Early Morning Meal esakal
आरोग्य

Early Morning Meal: सकाळी घ्या आहारात 'या' पाच गोष्टी, आरोग्य असेल एकदम ठणठणीत

ठणठणीत आणि हेल्दी राहायचं असेल तर सकाळी उठल्याबरोबर या गोष्टी आहारात घ्या, वजन आणि हेल्थ दोन्ही राहिल मेन्टेन

सकाळ डिजिटल टीम

सकाळी उठताच काही महत्वाच्या गोष्टी आहारात घेणे फार महत्वाचे ठरते. सकाळी सकाळी आहारात जर तुम्ही या काही गोष्टी घेतल्या तर नक्कीच महिन्याभऱ्यात तुम्हाला फरक जाणवेल. आणि तुमचं आरोग्यही चागलं राहिल. जास्त मेहनत न घेता कमी वेळात सकाळच्या आहाराची काळजी घ्या आणि तुमच्या आरोग्यासह फिट हेल्थ मिळवा. त्यासाठी तुम्हाला फक्त तुमच्या आहारात या पाच गोष्टी घेण्याची गरज आहे. (Early Morning Meal)

मध आणि लिंबू

सकाळी उठल्यास साधे पाणी जर तुम्ही पित असाल तर त्यात भर तुम्हाला साधे पाणी कोमट करून त्यात फक्त लिंबू आणि मध टाकून पाणी प्यायचे आहे. लिंबू आणि मधाने मेटाबोलीझम पावर वाढत असतो. त्यांमुळे तुमची अतिरिक्त चरबी वाढणं कमी होईल.

मेथ्या

रात्री मेथी भिजत घालायची. मेथीत भरपूर प्रमाणात फायबर असतात. बध्दकोष्ठतेच्या समस्येने ग्रस्त लोकांसाठी मेथ्या भिजवून खाणं फायदेशीर आहेत. एक चमचा मेथ्या रात्रभर भिजवून सकाळी खाल्ल्यास पचन व्यवस्था नीट काम करते. रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी, पाळीतील वेदना कमी करण्यासाठी मेथ्यांचं सेवन फायदेशीर ठरतं.

खसखस

चयापचय क्रिया सुधारण्यासाठी खसखस फायदेशीर ठरते. रात्रभर खसखस भिजवून सकाळी खाल्ल्यास शरीरात चरबी जमा होत नाही. स्थूलपणा कमी होतो. लठ्ठपणामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांची तीव्रता कमी होते.

जवस

जवसामध्ये ओमेगा 3 हे फॅटी ॲसिड भरपूर प्रमाणात असतं. एक चमचा जवस पाण्यामध्ये रात्रभर भिजवून सकाळी खाल्यास हाय कोलेस्टेराॅल कमी होतं. (Diet Plan) रक्तातील साखर आणि कोलेस्टेराॅलची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी भिजवलेले जवस फायदेशीर असतात. जवसामध्ये आहारीय तंतूमय घटकाचं प्रमाण जास्त असल्यानं भिजवलेले जवस खाल्ल्याने पचनव्यव्स्थेचं काम सुधारतं.

मनुका

रोज रात्री मनुका भिजवून सकाळी खाणे आरोग्यासाठी फायदेकारी ठरते. मनुक्यांमध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि लोह हे घटक असतात. रोज रात्री मनुका भिजवून सकाळी खाल्ल्यास वजन नियंत्रित ठेवण्यासोबतच शरीरातील कर्करोगाच्या पेशींची वाढ रोखता येते. भिजवलेले मनुके खाल्ल्याने त्वचा निरोगी राहाते. ॲनेमियासारख्या समस्यांच धोका टळतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-Pakistan Petrol-Diesel: पाकिस्तानात सलग 5 वेळा पेट्रोल-डिझेल दरकपात, भारतात मात्र 4 वेळा दरवाढ; नेमकं कारण काय?

जीवन संपवण्याच्या काही तासांपूर्वी नाचत-गात होती प्रसिद्ध अभिनेत्री; पण नंतर घडलं भयंकर, संचिता उगलेनं टोकाचा निर्णय का घेतला?

गुंगीचं औषध देत अत्याचार, नंतर व्हिडिओ काढला अन्...; वर्गमित्राने तरुणीचा घात केला, भयंकर घटनेतील मौलवी फरार

Latest Marathi News Live Update : नागपूरातील संविधान चौकात उद्या कॉकरोज जनता पार्टीचं आंदोलन

भर गर्दीत रश्मिकाने घेतली विजयची खास काळजी; viral video पाहून नेटकरी म्हणाले, ‘अशी बायको सगळ्यांनाच मिळो!’

SCROLL FOR NEXT