Fish Spa  esakal
आरोग्य

Fish Spa : तुम्हीही फिश स्पा करता का? मग हे वाचाच; या गंभीर आजारांना बळी पडू शकता!

ला तर फिश स्पाचे नेमके कोणते तोटे आहेत ते जाणून घ्या

साक्षी राऊत

Fish Spa : हल्ली स्किन केअर आणि ब्युटी केअर ट्रिटमेंटची महिलांमध्ये प्रचंड क्रेझ दिसून येते. एवढेच नाही तर लोक त्यांचे सौंदर्य वाढवण्यासाठी विविध प्रकारच्या ब्युटी ट्रिटमेंटवर हजारो रुपये खर्च करतात. पार्लरमध्ये फेशियल, व्हॅक्सिंग आणि पेडिक्युअर सारख्या ब्युटी ट्रिटमेंट महिला मोठ्या प्रमाणात करतात. (lifestyle)

भारतात जिथे फिश स्पा चा ट्रेंड वाढत चाललाय तिथे काही देशांमध्ये फिश स्पा ला पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. फिश पेडिक्युअर हा मसाजचाच एक प्रकार आहे ज्यामुळे तुम्हाला मेंटली रिलॅक्स वाटतं. मात्र फिश स्पा करून तुम्ही अनेक गंभीर आजारांना बळी पडू शकता. चला तर फिश स्पाचे नेमके कोणते तोटे आहेत ते जाणून घ्या.

फिश स्पा चे तोटे

फिश स्पा चा उपयोग लोक सुंदर आणि रिलॅक्स दिसण्यासाठी करू शकतात. फिश स्पा ही ब्युटी ट्रिटमेंट असून यासाठी पाण्याने भरलेल्या एका टँकमध्ये तुम्हाला पाय घालायचे असतात. असे म्हटले जाते की, या टँकमधील मासे तुमची डेड स्किन खातात आणि स्किनला सॉफ्ट आणि एक्सफोलिएट करण्याचे काम करते. मात्र फिश स्पाच्या मदतीने तुम्हाला स्किनशी संबंधित अनेक आजार उद्भवू शकतात.

१) वाढतो या आजारांचा धोका

फिश स्पा केल्याने तुम्हाला सोरायसिस, एक्झिमासह एड्स यांसारख्या गंभीर आजारांची लागण होऊ शकते. हे आजार कसे पसरतात ते समजून घेऊया. टँकमधील माशांच्या संपर्कात बरेच लोक येतात. अशावेळी एकाद्यास एड्ससारखा गंभीर आजार असेल तर तो पुढल्या व्यक्तीसही होण्याचा धोका वाढतो.

२) स्किन इन्फेक्शनचा धोका

फिश स्पा केल्याने तु्म्हाला स्किन इन्फेक्शनचाही धोका वाढतो. टँकमध्ये असेलेले माशांसह अनेक प्रकारचे बँक्टेरिया असतात. जर तुम्ही या बँक्टेरियाच्या संपर्कात आलेत तर इन्फेक्शनचा धोका वाढतो. याच कारणाने फिश स्पाला अमेरिका आणि कॅनडासह अनेक देशांमध्ये बंदी आहे.

३) स्किन टोन खराब होण्याचा धोका

फिश स्पा केल्याने तुमचा स्किन टोन खराब होऊ शकतो. योग्य प्रकारे पेडिक्युअर न केल्यास तुमची स्किन कोरडी आणि रफ दिसू शकते. ज्यामुळे तुमच्या स्किनचा टोन अनइव्हन होतो. (Skin Care)

४) नख खराब होण्याचा धोका

फिश स्पा दरम्यान अंगठे आणि नखांचे नुकसान होऊ शकते. टँकमधील पाणी वेळोवेळी स्वच्छ न केल्यासही आजारांचा धोका वाढतो. फिश स्पा दरम्यान माशांमुळे दुखणे, स्ट्रेस जाणवू शकतो. असा त्रास जाणवल्यास लगेच टँकमधून पाय बाहेर काढा. शिवाय तुमच्या त्वचेला कुठल्याही प्रकारची ईजा झाली असल्यास चुकूनही फिश स्पा करू नका. (Fish)

नोट : वरील लेख रिसर्चगेट वेबसाइटवरील माहितीच्या आधारावर लिहिण्यात आलेला आहे.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT