Health Tips Sakal
आरोग्य

Health Tips : फळं खाल्यानंतर पाणी प्यावे का? जाणून घ्या काय सांगतात तज्ज्ञ

अनेकदा तुम्ही तुमच्या घरातील वडिलधाऱ्यांना फळं खाल्यानंतर पाणी पिऊ नये असे सांगताना ऐकले असेल.

सकाळ डिजिटल टीम

Health Tips : अनेकदा तुम्ही तुमच्या घरातील वडिलधाऱ्यांना फळं खाल्यानंतर पाणी पिऊ नये असे सांगताना ऐकले असेल. साधारण फळं खाल्यानंतर एक तासाने पाणी प्यावे असे सांगितले जाते. फळं खाल्यानंतर पाणी न पिण्यामागे अनेक शास्त्रीय कारणे आहेत. फळे खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिल्याने नेमके आरोग्यावर कोणते परिणाम होतात तसेच कोणती फळे खाल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये याबाबत आपण जाणून घेणार आहोत.

हेही वाचा : First Paralympic Winner : मुरलीकांत पेटकर सांगतायत अपंग खेळाडूंसमोरील आव्हाने

का पिऊ नये फळे खाल्यानंतर पाणी?

तज्ज्ञांच्या मते फळांमध्ये फ्रक्टोज म्हणजेच नैसर्गिक साखर असते, त्यामुळे फळे खाल्यानंतर लगेच पाणी पिल्याने पोटाशी संबंधित त्रासाला सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे फळे खाल्ल्यानंतर किमान 1 तास आधी किंवा 1 तासानंतर पाणी प्यावे. फळे खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिल्याने अन्न नीट पचत नाही, त्यामुळे गॅस आणि अॅसिडिटीची समस्या उद्भवू शकते.

कोणती फळे खाल्ल्यानंतर पिऊ नये पाणी

केळी : तज्ज्ञांच्या मते, केळी खाल्ल्यानंतर पाणी पिणे अयोग्य आहे. केळी खाल्ल्यानंतर पाणी, विशेषतः थंड पाणी पिल्याने अपचन होऊ शकते. याला इनडाइजेशन असेही म्हटले जाते. वास्तविक, केळी आणि थंड पाण्यातील गुणधर्म सारखेच असतात. ते एकाचवेळी शरीरात गेल्याने अपचनाची समस्या उद्भवू शकते. त्यामुळे केळी खाल्ल्यानंतर किमान 15 ते 20 मिनिटांनीच पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो.

पेरू : अनेकदा पेरू खाल्ल्यानंतर खूप तहान लागते आणि त्यामुळे अनेकजण गटागटा पाणी पितात. परंतु असे करणे हानिकारक ठरू शकते. यामुळे गॅसची समस्या उद्भवू शकते.

काकडी आणि टरबूज : काकडी आणि टरबूज ही फळे पचनक्रिया सुधारण्यासाठी आणि बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी उपयुक्त अशी ओळखली जातात, परंतु जर तुम्ही काकडी आणि टरबूजचे सेवन केल्यानंतर लगेचच भरपूर पाणी प्यायले तर, पोट खराब होऊन लूज मोशनची समस्या जाणवू शकते.

संत्री, अननस आणि द्राक्षे : सायट्रिक ऍसिड असलेली फळांमध्ये आधीपासूनच पाण्याचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे संत्री, अननस आणि द्राक्षांसारखी पाणीदार फळं खाल्यानंतर पाण्याचे सेवन केल्याने शरीरातील पीएच पातळी बिघडू शकते. यामुळे अपचन सारखी समस्या उद्भवू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT