Curry Leaves esakal
आरोग्य

Curry Leaves : सकाळी झोपेतून उठल्यावर आवर्जून खा कडीपत्ता, हे 5 आजार कायम राहातील दूर

कढीपत्ता कोणत्याही पदार्थाची चव सुधारू शकतो. मात्र याचे आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहितीये काय?

सकाळ ऑनलाईन टीम

Curry Leaves : भारतीय स्वयंपाकघरात कढीपत्ता मोठ्या प्रमाणात वापरला जातो. विशेषत: बहुतेक दक्षिण भारतीय पदार्थ हे कडीपत्त्याच्याच चवीचे असतात. कढीपत्ता कोणत्याही पदार्थाची चव सुधारू शकतो. मात्र याचे आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहितीये काय?

आरोग्याचा खजिना आहे कडीपत्ता

कडी पत्त्यामध्ये फॉस्फरस, कॅल्शियम, आयरन,कॉपर, व्हिटामिन आणि मॅग्नेशियमसारखे न्यूट्रिएंट्स असतात जे शरीरासाठी फार फायदेशीर असतात. सकाळी ३-४ कडी पत्ते खाण्याचे आरोग्यदायी फायदे आपण जाणून घेऊया.

1. डोळ्यांसाठी फायदेदायी

कडीपत्ता खाल्ल्याने, रातांधळेपणा किंवा डोळ्यांशी संबंधित इतर अनेक आजारांचा धोका टळतो कारण त्यात आवश्यक पोषक व्हिटॅमिन ए आढळते, जे दृष्टी वाढवण्यास मदत करते.

2. मधुमेहाच्या रूग्णांसाठीही फायदेशीर

मधुमेहाच्या रुग्णांना अनेकदा कढीपत्ता चावण्याचा सल्ला दिला जातो कारण त्यात हायपोग्लाइसेमिक गुणधर्म असतात जे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करतात.

3. पचनशक्ती वाढते

कडीपत्ता रोज सकाळी रिकाम्या पोटी चावावा कारण यामुळे पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठता, ऍसिडिटी, फुगणे यासह पोटाच्या सर्व समस्यांपासून सुटका मिळते.

4. इन्फेक्शनपासून करेल तुमचा बचाव

कडी पत्त्यामध्ये (Curry Leaves) अँटीफंगल और अँटीबायोटिक गुणधर्म आहेत ज्यामुळे अनेक प्रकारच्या इंफेक्शनपासून तुमचा बचाव होतो आणि रोगांपासूनही तुमचा बचाव होतो.

5. वजन कमी करण्यासही फायदेशीर

कडीपत्ता चघळल्याने वजन आणि पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते कारण त्यात इथाइल एसीटेट, महानिम्बाइन आणि डायक्लोरोमेथेन सारखे पोषक घटक असतात. (Health News)

तेव्हा दररोज कडीपत्ता खाल्ल्याने तुम्ही अनेक आजारांपासून दूर राहू शकता. तुमची रोगप्रतिकारशक्तीही वाढते. आणि तुम्ही एकदम फिट राहाता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका, पण सुरक्षा कच्ची! बीएमसी मुख्यालयातील बॅग स्कॅनर बंद; सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

Tenancy Agreement Rule: भाडेकरू आणि घरमालकांनो लक्ष द्या... सरकारकडून ‘नवीन भाडे करार २०२५’ लागू; काय आहेत नवे नियम?

Dondaicha News : दोंडाईचा नगर परिषदेत भाजपचा ऐतिहासिक विजय; नगराध्यक्षांसह ७ नगरसेवक बिनविरोध

Kolhapur Shivaji University: पदव्युत्तर अभ्यासकेंद्रांना कुलूप, अभ्यासक्रम बंद करण्यासाठी महाविद्यालयांचा प्रस्ताव

Jaykumar Rawal : तोंडाला फेस आणणारी घोडदौड; दोंडाईचा निवडणुकीत नगराध्यक्षपद व ७ जागा बिनविरोध, मंत्री जयकुमार रावल यांचा वरचष्मा

SCROLL FOR NEXT