Getting Tired esakal
आरोग्य

Getting Tired : तुमचाही गजनी होतोय ? सतत विसरायला झालं तर घाबरु नका, स्मरणशक्ती मजबूत करण्यासाठी करा 'या' गोष्टी

विसरणे हा मेंदूच्या कार्यप्रणालीचा एक भाग

सकाळ डिजिटल टीम

Getting Tired : विसरणे हा मेंदूच्या कार्यप्रणालीचा एक भाग आहे, त्यामुळे आठवणींमध्ये बदल होत राहणं सामान्य गोष्ट आहे. अनेकदा जेव्हा आपण अचानक कुठेतरी आपल्या ओळखीच्या व्यक्तीला भेटतो तेव्हा आपल्याला त्याचा चेहरा आठवतो पण त्याचे नाव आठवत नाही. अनेक वेळा वस्तू ठेवल्यानंतर आपण त्या कुठे ठेवल्या हे विसरतो आणि गरजेच्या वेळी लक्षात राहत नाही. खूप अभ्यास करा, पण परीक्षा केंद्रात गेल्यावर प्रश्नाचे उत्तर आठवत नाही.

अशा स्थितीत संभ्रम निर्माण होतो आणि आपण विचार करतो की आपल्याला विस्मरण किंवा स्मृतिभ्रंश झालाय का? लोकांचा आत्मविश्वास कमी होऊ लागतो. मात्र, काही तज्ञ याला सामान्य म्हणतात. त्यांच्या मते, ही एक सामान्य प्रक्रिया आहे, त्यामुळे घाबरू नका, परंतु तुमची स्मरणशक्ती मजबूत करण्याचा प्रयत्न करत रहा.

मेमरीजमधील बदल सामान्य

हर्बर्ट वेर्थिम यूएफ स्क्रिप्स इन्स्टिट्यूट फॉर बायोमेडिकल इनोव्हेशन अँड टेक्नॉलॉजी येथील न्यूरोसायन्सचे प्राध्यापक डॉ. रोनाल्ड डेव्हिस यांच्या मते, आपण दररोज अनेक गोष्टी पाहतो, वाचतो आणि ऐकतो. अशा परिस्थितीत मेंदू माहितीने भरून जातो आणि तो आठवणींवर नियंत्रण ठेवू लागतो. विसरणे हा मेंदूच्या कार्यप्रणालीचा एक भाग आहे, त्यामुळे आठवणींमध्ये बदल होणे सामान्य आहे.

डेव्हिड गेफेन स्कूल ऑफ मेडिसिनच्या डिपार्टमेंट ऑफ बिहेव्हियरल न्यूरोलॉजीचे संचालक डॉ. मारियो मेंडेझ यांच्या मते, स्मरणशक्ती सुधारण्यासाठी नियमितपणे काही पद्धतींचा अवलंब करा. उदाहरणार्थ, जर तुम्हाला एखाद्या ओळखीच्या व्यक्तीचे नाव आठवत नसेल तर त्याच्याशी संबंधित गोष्टी लक्षात ठेवा. पाच मिनिटांनंतर तुम्हाला कळेल की तुम्हाला त्याचे नाव आठवले आहे. गोष्टी व्यवस्थित ठेवा. रिमाइंडर नोट्स तयार करा, फोन अलर्ट वापरा. सराव करत राहा आणि उजळणी करत रहा.

आणखीन काय करायचं?

येलस्कूल ऑफ मेडिसिनमधील न्यूरोलॉजी आणि मानसशास्त्र विभागाचे असिस्टंट प्रोफेसर डॉ. अरमान फेशार्की यांच्या मते, स्मरणशक्ती वाढवण्यासाठी जीवनशैली सुधारा. मल्टीटास्किंग मर्यादित करा. हे मेंदूच्या आरोग्यासाठी चांगले नाही. एका वेळी एक गोष्ट करण्याचा प्रयत्न करा. तणाव टाळा. कमी झोप हे स्मरणशक्ती कमी होण्याचे प्रमुख कारण आहे, त्यामुळे पुरेशी झोप घ्या. आपला आहार निश्चित करा. दररोज अर्धा तास धावणे, चालणे, पोहणे किंवा सायकल चालवणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S. k. Patil: मुंबईचा अनभिषिक्त सम्राट; तरीही ठाकरे म्हणतात मराठी माणसाचा शत्रू! भाषणात उल्लेख केलेले स. का. पाटील नेमके कोण?

Devayani Farande : नाशिकच्या रस्त्यांवरील खड्ड्यांवरून महापालिकेत आरोप-प्रत्यारोप: आमदार फरांदे यांनी अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी केली

Devendra Fadnavis : राज ठाकरेंचे आभार, तर उद्धव ठाकरेंवर टीका, मराठी विजय मेळाव्यावर काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

Pune News : खडकमाळ आळीतील खड्ड्यांचे ‘मनसे’कडून हार-फुले वाहून पूजन

Maharashtra Politics: माळेगावच्या अध्यक्षपदी अजित पवार तर उपाध्यक्षपदी संगीता कोकरे यांची निवड

SCROLL FOR NEXT