womens health sakal
आरोग्य

शरीरशास्त्र : महिलांचे आरोग्य

महिलांनी आपले आरोग्य जोपासणे व योग्य जीवनशैलीचा अंगीकार केल्यास आपण रोजच महिला दिन साजरा करू शकतो.

डाॅ. अजय कोठारी

महिलांनी आपले आरोग्य जोपासणे व योग्य जीवनशैलीचा अंगीकार केल्यास आपण रोजच महिला दिन साजरा करू शकतो.

महिलांनी आपले आरोग्य जोपासणे व योग्य जीवनशैलीचा अंगीकार केल्यास आपण रोजच महिला दिन साजरा करू शकतो.

1) मासिक पाळी - रक्तस्रावामुळे हिमोग्लोबीन व शरीरातील लोह कमी होते. हार्मोनच्या असंतुलनामुळे हाडावर दुष्परिणाम होतो. महिलांची पाळी बंद होते किंवा ज्या महिलांची कमी वयात गर्भाशयाची पिशवी काढली जाते त्या महिलांमध्ये प्रोजेस्टेरॉन हार्मोन्स कमी होत जातात. त्यामुळे हाडांची ठिसुळता महिलांमध्ये पुरुषांपेक्षा जास्त बघायला मिळते.

2) गर्भधारणा - गर्भधारणा झाल्यावर पोटाचे स्नायू ताणले जातात. नॉर्मल डिलिव्हरीमध्ये ताणलेल्या स्नायूंमध्ये नित्यनियमाने व्यायाम केल्यास संपूर्ण शक्‍ती व लवचिकता येते. तथापि होते असे की आपल्याकडे बाळंतपणानंतर भरपूर प्रमाणात तूप, हाय कॅलरीचा मारा केला जातो व व्यायाम केल्यापासून परावृत्त केले जाते. त्यामुळे लठ्ठपणा येतो. दुसरे म्हणजे आजकाल सीझरीन डिलिव्हरीमध्ये नॉर्मल डिलिव्हरीपेक्षा प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे नॉर्मल डिलिव्हरीच्या तुलनेत पोटाचे स्नायू अधिक कमजोर होतात आणि त्याचा थेट परिमाण तुमच्या मणक्यावर होतो.

3) बाळंतपणानंतर बाळाला दूध पाजायला अनेकदा खूप वाकून ही प्रकिया केली जाते. कुठेतरी कोपऱ्यात बसून मणक्याला पूर्ण वाकून वर्षभर हा प्रयोग होतो. त्यामुळे मणक्यावर कुबड निर्माण होते. (टीप - दूध पाजताना तुम्ही बाळाजवळ जाण्यापेक्षा बाळाला तुमच्या जवळ घेऊन मणका ताठ ठेवून स्तन्यपान केल्यास मणक्याचे आरोग्य जोपासले जाते)

4) पाठदुखी व मानदुखी - भारतीय महिला आता ‘सूपर वूमन’ झाली आहे. ती घरातील सगळे काम तर सांभाळते त्यासोबत १० ते १२ तास ऑफिसमध्ये ही काम करते. त्यामुळे तिचा आहार, व्यायाम, विश्राम याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होते. संपूर्ण परिवाराने जेवल्यानंतर जे काही उरले सुरले जेवण ती खात असल्यामुळे ते पोटभरीचे होत नाही.

5) वाकून काम करणे - कपडे धुणे, घर साफ करणे, जेवण वाढणे इत्यादी सर्व काम वाकून केली जातात. त्यामुळे कंबरेवर प्रचंड ताण पडल्याने मणक्याच्या व्याधी सुरू होतात.

कसे करू शकतो महिलांचे मणके मजबूत

  • आहार - हाय प्रोटिन डाएट, हिरव्या पालेभाज्या, सुकामेवा, फळे, कडधान्य, डाळी पनीर आदी

  • व्यायाम - दररोज ४५ मिनिटे रोज व्यायाम, चालणे, योगासन, हलक्या प्रमाणात वेट ट्रेनिंग, सायकलिंग, पोहणे

  • दररोज ६ ते ७ तास झोप घेणे.

  • बाळंतपणानंतरच्या काळात पुरेशी काळजी घेणे.

  • रजोनिवृत्तीनंतर पुरेशा प्रमाणात कॅल्शिअम घेणे, वेळोवेळी तपासण्या करून उपाययोजना करणे.

(लेखक संचेती हॉस्पिटलमध्ये मणकातज्ज्ञ आहेत. या लेखाच्या डॉ. फरहिन पटेल या सहलेखिका असून, त्या संचेती हॉस्पिटलमध्ये फिजिओथेरपिस्ट आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Court Restrooms: हे वापरकर्त्यांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन; कोर्टातील अस्वच्छ स्वच्छतागृहांबाबत स्थिती अहवाल सादर

PAK vs SA Test: पाकड्यांचे घरच्या मैदानावर वस्त्रहरण; दक्षिण आफ्रिकेने दाखवली जागा; WTC मध्ये दिला शेजाऱ्यांना धक्का

Crime News : पतीचे सावत्र आईसोबत प्रेमसंबंध, विरोध करणाऱ्या पत्नीची गोळ्या घालून हत्या; १० वर्षांच्या मुलाने सांगितली हकीकत

तेजस्वी यादव महाआघाडीचे CM पदाचे उमेदवार, आता NDAने सांगावं, नाहीतर महाराष्ट्रासारखं कराल; भाजपवर टीका

Premachi Goshta 2 Review: मैत्री, प्रेम आणि भावनिक नात्याचा सर्वांगसुंदर कलाविष्कार, कसा आहे ललितचा 'प्रेमाची गोष्ट २' सिनेमा?

SCROLL FOR NEXT