Child Health esakal
आरोग्य

Child Health : कमी उंची ते मुलांच्या कंबरदुखीपर्यंत, बाबा रामदेव यांच्याकडून जाणून घ्या चाइल्ड हेल्थ टिप्स

दिवसभर गॅजेट्स वापरणे, जंकफूड खाण्याची सवय आणि फिजीकल अॅक्टिव्हिटीजचा अभाव या सगळ्यांचा प्रभाव मुलांच्या ग्रोथ फॅक्टरवर होतो

साक्षी राऊत

Child Health : हल्ली धावपळीच्या आयुष्यामुळे नियमित व्यायाम आणि हेल्दी डाएट मेंटेन करणे अनेकांना अशक्य झाले आहे. अनेक पालक हल्ली मुलांची उंची खुंटल्याने चिंतेत आहेत. मुलांच्या उंचीचा प्रभाव त्यांच्या सर्वांगिण विकासावर देखील होतो. दिवसभर गॅजेट्स वापरणे, जंकफूड खाण्याची सवय आणि फिजीकल अॅक्टिव्हिटीजचा अभाव या सगळ्यांचा प्रभाव मुलांच्या ग्रोथ फॅक्टरवर होतो.

न्यूट्रिशनच्या कमतरतेमुळे जवळपास ५२ टक्के मुलांची वाढ खुंटली आहे. देशभरात ५ वर्षांपर्यंतच्या मुलांमध्ये हवी तशी वाढ दिसत नसल्या कारणाने ३४ टक्के पालक चिंतेत असल्याचे आढळून आले आहे. अलीकडेच झालेल्या एका रिसर्चमधून असे निदर्शनास आले आहे की, हेल्दी डाएट आणि एक्सरसाइज व्यतिरिक्त आणखी एका घटकाचा मुलांच्या फिजीकल ग्रोथवर परिणाम होतो. ते घटक म्हणजे आनंद आणि सकारात्मक विचार.

रिसर्चनुसार ग्वेटेमालामध्ये स्ट्रेसमुळे पुरुषांची सरासरी उंची ५ फूट ३ इंच तर महिलांची सरासरी उंची पावणे पाच फूट आहे. तर नेदरलँडसारख्या आनंदी देशात पुरुषांची उंची ६ फूट आणि महिलांची ५ फूट उंची आहे. आपल्या मेंदूमध्ये एका दाण्याच्या स्वरूपात पिट्यूटरी ग्लँड असते. ज्याला पीयूष ग्रंथी असेही म्हटले जाते. ही ग्लँड हार्मोन रिलीज करते, मात्र स्ट्रेस वाढल्याने ग्रोथ हार्मोनवर प्रभाव पडतो. ज्याचा शारीरिक विकासावर परिणाम होतो.

योगगुरू बाबा रामदेव यांच्याकडून मुलांच्या वाढीसाठी योगासने आणि पोषक आहार यांच्याबाबत जाणून घेऊया. पोषक तत्त्वांच्या कमतरतेमुळे ५१.५ टक्के मुलांची शारीरिक वाढ खुंटलेली आहे.

भारतातील बरेच ५ वर्षाखालील मुले वाढ खुंटण्याच्या समस्येला सामोरे जाताय. २-१६ वर्ष वयोगटातील मुलांमध्ये हाडांचा विकास न होणे, पायाचे दुखणे, सूजन, वजन कमी होणे, चिडचिडेपणा ही लक्षणे दिसून येतात. ही लक्षणे मुलांच्या सर्वांगिण विकासावर प्रभाव पाडतात.

उंची वाढवण्यासाठी मुलांनी काय खावे?

गाजर

मेथी

सोया

डेअरी प्रोडक्ट्स (Health)

उंची वाढवण्यासाठीच्या काही टिप्स

रोज ३० मिनिटे योगा करा

जंकफूड टाळा

अर्धा तास उन्हात बसा

फळे-हिरव्या भाज्या खा

आउटडोअर गेम्स खेळा (Lifestyle)

मुलांमधील लठ्ठपणावर नियंत्रण ठेवण्यासाठी खास टिप्स

मुलांना घरचे जेवण द्या

फळे भाज्यांचे प्रमाण जास्त असावे

वर्कआउट

योगा नियमित करा

कॅल्शियम वाढवण्यासाठी

दूध शतावर

केळीचा शेक

खजूर-अंजीर शेक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'वारीत कोणी विशेष अजेंडा चालवण्यासाठी येत असतील, तर ते आम्ही खपवून घेणार नाही'; CM फडणवीसांचा कोणाला इशारा?

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : 'महाराष्ट्र चालवण्याची विठुरायाने शक्ती द्यावी', मुख्यमंत्री फडणवीसांनी पांडुरंगाला घातले साकडे

SCROLL FOR NEXT