salt
salt 
आरोग्य

एका दिवसात नेमकं किती मीठ खावे? WHOने दिली माहिती

सकाळ डिजिटल टीम

Recommended Amounts of salt: मीठ दोन गोष्टींपासून तयार होते, सोडियम आणि पोटॅशिअम. जागतिक आरोग्य संघटनेनुसार( WHO) आपण जे मीठ (Salt) खातो त्यामध्ये नेहमी सोडियमचे (Sodium) प्रमाण खूप जास्त असते आणि पोटॅशिअमचे (Potassium) प्रमाण खूप कमी असते. जगभरात सोडियमचे प्रमाण जास्त असल्यामुळे लाखो लोकांना ब्लड प्रेशरचा (Blood pressure) त्रास होतो आणि नेहमी हार्ट अॅटक, स्ट्रोक होण्याचा धोका असतो. WHOनुसार, बहूतेक लोक ९ ते १२ ग्रॅम मीठ रोज सेवन करतात ज्यामुळे जगभरात ब्लड प्रेशरच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. (Exactly how much salt to eat in a day )

Salt

लोकांनी जेवणात मीठ कमी कराव यासाठी WHOने एक उपक्रम सुरू केला आहे. त्याअंतर्गत युनाईडेट नेशन (United Nation)सदस्य देशांना २०२५ अंतर्गत मीठाचा वापर अर्ध्यावर आणण्याचा निर्णय घेतला आहे. हे ध्येय साध्य करण्यासाठी जगभरात दरवर्षी मीठामुळे होणारे २५ लाख मृत्यू कमी होऊ शकतात.

WHO आणि Harvard काय सांगते( What WHO and Harvard say)

WHOनुसार रोज एका प्रौढ व्यक्तीने ४ ग्रॅम पेक्षा जास्त मीठ खाऊ नये. मीठामध्ये दोन तत्व असतात. सोडियम आणि क्लोराईड. हार्वड मेडिकल जर्नलनुसार, सामान्य मिठात ४० टक्के सोडियम आणि ६० टक्के क्लोराईड असते. आपल्याला यापैकी फक्त ५०० मिलीग्रॅम सोडियमची आवश्यकता असते. त्यामुळे जास्त सोडियम आपल्या आरोग्यासाठी त्रासदायक ठरू शकते. त्यामुळे आपल्याला बल्ड प्रेशर, ह्रदया संबधीत आजार किंवा स्ट्रोकचा धोका वाढू शकतो. तसेच हाडांमध्ये कॅल्शिअमची गळती सुरू होईल.

अमेरिकेतील अमूमन १.५ चमचा मीठ लोक रोज खातात. त्यामध्ये साधारण ३४०० मिलीग्रॅम सोडियम असते. म्हणजेच गरजेपेक्षा ७ पट्ट जास्त. आपल्या देशातील लोक अमेरिकन पेक्षा जास्त मीठ खातात.

रोज किती मीठ खावे (How much salt to eat daily)

WHOनुसार, रोज एका प्रौढ व्यक्तीने २ ग्रॅम पेक्षा जास्त सोडियम नाही खाल्ले पाहिजे. म्हणजेच. रोज ४ ग्रॅम पेक्षा जास्त मीठ खाणे आरोग्याासाठी घातक ठरू शकते. पण युएस डायट्री (US Dietary) संदर्भामध्ये देखील अपर इंटेक लेवल निश्चित केली नाही पण अन्नातून मिळणऱ्या सोडियमची अपर लिमिट १५०० मिलीग्रॅमपेक्षा जास्त असू नये. पण, २३०० मिलीग्रॅमपेक्षा जास्त सोडियमचे सेवन धोकादायक ठरू शकते. जगाती सर्वत्र मर्यादेपेक्षा जास्त सोडियमचे सेवन केले जात नाही.

जास्त मिठाचा शरीरावर काय होतो परिणाम Exactly how much salt to eat in a day

सोडियमला किडनीमार्फत रक्तातून गाळून वेगळे केले जाते. पण जेव्हा क्षमते पेक्षा जास्त सोडियम रक्तामध्ये येते तेव्हा किडनीमधून गाळणे अशक्य होते. सोडियम जमा झाल्यामुळे शरीरामध्ये अधिक पाण्याची आवश्यकता निर्माण होते. रक्तामधून सोडियम वेगळे करण्यासाठी ह्रदयाला जास्त दाब कमी करावा लागतो. ह्रद्याला एक्स्ट्रा प्रेशर काम करण्यासाठी ब्लड प्रेशर जास्त होते आणि ज्यामुळे हार्ट अॅटक, स्ट्रोकचा धोका वाढतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Praful Patel : ''होय, 2004 पासून भाजपशी युती व्हावी म्हणून मी आग्रही होतो'', प्रफुल्ल पटेलांनी सगळाच इतिहास काढला

SRH vs PBKS Live Score : अभिषेक-क्लासेनची शानदार खेळी, हैदराबाद विजयासह प्लेऑफमध्ये; मात्र पंजाबची पराभवासह सांगता

Farooq Abdullah: फारुख अब्दुल्लांच्या सभेत चाकूहल्ला; 3 कार्यकर्ते जखमी, दोघांची स्थिती गंभीर

काँग्रेसमध्ये धुसफूस! मल्लिकार्जुन खरगेंच्या फोटोला काळे फासले, अधीर रंजन चौधरींबाबत केलेल्या वक्तव्यामुळे कार्यकर्ते नाराज

जम्मू काश्मीरमध्ये लोकसभेच्या मतदानापूर्वी दहशतवाद्यांचा हल्ला! भाजप कार्यकर्त्याचा मृत्यू, तर एक दाम्पत्य जखमी

SCROLL FOR NEXT