Ginger Peel esakal
आरोग्य

Ginger Peel : आल्याची साल फेकून देऊ नका, सालीपासून बनवा हे डिटॉक्स वॉटर

काही लोक आल्याची साल कचरा समजून फेकून देतात. तुम्हीही असे करत असाल तर आजच थांबा

साक्षी राऊत

Ginger Peel : आल्यामध्ये भरपूर प्रमाणात आरोग्यदायी गुणधर्म असल्याने आलं शरीरासाठी पोषक आहे. चहामध्ये रोज आलं टाकण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. मात्र काही लोक आल्याची सालं कचरा समजून फेकून देतात. तुम्हीही असे करत असाल तर आजच थांबा. आल्याच्या सालापासून डिटॉक्स वॉटर तुम्ही बनवू शकता.

डिटॉक्स वॉटरचे सेवन केल्याने तुमच्या पोटातील आणि शरीरातील सर्व टॉक्झिक पदार्थ बाहेर पडतात. त्यामुळे या पाण्याचे सेवन केल्याने तुमची पचनक्रियाही निरोगी राहते, चला तर मग जाणून घेऊया आल्याच्या सालीपासून डिटॉक्स वॉटर कसे बनवायचे ते.

त्यासाठी लागणारे साहित्य

आल्याची साल १ टेस्पून

चहाची पाने १/४ टीस्पून

पाणी 2 कप

लिंबाचा रस 1 टीस्पून

चहाची पाने १/४ टीस्पून

पाणी 2 कप

लिंबाचा रस 1 टीस्पून

आल्याच्या सालीचे डिटॉक्स वॉटर कसे बनवायचे?

आल्याच्या सालीचे डिटॉक्स वॉटर बनवण्यासाठी सर्वप्रथम एक पॅन घ्या.

नंतर त्यात पाणी टाका आणि थोडा वेळ उकळायला ठेवा.

यानंतर, तुम्ही त्यात चहाची पाने टाका आणि सुमारे 2 मिनिटे गरम करा.

नंतर त्यात आल्याची साले टाकून ती चांगली उकळावी.

यानंतर गॅस बंद करा आणि गाळणीच्या मदतीने पाणी गाळून घ्या.

आता तुमचे आल्याच्या सालीचे डिटॉक्स वॉटर तयार आहे.

नंतर एका कपमध्ये गाळून घ्या आणि थोडा लिंबाचा रस टाकून प्या. (Health)

आल्याची सालीचे पाणी पिण्याचे फायदे

आल्याच्या सालीचे पाणी पिल्याने तुमचा मेटाबोलिझम पावर वाढतो. सोबतच तुमची चयापचनाची शक्तीही वाढते. आणि वजन कमी होण्यासही मदत होते. रोज सकाळी या पद्धतीने हे पाणी पिऊन बघा तुम्हाला फरक जाणवेल. (Benefits)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: वांद्रेतील कनेक्टिव्हिटी वाढणार! 'तो' स्कायवॉक लवकरच सुरू होणार; पादचाऱ्यांना मोठा दिलासा

सेटवर कसे वागत होते अजय आणि काजोल? पूर्णिमा तळवलकर यांनी सांगितला अनुभव; म्हणाल्या, ओळख असेल तरच...

Google Trends: 2025 मध्ये भारतीयांनी '5201314' हा कोड गुगलवर का शोधला? वर्षाच्या टॉप-5 कीवर्डमध्ये झाला समावेश; काय आहे रहस्य?

Accident News: भयंकर! भरधाव वेगाने येणाऱ्या कारने काही जणांना चिरडले, एकाचा मृत्यू, काय घडलं?

Latest Marathi News Update : कोल्हापूरच्या पिंपळगावमधील शासकीय होमिओपॅथी महाविद्यालयावरून वाद

SCROLL FOR NEXT