Diet and Health Sakal
आरोग्य

वसा आरोग्याचा : आहार आणि आरोग्य

लहानपणापासून आपण बघत असतो की घरातील रात्रीचे शिळे अन्न उरते ते बहुतेक वेळा फेकून कसे देणार किंवा काम करणाऱ्या महिला वेळ वाचवण्यासाठी दुसऱ्या दिवशी नाश्त्यासाठी मुद्दामच जास्तीचे बनवले जात.

सकाळ वृत्तसेवा

लहानपणापासून आपण बघत असतो की घरातील रात्रीचे शिळे अन्न उरते ते बहुतेक वेळा फेकून कसे देणार किंवा काम करणाऱ्या महिला वेळ वाचवण्यासाठी दुसऱ्या दिवशी नाश्त्यासाठी मुद्दामच जास्तीचे बनवले जात.

- डॉ. कोमल बोरसे

लहानपणापासून आपण बघत असतो की घरातील रात्रीचे शिळे अन्न उरते ते बहुतेक वेळा फेकून कसे देणार किंवा काम करणाऱ्या महिला वेळ वाचवण्यासाठी दुसऱ्या दिवशी नाश्त्यासाठी मुद्दामच जास्तीचे बनवले जात. त्या घरातील गृहिणी किंवा बाकीच्या महिला ते खाऊन संपवतात. व्यग्र जीवनशैलीमुळे उरलेले अन्न म्हणजेच शिळे अन्न खाणे ही लोकांची सवय होत चालली आहे. आयुर्वेदानुसार अन्न शिजवल्याच्या ३ तासांच्या आत किंवा जास्तीत जास्त दिवसभरात ते खाल्ले गेले पाहिजे.

हवाबंद डब्यात अन्न ठेवल्यानंतरही ते अन्न दुसऱ्या दिवसापर्यंत ताजे राहत नाही. किंवा खूप कमी ठिकाणी ते पूर्ण परिवारात वाटून संपवली जाते. प्रश्न हा नाही आहे की ते कोण खाते. परंतु शिळे अन्न खाणे योग्य की अयोग्य? शिळे अन्न म्हणजे नेमकं काय? आयुर्वेदानुसार २४ तासांपेक्षा जास्त काळ ठेवलेले अन्न कधीही खाऊ नये. कारण २४ तासांपेक्षा जास्त काळ ठेवलेले अन्न खाल्ल्याने पचनाशी संबंधित समस्या उद्‍भवू शकतात. ज्याला आयुर्वेद योग्य मानत नाही. इतकंच नाही तर एकदा अन्न शिजवले की त्यात ओलावा असतो आणि बनविल्यानंतर ते फ्रीजमध्ये ठेवले जाते. त्यामुळे अनेक आजार होतात. म्हणजेच शिळे अन्नही तुमच्या शरीरासाठी हानिकारक ठरू शकते.

आजकाल अशी अनेक कुटुंबे पाहायला मिळतात, जी मायक्रोवेव्हमध्ये गरम केल्यानंतर उरलेले अन्न खातात. ते आरोग्याच्या दृष्टीने अजिबात चांगले नाही. मायक्रोवेव्हमध्ये अन्न पुन्हा गरम केल्याने जीवनसत्त्वांसारखे आवश्यक पोषक घटक नष्ट होतात. अनेक वेळा असे केल्याने अन्नातून विषबाधा होण्याचीही शक्यता असते.

सगळ्याच प्रकारचे शिळे अन्न खाणे आरोग्यासाठी हानिकारक आहे. विशेषतः: पेरिषेबल म्हणजे लवकर खराब होणारे पदार्थ जसे की अंडी शिजवलेला भात, चिकन आणि प्रक्रिया केलेले तेलकट पदार्थ शिळे खाणे टाळावे. या सर्व गोष्टींमध्ये विषाणू पटकन वाढतात. म्हणून, या गोष्टी अनेक दिवसांनंतर खाऊ नयेत.

अन्नाद्वारे विषबाधा होऊन उलट्या आणि पोटदुखीचा त्रास देखील वाढतो. ‘जसे अन्न, तसे मन’ अशी एक म्हण आहे. म्हणजेच माणूस ज्या प्रकारचा आहार घेतो, त्याच प्रकारचा परिणाम त्याच्या विचारांवर आणि आरोग्यावर होतो. सध्या प्रत्येकजण आपापल्या कामात इतका व्यग्र झाला आहे की पोट भरण्यासाठी काहीही खातो, मग ते जंक फूड असो किंवा रात्री उरलेले शिळे अन्न असो. फ्रीजमध्ये ४८ तासांपेक्षा जास्त काळ अन्न ताजे ठेवू शकत असले तरी, अन्न पुन्हा गरम करणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.

(लेखिका आहारतज्ज्ञ आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Politics : राज ठाकरेंनी अपमान केलेल्या अभिनेत्याचा भाजप प्रवेश

Angar Election: राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद का झाला? 'या' होणार बिनविरोध नगराध्यक्ष?

IND W vs BAN W: वर्ल्ड कप जिंकल्यानंतर होणारी भारतीय संघाची मालिका BCCI कडून स्थगित! जाणून घ्या सविस्तर

Ranji Trophy: महाराष्ट्राचा एकाच डावाने दणदणीत विजय; विकी ओत्सावल अन् राजवर्धन हंगारगेकरच्या मिळून ११ विकेट्स

Gorakhpur Mumbai Train Bomb Threat : गोरखपूर-मुंबई पॅसेंजर ट्रेनमध्ये बॉम्बची धमकी; प्रवशांमध्ये खळबळ अन् शोधमोहीम सुरू

SCROLL FOR NEXT