Health Tips
Health Tips esakal
आरोग्य

Exercise for PCOD: तुम्हाला PCOD प्रॉब्लेम आहे? हा एक व्यायाम देईल पूर्ण रिलीफ...

सकाळ डिजिटल टीम

Exercise For PCOD Problem : बदलती जीवनशैली, निकृष्ठ अन्न आणि चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी, व्यायामाचा अभाव यामुळे हल्ली महिलांमध्ये मासिक पाळीच्या समस्या मोठ्याप्रमाणात दिसून येतात. पाळीच्या काळात पोट कंबर दुखी, अनियमित पाळी, मूड स्विंग्ज अशा एक ना अनेक त्रासाला महिला सामोऱ्या जात असतात. पण हा त्रास हल्ली बऱ्याच जणींना होतो, असं म्हणत त्याकडे दुर्लक्ष करणं योग्य नाही. पुढे बऱ्याच गंभीर परिणामांना सामोरे जावे लागू शकते. त्यासाठी एक सोपा व्यायाम तुम्हाला रिलीफ देऊ शकेल.

सोशल मीडिया एन्फ्लुएंसर, योग प्रशिक्षक स्वामी हिरा योगी यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर याविषयीची पोस्ट टाकली आहे. यात त्यांनी महिलांना या त्रासातून सुटका मिळवण्यासाठी एक व्यायाम प्रकार दाखवला आहे. ही पोस्ट त्यांनी प्रात्यक्षिकासह टाकली आहे.

यात त्यांनी सांगितलेल्या स्टेप्स आणि नियम व्यवस्थित फॉलो केल्यास PCOD च्या त्रासातून महिलांना मुक्तता मिळू शकते असं त्यांनी सांगितलं आहे.

काय आहे व्यायाम?

  • प्रथम वज्रासनात ताठ बसावं.

  • मग मांडीवर आपल्या मुठींनी ३०-४० वेळा जोरात टॅप करावं.

  • नंतर आपले दोन्ही हात लोवर बॅकवर ठेवून कंबार वर उचलून गुडघ्यांवर बसावं.

  • नंतर कंबरेला पुढच्या दिशेने ढकलावे.

  • नंतर खाली वाकावे.

  • ही प्रक्रीया करताना श्वासावर लक्ष असू द्यावे.

  • ही प्रक्रीया २० च्या सेट ने सुरू करावी, नंतर वाढवत न्यावे.

  • अचुक व्यायामासाठी व्हिडीओ बघा.

हिरा योगी यांचे सोशल मीडियावर बरेच फॉलोवर्स आहेत. त्यांच्या या पोस्ट्स ना महिलांसब पुरुष युझर्ससुध्दा लाइक करत आहेत. त्यांनी महिलांच्या शारीरिक त्रासांना लक्षात घेऊन असे विविघ व्हिडीओज बनवलेले आहेत.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 phase 4 Election Voting LIVE : लोकसभेच्या चौथ्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात; महाराष्ट्रातील 14 गावांचं तेलंगणामध्ये मतदान

Lok Sabha Voting: मतदानाला सुरुवात होताच EVM मध्ये बिघाड, पुण्यासह, संभाजीनगरमध्ये मतदार खोळंबले

Chinese Spy: सायकलवरुन प्रवेश, मोबाईलमध्ये धक्कादायक फोटो अन्... गुप्तहेर असल्याचा संशय, चिनी नागरिक अटकेत

महिला लैंगिक शोषण प्रकरण : 'माजी पंतप्रधानांच्या नातवाला आणण्यासाठी SIT परदेशात जाणार नाही'; गृहमंत्र्यांची माहिती

Latest Marathi News Live Update : प्रज्वलला आणण्यासाठी एसआयटी परदेशात जाणार नाही - गृहमंत्री परमेश्वर

SCROLL FOR NEXT