आरोग्य

दोन बिअर पिण्यामुळे मेंदू 10 वर्षांनी म्हातारा होतो; संशोधकांचा दावा

दिवसात 2 बीअर पिण्यामुळे मेंदूचे तितकेच नुकसान होते जितके 10 वर्षाच्या वृद्धत्वामुळे होते

सकाळ डिजिटल टीम

सर्वांनाच माहित आहे की, मद्यपान हे आपल्या आरोग्यासाठी घातक आहे विशेषत: मेंदूच्या आरोग्यासाठी. पण, आपण योग्य प्रमाणात मद्य सेवन केले जाऊ शकते असे आपण गृहित धरतो. परंतु एका नवीन अभ्यासात असे दिसून आले आहे की, दिवसातून दोन बिअर प्यायल्यामुळे तुमचा मेंदू १० वर्ष म्हातारा होऊ शकतो म्हणजेच, 10 वर्षांच्या वृद्धत्वामुळे मेंदूचे जितके नुकसान तितके फक्त रोज २ बिअर प्यायल्यामुळे होते. (Drinking Two Beers A Day Damages Brain As Much As Ten Years Of Aging)

संशोधकांनी या अभ्यासात अल्कोहोलचे सेवन आणि मेंदूतील राखाडी आणि पांढर्‍या पदार्थांचे प्रमाण पाहिले, जेणेकरुन मध्यम प्रमाणात बिअर घेतल्याने वर्षानुवर्षे नुकसान कसे होऊ शकते हे चांगल्या प्रकारे समजून घेता येईल.

या अभ्यासादरम्यान, यूकेच्या बायोबँकमधील 36,000 हून अधिक व्यक्तींच्या उच्च-गुणवत्तेच्या एमआरआय स्कॅनचे विश्लेषण केले. त्यांनी जास्त मद्यपान करणाऱ्यांवर लक्ष केंद्रित केलेल्या अभ्यासाचा देखील पाठपुरावा केला. संशोधकांना असे आढळून आले आहे की, मध्यम प्रमाणात मद्यपान केल्याने मेंदूतील पांढरे आणि राखाडी पदार्थांचे प्रमाण कमी होऊ शकते.

आश्‍चर्यकारक बाब म्हणजे डेटामधून जास्त मद्यपान करणाऱ्यांना काढून टाकल्यानंतरही परिणाम फारसे वेगळे नव्हते. तुम्ही किती प्रमाणात मद्यपान करत आहात आहात याने काही फरक पडत नाही कारण जे नुकसान हे होतेच. अभ्यासाने सरासरी मद्यपान दर्शविते, पण, वारंवारता आणि भिन्न प्रमाण आणि मेंदूच्या आरोग्यावर त्यांचा प्रभाव होऊ शकतो याकडे संशोधक लक्ष देतात.

अभ्यासाच्या लेखकांपैकी एक, गिडॉन नेव्ह यांनी स्पष्ट केले, की "या अभ्यासात सरासरी वापरावर लक्ष दिले गेले आहे, परंतु दिवसातून एकदा बिअर पिणे हे आठवड्यातून एकही न पिण्यापेक्षा आणि नंतर आठवड्याच्या शेवटी सात वेळा पिणे चांगले आहे का? हे जाणून घेण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.''

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sugar Price Hike Maharashtra : साखरेचे भाव क्विंटलमागे 900 रुपयांनी घसरले; तरीही किरकोळ बाजारात दर 67 रुपयांवर, फायदा साठेबाजांचाच?

कोकण आपलोच आसा! सनई चौघडे मालिकेची टीम पोहचली कणकवलीत, फोटो पाहिलेत का?

MPSC Paper Leak: परीक्षा झाली, मुलाखतीही झाल्या; मग MPSC ने संपूर्ण भरतीच का रद्द केली? पेपरफुटीचा मुद्दा पुन्हा चर्चेत

Latest Marathi News Live Update : टीम कुक ‘ॲपल’ची धुरा सोडणार

Kolhapur Gender Determination Case: गर्भलिंग निदानप्रकरणी ‘एस.पी. टोळी’ला मोका; राज्यातील पहिलीच कारवाई; ११ जणांवर बडगा

SCROLL FOR NEXT