थोडक्यात:
महिलांचे डोळ्यांच्या आरोग्याकडे कामाच्या आणि घरच्या जबाबदाऱ्यांमुळे अनेकदा दुर्लक्ष होते.
स्क्रीनचा वापर, प्रदूषण आणि हार्मोनल बदलांमुळे डोळ्यांच्या समस्या वाढत आहेत.
डोळ्यांच्या आरोग्यासाठी काही सोपे आणि प्रभावी उपाय अमलात आणणे गरजेचे आहे.
Exercises to relieve eye strain from screens: महिला सहसा घर, नोकरी आणि कुटुंबाच्या जबाबदाऱ्यांमध्ये इतक्या गुंततात की त्यांच्या डोळ्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. मोबाइल, कॉम्प्युटर, प्रदूषण आणि हॉर्मोनल बदलांमुळे डोळ्यांच्या समस्या वाढत आहेत. डोळ्यांच्या आरोग्यासाठी काही सोपे; पण प्रभावी उपाय बघूया.
२०-२०-२० रूल :
- प्रत्येक २० मिनिटांनी २० सेकंद २० फूट दूरच्या वस्तूकडे पहा.
- स्क्रीन ब्राइटनेस जास्त ठेवू नका. ‘डार्क मोड’ वापरा.
- डिजिटल ताण कमी करणारे चष्मे वापरा किंवा उपकरणांची सेटिंग्ज बदला.
डोळ्यांसाठी व्हिटॅमिन ए, सी, ई, ओमेगा-३ आवश्यक आहे. त्यासाठी खालील पदार्थांचा आहारात समावेश करा :
- गाजर, पालेभाजी (व्हिटॅमिन ए)
- संत्री, आंबा (व्हिटॅमिन सी)
- बदाम, अक्रोड (व्हिटॅमिन ई)
- दिवसातून ७-८ तास झोप घ्या, झोप कमी झाल्यास डोळे लाल होतात.
- रात्री मेकअप काढूनच झोपा, अन्यथा इन्फेक्शनचा धोका.
- पामिंग : हात घासून डोळ्यांवर एक मिनिट ठेवा. असे तीन वेळा करा.
- डॉक्टरांच्या सल्ल्याने ‘आय ड्रॉप्स’ वापरा.
- पुरेसे पाणी प्या.
- एअर कंडिशनरचा वापर खूप असल्यास ह्युमिडिफायर वापरा.
- काकडीचे स्लाईस डोळ्यावर ठेवा. त्यामुळे डोळ्यांना थंडावा मिळतो.
- आय रोटेशनसारखे व्यायाम, त्राटक ध्यान आणि इतर व्यायाम योग्य मार्गदर्शन घेऊन करा.
- वर्षातून एकदा डोळ्यांची तपासणी करा.
- कॉन्टॅक्ट लेन्स वापरत असाल, तर ‘हायजीन’चे नियम पाळा.
डोळे हे शरीराच्या सर्वांत संवेदनशील अवयवांपैकी एक आहेत. थोडीशी काळजी घेतल्यास चकचकीत, निरोगी डोळे टिकवता येतात. डोळे दुखणे, अस्पष्ट दिसणे, डोळे वारंवार चोळावे लागणे अशा काही समस्या असतील, तर वेळ न दवडता लगेच डॉक्टरांना दाखवा!
डोळ्यांचा थकवा कमी करण्यासाठी सर्वात प्रभावी उपाय कोणता आहे?
(What is the most effective way to reduce eye strain?)
➤ २०-२०-२० रूल (प्रत्येक २० मिनिटांनी, २० सेकंद, २० फूट दूर पाहणे) हा डिजिटल थकवा कमी करण्यासाठी सर्वात सोपा आणि परिणामकारक उपाय आहे.
डोळ्यांच्या आरोग्यासाठी कोणते अन्न सर्वाधिक उपयुक्त आहे?
(Which foods are most beneficial for eye health?)
➤ गाजर, पालेभाज्या, संत्री, आंबा, बदाम, अक्रोड आणि ओमेगा-३ युक्त पदार्थ डोळ्यांसाठी खूप उपयुक्त आहेत.
डोळ्यांना थंडावा देण्यासाठी कोणते घरगुती उपाय आहेत?
(What are some home remedies to soothe tired eyes?)
➤ काकडीचे स्लाईस डोळ्यावर ठेवणे, पामिंग करणे, आणि डोळ्यांवर थंड पाण्याचा शेक देणे हे घरगुती उपाय थकलेल्या डोळ्यांसाठी फायदेशीर ठरतात.
डोळ्यांची नियमित तपासणी किती वेळा करावी?
(How often should I get my eyes checked?)
➤ सामान्य परिस्थितीत दरवर्षी एकदा डोळ्यांची तपासणी करणे आवश्यक आहे. जर सतत डोळ्यांची तक्रार असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तपासणीचे अंतर ठरवा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.