Plastic Bottle:  Sakal
आरोग्य

Plastic Water Bottle: प्लास्टिकच्या बाटलीतील पाणी प्यायल्याने बिघडू शकते हार्मोनल संतुलन, संशोधनातून समोर आली माहिती

Plastic Water Bottle: अनेक लोकांना उठता -बसता प्लास्टिकच्या बाटलीमधील पाणी पिण्याची सवय असते. पण या सवयीमुळे अनेक गंभीर आजार निर्माण होऊ शकतात.

पुजा बोनकिले

Plastic Water Bottle: आजकाल अनेक लोक प्रवासामध्ये, घरी, ऑफिसमध्ये प्लास्टिकच्या बाटलीचा वापर पाणी पिण्यासाठी करतात. तुम्हालाही अशी सवय असेल तर शरीरात विष तयार होत आहे.

प्रोसिडिंग्स ऑफ द नॅशनल ॲकॅडमी ऑफ सायन्सेस नावाच्या एका संस्थेने एका अभ्यासात धक्कादायक खुलासा केला आहे. यामध्ये असे म्हटले आहे की एक लिटर प्लास्टिकच्या बाटलीमध्ये सुमारे 2.40 लाख बारीक तुकडे असतात,यामुळे आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो.

संशोधणात समोर आली माहिती

संशोधकांना एका प्लॅस्टिकच्या बाटलीमधील पाण्यात 100,000 पेक्षा जास्त नॅनोप्लास्टिक सापडले आहेत. हे असे छोटे कण आहेत, जे रक्ताभिसरण, पेशी आणि मेंदूपर्यंत पोहोचू शकतात आणि अनेक गंभीर आजार निर्माण करू शकतात.

तज्ज्ञांच्या मते प्लास्टिकच्या बाटल्यांमधील पाणी धोकादायक का आहे ?

प्लास्टिकच्या बाटल्यांच्या पाण्यात बिस्फेनॉल-ए (BPA) आणि फॅथलेट्स सारखी रसायने विरघळतात. जेव्हा बाटलीमधील पाणी सूर्यप्रकाश किंवा उष्णतेच्या संपर्कात येते तेव्हा ही रसायने पाण्यात विरघळतात आणि शरीरात पोहोचतात. याशिवाय प्लास्टिक कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन आणि क्लोराईडपासून बनते, ज्याचा वापर बीपीए प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या बनवण्यासाठी केला जातो.

प्लास्टिकच्या बाटल्यांमधील पाणी प्यायल्यास कोणते आजार होऊ शकतात

हृदयविकार

हार्वर्ड स्कूल ऑफ पब्लिक हेल्थच्या संशोधनानुसार, पॉली कार्बोनेटच्या बाटल्यांमधील पाण्यात बिस्फेनॉल ए रसायन असते, जे शरीरात गेल्यावर हृदया समभंधित आजार निर्माण करू शकतात.

मधुमेह

तसेच नियमितणे प्लास्टिकच्या बाटलीमधील पाणी पित राहिल्याने मधुमेहाचा धोका वाढू शकतो. यामुळे शक्य असल्यास प्लास्टिकच्या बाटलीमधील पाणी पिणे टाळावे..

प्रजननक्षमतेवर परिणाम होतो

बीपीए आणि फॅटलेट्स रसायने असलेल्या प्लास्टिकच्या बाटल्यांमधील पाणी प्यायल्याने प्रजनन क्षमतेवर गंभीर परिणाम होतो. हे पाणी प्यायल्याने हार्मोनल संतुलन बिघडू शकते.

कर्करोगाचा धोका

तज्ज्ञांच्या मते प्लास्टिकच्या बाटलीतील पाणी प्यायल्याने अनेक प्रकारच्या कर्करोगाचा धोका वाढू शकतो. यामुळे ब्रेस्ट आणि ब्रेन कॅन्सर होऊ शकतो. प्लॅस्टिक पॉलिथिनमध्ये ठेवलेले गरम अन्न खाणे किंवा पिणे यामुळे कर्करोगाचा धोका खूप वाढू शकतो. हे पाणी प्यायल्याने ल्युकेमिया आणि लिम्फोमासारख्या आजारांचा धोकाही वाढतो.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यातील २४ जणं उत्तराखंडमध्ये बेपत्ता; १९९०च्या १०वीच्या बॅचमधील मित्र-मैत्रीण बऱ्याच वर्षांनी एकत्र भेटले अन्...

Kolhapur Crime : बहिणीला सोडून येताना भावाचा धारदार शस्त्राने खून तर, पत्नीने जाब विचारताच पतीने चिरला गळा; एकाच दिवशी दोन घटनांनी कोल्हापूर हादरलं

Latest Marathi News Updates Live : कबुतरखाना बंद करण्यापूर्वी विचार करायला हवा होता- रोहित पवार

Mumbai BMC Election Explained: मुंबई मनपात भाजपचं गणित फसणार? शिंदे फक्त चेहरा, उद्धव ठाकरेंची खरी गरज! काय सांगतात आकडे?

Kabutarkhana Controversy: महादेवी हत्ती प्रकरण चर्चा दाबण्यासाठी मुंबईतील कबुतरखान्याचा वाद पेटवला? का होतोय आरोप?

SCROLL FOR NEXT