Kidney Health esakal
आरोग्य

Kidney Health : किडनीच्या समस्यांमुळे त्रस्त आहात? मग, आहारात 'या' खाद्यपदार्थांचा करा समावेश

Kidney Health : किडनी हा आपल्या शरीराचा अतिशय महत्वाचा अवयव आहे. आपल्या शरीरातील विषारी घटक बाहेर काढून टाकण्याचे काम किडनी करते.

Monika Lonkar –Kumbhar

Kidney Health : किडनी हा आपल्या शरीराचा अतिशय महत्वाचा अवयव आहे. आपल्या शरीरातील विषारी घटक बाहेर काढून टाकण्याचे काम किडनी करते. थोडक्यात आपले संपूर्ण शरीर डिटॉक्सीफाय करण्याचे काम किडनी करते. किडनी आपल्या शरीरातील रक्त शुद्ध करते.

ज्यामुळे, रक्तातील हानिकारक पदार्थ लघवीद्वारे बाहेर टाकले जातात आणि आरोग्य निरोगी राहते. निरोगी शरीरासाठी किडनीचे कार्य सुरळीतपणे असणे फार महत्वाचे आहे.

वाढत्या वयानुसार किडनीच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे, किडनीला हेल्दी ठेवण्यासाठी तुम्ही भरपूर पाणी पिण्यासोबतच योग्य आहार देखील घेतला पाहिजे. निरोगी किडनीसाठी नियमितपणे व्यायाम, भरपूर पाणी आणि संतुलित आहार घेणे गरजेचे आहे.

काही असे खाद्यपदार्थ आहेत की, जे किडनीला हेल्दी ठेवण्यासाठी फायदेशीर आहेत. कोणते आहेत हे खाद्यपदार्थ? चला तर मग जाणून घेऊयात.

लसूण

आपल्या भारतीय स्वयंपाकघरात लसणाचा वापर हमखास केला जातो. अनेक खाद्यपदार्थ बनवण्यासाठी लसणाचा वापर प्रामुख्याने केला जातो. आरोग्यासाठी फायदेशीर असणारा हा लसूण जेवणाची चव देखील वाढवतो.

लसूणमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स, अँटी-इंफ्लेमेंटरी आणि अँटी-बॅक्टेरिअल गुणधर्मांचे विपुल प्रमाण आढळून येते. त्यामुळे, किडनीचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते. किडनीसोबतच इतर आरोग्याच्या समस्या दूर करण्यासाठी लसूण फायदेशीर आहे. त्यामुळे, तुमच्या आहारात लसणाचा जरूर समावेश करा. (Garlic)

रताळे

रताळ्याला स्वीट पोटॅटो असे आवर्जून म्हटले जाते. रताळे आपल्या आरोग्यासोबतच निरोगी किडनीसाठी अतिशय फायदेशीर आहे. रताळ्यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन्स, फायबर्स आणि खनिजांचा समावेश आढळून येतो. त्यामुळे, हेल्दी किडनीसाठी रताळ्यांचा आहारात जरूर समावेश करा. (Sweet Potato)

फ्लॉवर

फ्लॉवर ही भाजी खायला सगळ्यांनाच आवडते. फ्लॉवरमध्ये विपुल प्रमाणात व्हिटॅमिन्स, खनिजे आणि पोटॅशिअमचा समावेश आढळून येतो. हेल्दी किडनीसाठी आणि निरोगी आरोग्यासाठी फ्लॉवरचा तुमच्या आहारात अवश्य समावेश करा. (Cauliflower)

ब्लूबेरीज

लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना ब्लूबेरीज खायला आवडते. आपल्या शरीराचा ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करण्यासाठी ब्लूबेरी अतिशय फायदेशीर आहे. ब्लूबेरीमध्ये असलेले पोषकघटक शरीरातील फ्री रॅडिकल्सचे नुकसान आणि त्यांची जळजळ कमी करण्यास मदत करतात. शिवाय, यामुळे, किडनीचे आरोग्य निरोगी राहते. त्यामुळे, तुमच्या आहारात ब्लूबेरीजचा जरूर समावेश करा. (Blueberries)

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

Manikarnika Ghat : काशीत कोणतेही मंदिर पाडले नाही! CM योगींनी सुनावलं; AI Video बनवून बदनामी! '

K.L Saigal documentary 2006 : भारदस्त ‘सैगल’युग

Bhandara Accident: क्रेनवरून पडून कामगाराचा मृत्यू; सनफ्लॅग कंपनीत भीषण अपघात, पाय घसरल्याने ७० फूट खाली कोसळला!

Sunday Special Recipe: रविवारी नाश्त्याला हेल्दी धमाका! झटपट बनवा 'स्प्राउट पालक टिक्की', रेसिपी लगेच नोट करा

Tiger Safari: अवघ्या २५०० रुपयांत करा 'टायगर सफारी! चित्रकूटच्या जंगलातील एक रोमांचक प्रवास, वाचा Trip Plan!

SCROLL FOR NEXT