काम करणारे, फवारणी करणारे कामगार वर्ग १२) दारूचे व्यसन १३) बैठे काम करणारी व सतत शर्करायुक्त पेय पिणारे, अति मांसाहार १४) जास्त दिवस उपवास किंवा पाणी कमी पिल्याने, अति प्रमाणात व्यायामामुळे शरीरातील पाणी कमी होऊन युरिक ॲसिड पूर्णपणे बाहेर पडत नाही. १५) औषधांचा अतिवापर

गाऊटची लक्षणे

१) गाऊटच्या त्रासात सांध्यामध्ये युरिक ॲसिड जमा झाल्याने सूज येऊन अतिशय वेदना होतात. त्रास वाढल्यास त्वचा लाल होते. फार दिवस झाल्यास सांध्यात एखादी गाठ आढळते. यामुळे अंगठा किंवा बोट सुजते. कधी-कधी गुडगे किंवा घोटासुद्धा सुजू शकतो.

२) काही जणांना मुतखड्याचा त्रास होऊ शकतो.

प्रमुख तपासण्या

१) रक्तातील युरिक ॲसिड

२) एक्सरे जॉइंट

३) सोनोग्राफी - किडनीचे आजार असल्यास स्टोनचे निदान करण्यासाठी

४) आनुवंशिक असल्यास

इनझाईमच्या कमतरता ओळखण्यासाठी तपासण्या.

युरिक ॲसिड कमी करण्यासाठी उपाययोजना

आहार

प्युरिनचे प्रमाण जास्त असणारे पदार्थ टाळावेत, कमी प्रमाणात सेवन करावे.

उदा. १) दारू, अल्कोहोलिक मादक द्रव्ये २) मांसाहार, सीफूड टाळावे ३) शीतपेय ४) मटार, वाटाणा, वाल, पावटा, उडीद यासारखी पचनास जड असणारी कडधान्ये व मका कमी प्रमाणात घेणे ५) बेकरी प्रॉडक्ट्स, स्नॅक्स, पापड जास्त फॅटयुक्त, तेलकट, चरबीजन्य पदार्थ टाळावे ६) आहारात मिठाचे अतिप्रमाण, लोणचे, डबाबंद पदार्थ टाळावेत.

कमी करण्यासाठी काय खावे

  • हिरव्या भाज्या, ताजी फळे यांचा आहारात समावेश

  • सुकामेवा, कमी फॅट असलेले गाईचे दूध व दुग्धजन्य पदार्थ घ्यावे.

  • दररोज साधारण ८ ते १० ग्लास पाणी प्यावे. त्यामुळे शरीरात वाढलेले अतिरिक्त युरिक ॲसिड लघवीवाटे शरीराबाहेर निघून जाण्यास मदत होते.

  • ओवा, सूंठ, लसूण, आले, हळद आवर्जून खावे.

  • व्हिटॅमिन-सी युक्त फळे आहारात रोज घ्यावी.

  • पोटॅशिअम, मॅग्नेशिअम, झिंकयुक्त पदार्थांचे सेवन करावे.

व्यायाम

  • दररोज नियमित व्यायाम करणे सर्व सांध्याची हालचाल करणारे व्यायाम करणे.

  • दुसरे काही आजार असल्यास ते नियंत्रित ठेवणे.

  • उदा. रक्तदाब, मधुमेह, लठ्ठपणा, वेळेवर औषधोपचार व नियमित तपासणी करणे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: पाकिस्तान UAE ला पराभूत करत 'सुपर फोर'मध्ये! भारताविरुद्ध पुन्हा होणार सामना, पण कधी अन् केव्हा? जाणून घ्या

Athletics Championship 2025: नीरज चोप्रा विरुद्ध अर्शद नदीम लढत होणार! जाणून घ्या कुठे अन् किती वाजता पाहाता येणार फायनल

PAK vs UAE: पाकिस्तानी विकेटकिपरच्या थ्रोमुळे अंपायरला मोठी दुखापत, मैदानंच सोडावं लागलं; जाणून घ्या नेमकं काय घडलं

Meenatai Thackeray statue case Update: मोठी बातमी! मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग फेकणाऱ्यास २४ तासांच्या आत अटक; गुन्हाही केला कबूल

Disha Patani’s house firing incident: दिशा पटानीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोन शूटर्सचा अखेर गाझियाबादमध्ये खात्मा!

SCROLL FOR NEXT