Parenting Tips
Parenting Tips esakal
आरोग्य

Parenting Tips: मुलं कंटाळा आलाय म्हणतायंत? रागावण्याऐवजी हे करता येईल!

सकाळ डिजिटल टीम

Every Time Child Get Bored What Should do : तुमचीही मुलं सतत मला बोअर होतं असं म्हणतात का? आता मी काय करू? असे प्रश्न तुम्हालाही इरीटेट करतात का? तज्ज्ञ म्हणतात काळजी करू नका, या प्रश्नाची उत्तरं प्रत्येकच घरात प्रत्येक पालकाला शोधावी लागतात.

याविषयी पॅरेंटिंग कोच शिल्पा इनामदार यज्ञोपवीत यांनी आपल्या सेल्फलेस पॅरेंटींग या पॉडकास्टमध्ये बालशिक्षण तज्ज्ञ आणि समुपदेशक अश्विनी गोडसे यांच्याशी संवाद साधला आहे. या पॉडकास्टद्वारे गोडसे यांनी मुलांच्या सततच्या कंटाळ्याचं काय करायचं, कसं हाताळायचं याविषयी अगदी सोप्या पर्यायांनी उत्तर दिलं आहे.

शिल्पा इनामदार यज्ञोपवीत म्हणतात की, मला आत्ताच्या आत्ता हे हवं असा हट्टीपणा, कंटाळा आलाय असे टँट्रम घरो घरी दिसतात. बहुतेक कोणताच पालक या दिव्याला पार केल्याशिवाय पुढे जाऊच शकत नसेल. मग अशावेळी रोजच येणाऱ्या सिच्युएशन्सशी पालकांनी कसं निपटावं? याविषयी गोडसे यांनी मार्गदर्शन केलं आहे. (Parenting Tips)

मुलांच्या या कंटाळ्याचं करायचं काय?

गोडसे म्हणतात, मला असं वाटतं की, बोअर होणं ही एक अत्यंत सर्जनशील अवस्था आहे. जेव्हा तुम्ही व्यस्त असतात तेव्हा तुम्हाला बोअर होत नाही. पण जेव्हा तुम्हाला सवड असते तेव्हाच तुम्हाला बोअर होतं. म्हणजे जेव्हा मुल म्हणतय मला बोअर होतंय तेव्हा त्यामागचं नेमकं कारण काय हे समजून घ्यायला हवं. इथं मुल तुम्हाला काही करायला सांगत नाहीये तर मी काय करू हा प्रश्न विचारतोय.

उपाय

  • पहिले तर मुलांना एकदम रागवून किंवा तोडून बोलू नका.

  • अरेच्चा काय करावं बरं... असा प्रश्नार्थक ऑप्शन द्या.

  • त्यांना आपल्यासोबत विचार करायला वेळ घ्या.

  • त्यांचा कंटाळा घालवण्यासाठी विनोदाचा आधार घ्यावा.

  • इथे इंटोरोगेशन प्रश्नांची सरबत्ती काम करत नाही.

  • कधीतरी खांद्यावर डोकं ठेऊन, कधी मांडीत लोळून त्यांचा कंटाळा जातो.

  • अशा वेळी एम्पथी, ह्युमरचा आधार घ्यावा.

  • तुझ्या पर्यायाला साथ देते. सोबत काही तरी करून बघुया त्यात काही सापडतं का शोधूया, असं आश्वासक बोलावं.

  • ठोस हे कर ते कर सांगितलं की, उत्तर नाहीच येणार.

  • त्यामुळे ज्याला कंटाळा आला तो त्यानेच घालवायचा.

  • कंस्ट्रक्टिव्ह मार्ग शोधायला आपण फक्त मदत करायची.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhagan Bhujbal : भुजबळ यांच्या नाराजीवर तटकरेंचे ‘ऑल इज वेल’; प्रदेशाध्यक्ष तटकरेंनी घेतली भुजबळांची भेट

Nupur Shikhare- Ira Khan : नुपूर शिखरेच्या आईचा बॉसी अंदाज; नवऱ्याची अवस्था पाहून आमिरची लेक म्हणाली...

SRH vs GT: सामना रद्द झाल्यानंतर काव्या मारन अन् विलियम्सनचं रियुनियन, सनरायझर्स हैदराबादन शेअर केला खास Video

VIDEO: पाकिस्तानी अभिनेत्रीसोबत भर कार्यक्रमात गैरवर्तन; व्हिडीओ शेअर करत म्हणाली, "दहा हजारपेक्षा जास्त लोकांचा जमाव..."

Latest Marathi News Live Update : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेचा तपास गुन्हे शाखेकडे

SCROLL FOR NEXT