panipuri sakal
आरोग्य

पावसाळ्यात पाणीपुरी खाणं म्हणजे थेट मरणालाच आमंत्रण; काळजी घ्या!

आरोग्य विभागाने या आजाराला "पाणीपुरीचा आजार" म्हटले आहे.

सकाळ डिजिटल टीम

सध्या राज्यभरात पावसाळा सुरू झाला त्यामुळे अनेक प्रत्येकजण आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचा प्रयत्न करताहेत. कारण पावसाळ्यात अनेक आजार होण्याची शक्यता असते. यात सर्वात जास्त धुमाकूळ घालणारा आजार म्हणजे टाइफाइड आहे.

सध्या तेलंगणामध्ये टाइफाइडची लाट उसळली आहे. अशात तेथील आरोग्य विभागाने धक्कादायक खुलासा केलाय. फेमस स्ट्रीट फूड पानी पुरीमुळे टाइफाइड रुग्णांचे प्रमाण अधिक वाढल्याचे त्यांनी म्हटले. (eating pani puri in monsoon rainy season is injurious to health)

सार्वजनिक आरोग्य संचालक डॉ जी श्रीनिवास राव यांनी टाइफाइडला "पाणीपुरीचा आजार" म्हटले आहे. अशा परिस्थितीत लोकांना पावसाळ्यात स्ट्रीट फूड विशेषतः पाणीपुरीपासून दूर राहण्याचा सल्ला दिलाय. पाणीपुरी विकणाऱ्या दुकानदारांनी स्वच्छतेची काळजी घ्यावी आणि फक्त स्वच्छ पाणी वापरावे, असेही डॉ.राव म्हणाले.

दूषित पाणी,अस्वच्छता आणि डास ही मलेरिया,ताप यांसारख्या हंगामी आजारांची मुख्य कारणे आहेत. तेलंगणामध्ये डायरियाचे 6,000 हून अधिक रुग्णांची नोंद झाली असून डेंग्यूच्या रुग्णांमध्येही वाढ होत आहे.

स्ट्रीट फूड टाळा-

पावसाळ्यात बहुतेक लोकांना पाणीपुरी, समोसे असे स्ट्रीट फूड खायला आवडते. पण पावसाळ्यात बाहेरचे कोणतेही स्ट्रीट फूड न खाण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला खायचे असल्यास तुम्ही ते घरी बनवून खाऊ शकता.

टाइफाइडची लक्षणे

सुरुवातीच्या काळात, टायफाइडच्या लक्षणांमध्ये दीर्घकाळापर्यंत ताप, पोटात दुखणे, डोकेदुखी, डायरीया आणि भूक न लागणे दिसून येते. यावर वेळीच उपचार न केल्यास त्याची लक्षणे वाढतात आणि तुम्हाला रक्ताच्या उलट्या, अंतर्गत रक्तस्त्राव आणि त्वचा पिवळी पडणे या समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India ODI Squad: भारताचा वनडे संघ जाहीर! इंग्लंड दौऱ्यातून शतक करणाऱ्या जैस्वालला डच्चू, तर विराट कोहलीबाबत काय झाला निर्णय?

Central Railway: कर्मचाऱ्यांचे हाल होणार! मध्य रेल्वेवर 2 दिवस विशेष ब्लॉक, काही लोकल रद्द; वेळापत्रकातही बदल, वाचा सविस्तर

पुण्यात गोळीबाराचा थरार! गुन्हेगाराला पकडायला गेल्यावर अचानक गोळीबार, पोलिसांनीही दिलं प्रत्युत्तर, काय घडलं?

Operation Tiger: महाराष्ट्रात पालटू शकतो गेम? आमदार फोडले पण उद्धव ठाकरेंचे खासदार फोडणे शिंदेंसाठी सोपे नाही; Inside Story काय?

Vaibhav Sooryavanshi: वैभव सुर्यवंशीचा जबरदस्त विक्रम अन् टोलेजंग फटकेबाजी पाहिली का? Video जो गोलंदाजांत धडकी भरवतोय..

SCROLL FOR NEXT