Arthritis of the spine sakal
आरोग्य

शरीरशास्त्र : मणक्याचा संधिवात

अनेक लोकांमध्ये गैरसमज असतो की, संधिवात मणक्यात होत नाही. हाडांचा संधिवात मुख्य दोन प्रकारचे असते.

डाॅ. अजय कोठारी

अनेक लोकांमध्ये गैरसमज असतो की, संधिवात मणक्यात होत नाही. हाडांचा संधिवात मुख्य दोन प्रकारचे असते.

1) दात व पायाच्या छोट्या सांध्यामध्ये होतो. त्याला ह्युमाटाईड अर्थारिस्ट म्हणतात. ते महिलांमध्ये जास्त प्रमाणात दिसतो. वयोगट - २० ते ४० वर्षे कधी त्याआधी दिसते.

2) हा मणक्यामध्ये व त्या बाजूस एसआय जॉइंट (Sacro-iliac) व खुबे यामध्ये दिसते. याला ॲक्रिलॉझिंग स्पॉन्डेलायरिस असे म्हणतात. आपण याबाबत सविस्तर जाणून घेऊया.

तिसऱ्या प्रकारचे संधिवात जे व्हायरल इन्फेक्शन नंतर होते किंवा बऱ्याचदा त्यांचे कारण स्पष्ट नसते. ज्याला चिकनगुन्या, गोचीड तापानंतर होणारे संधिवात असे अनेक प्रकार त्यामध्ये आहेत. आता जाणून घेऊयात मणक्याच्या संधिवाताबद्दल

लक्षणे -

1) सकाळी उठल्यावर १ ते २ तास कंबर व पूर्ण मणका अतिशय ताणलेला असतो. झोपून उठताना त्रास होतो. गरम पाण्याने अंघोळ केल्यावर किंवा व्यायाम केल्यावर बरे वाटते.

2) मणक्याला बाक येतो व मानेच्या व कंबरेच्या सांध्यामधील लवचिकता कमी होत जाते. कालांतराने सरळ झोपणे सुद्धा शक्य होत नाही. ३-४ उशींची गरज पडते.

हे मुख्यतः पुरुषांमध्ये होते. वयवर्षे १५ ते ३५ दरम्यान ही समस्या जाणवते. याबरोबर डोळ्याचे, पोटाचे विकार होऊ शकतात.

कारणे

1) आनुवंशिकता

2) ठोस कारणाचा अभाव

3) एचएलए-बी-२७ ही जी ज्यांच्यामध्ये असते त्या लोकांमध्ये याचे प्रमाण जास्त आहे.

निदान

1) रक्त तपासणी - एचएलए-बी-२७, इएसआर, सीआरपी.

2) ‘एमआरआय’मध्ये सॅक्रो इलियाक जॉइंट (Sacro iliac Joint), म्हणजे मणक्याला व खुब्या जोडणारा सांधा असतो त्यामध्ये सूज दिसते. मणक्यामध्ये ही संधिवाताचे बदल दिसतात.

3) एक्स-रे, बांबू स्पाईन, जास्त हाडाची वाढ झाल्यामुळे असे दिसते. डॉक्टरांना तपासून याचे निदान होते. गरज पडल्यासच वरील तपासण्या केल्या जातात.

उपचार

1) समग्र उपचार पद्धती पाहिजे.

2) सकाळी लवकर उठणे, नित्यनियमाने १ तास रोज व्यायाम करणे. त्यामध्ये योगा, धावणे, पोहणे, जोर बैठका इत्यादी व्यायाम करायलाच पाहिजे.

तुमच्या डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली औषधोपचार उपलब्ध आहेत. नियमित व्यायामाने नियंत्रण चांगले असल्यास औषधाची गरज नसते. तुमच्या डॉक्टरांना वाटत असेल की हे सांधेवाताचे प्रमाण वाढले असेल तर त्यावर औषधोपचार व इंजेक्शन उपलब्ध असते.

3) पेन ब्लॉक थेरपी - एसआय जॉइंट हे मणक्याच्या सांध्यामध्ये ही वेदना कमी करण्यासाठी फार उपयुक्त उपचार पद्धती आहे.

4) मणक्याची शस्त्रक्रिया - मणक्याचा बाक फार वाढला असेल किंवा फार उशिरा या आजाराचे निदान झाले असेल तर शस्त्रक्रिया करावी लागते. वाकलेला मणका पूर्ण सरळ करू शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amol Mitkari: ‘भूमिपुत्रांना रोजगार द्या, त्यांचं आयुष्य समृद्ध करा’; आ. अमोल मिटकरी यांची विधान परिषदेत ठाम मागणी

Manoj Kayande : अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्या; आमदार मनोज कायंदे यांची अधिवेशनात मागणी

KDMC Revenue Department : कल्याण - डोंबिवली खाडी किनारी महसूल विभागाची कारवाई; 30 लाखांचा मुद्देमाल केला नष्ट

"मृत्युपत्र तयार ठेवलंय" एअर इंडियाने प्रवास करणाऱ्या अभिनेत्याची पोस्ट व्हायरल, म्हणाला..

Latest Maharashtra News Updates : सोमनाथच्या मृत्यू संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT