Fasting Tips esakal
आरोग्य

Fasting Tips : मधुमेहाच्या रूग्णांनी नवरात्रीच्या उपवासात काय खावे काय खाऊ नये? इथे वाचा सविस्तर

उपवास करताना मधुमेहाच्या रूग्णांनी काय काळजी घ्यावी ते जाणून घेऊया.

साक्षी राऊत

Fasting Tips : नवरात्रीच्या नऊ दिवसांत उपवास करताना काय खावे काय खाऊ नये याबाबत घरातील वरिष्ठ मंडळींची कायम चर्चा चालते. मधुमेहाच्या रूग्णांसाठी तर योग्य आहार फार महत्वाचा आहे. नवरात्रीत बरेच लोक श्रद्धेने उपवास करतात. तुम्हाला मधुमेह असेल तर आणि तुम्हाला नऊ दिवस उपवास करायचे असेल तर तुम्ही या काही गोष्टी खाऊन उपवास करू शकता. शिवाय हे उपवास करताना मधुमेहाच्या रूग्णांनी काय काळजी घ्यावी ते जाणून घेऊया.

ब्लड शुगर कंट्रोलमध्ये ठेवा

ब्लड शुगर कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी ग्लुकोज लेव्हल चेक करत राहावी. शिवाय चांगली झोप घ्यावी. ब्लड शुगर कंट्रोलमध्ये ठेवत उपाय व्यवस्थितपणे केला जाऊ शकतो.

काय खावे?

उपवासात सफरचंद, संत्री, पपई यांसारखी फळे खावी. सोबतच शिंगाड्याचे पीठ, शिंगाडे तुम्ही खाऊ शकता.

मधुमेहाच्या रूग्णांनी काय खाऊ नये?

मधुमेहाच्या रूग्णांनी उपवासात गोड फळे खाऊ नये. जसे की केळी, लिची, अननस, चिकू. या सगळ्या फळांमध्ये कार्ब्स आणि नॅचरल शुगरचे प्रमाण जास्त असते. तेव्हा ही फळे खाणे टाळावे.

तळलेले पदार्थ खाऊ नये

उपवासात तयार होणारे बरेच पदार्थ हे तेलाचे किंवा तुपाचे असतात. मात्र मधुमेहाच्या रूग्णांनी हे पदार्थ खाणे टाळावे.

गोड पदार्थ टाळा

मधुमेहाच्या रूग्णांनी गोड पदार्थ कटाक्षाने टाळावे. कमी तेल आणि तुपात बनवलेले पदार्थ ब्लड शुगर कंट्रोलमध्ये ठेवण्यास मदत करतात.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

Sachin Ahir: उपसभापतिपदाची प्रतिष्ठा वाढवेन: सचिन अहिर यांची ग्वाही; कष्टकरी, कामगार, महाराष्ट्राशी बांधिलकी सोडणार नाही!

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

सौरऊर्जा मीटर जोडणीच्या ऑर्डरसाठी घेतली ४ हजार रुपयांची लाच; सहायक अभियंत्याला रंगेहात पकडलं...

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

SCROLL FOR NEXT