Health Alert esakal
आरोग्य

Health Alert : कपाळावर ही लक्षणे दिसताच लगेच डॉक्टरांशी संपर्क साधा, नाहीतर..

कपाळावर जर पिंपल्स, डाग, चट्टे, ब्लॅकहेड्स दिसल्यास शरीरात हार्मोनचा असमतोल झाला असल्याचे समजावे.

सकाळ ऑनलाईन टीम

Health Alert : शरीरात होणाऱ्या बदलावरून आपल्याला कोणता आजार होणार हे लक्षात येते. पण या आजारांचे मूळ हे शरिराच्या आत दडलेले असते. आपल्या पोटात दुखत असेल तर आत गडबड असल्याचे कळते. खोकला आला तर गळ्यात इन्फेक्शन आहे, असे समजतो. त्याचप्रमाणे चेहऱ्यांवरील बदलांमुळे आपल्या शरीराच्या आत काय सुरू आहे हे कळते. कपाळावर जर पिंपल्स, डाग, चट्टे, ब्लॅकहेड्स दिसल्यास शरीरात हार्मोनचा असमतोल झाला असल्याचे समजावे.

नेमके काय होते ?

चेहऱ्यावर पींपल्स, डाग दिसणे, त्वचा अचानक काळवंडणे, बारिक दाणे दिसणे, त्वचा तेलकट होणे, त्वचेवर सुरकुत्या पडणे अशी लक्षणे दिसली की, शरीराच्या कोणत्यातरी अवयवात गडबड असते. या संकेतावरून किडनी, फुप्फुस, शरीरातील टॉक्सिक, मेंदूचे विकार, आतड्याचे विकार, शरिरातील साखरेचे प्रमाण, कोलेस्ट्रॉल, युरिक अॅसिड वाढणे आदी समस्यांची माहिती मिळते, असे तज्ज्ञ सांगतात.

कपाळावर दिसणारी लक्षणे

कपाळाच्या वरील भागावर अधिक प्रमाणात पींपल्स आले तर किडनीची समस्या असू शकते.

कपाळ लाल होत असेल तर अधिक प्रमाणात दारू तसेच चहा, कॉफी, पिणे होत असल्याचे हे लक्षण आहे.

कपाळावर पांढरे डाग येत असतील तर दुध तसेच दुग्धजन्य पदार्थांचे सेवन अधिक प्रमाणात केल्याचे संकेत मिळतात. (Lifestyle)

कपाळाच्या मधला भाग लाल होत असल्यास जास्त गोड खाल्ल्यामुळे किंवा मनावर तणाव असल्याचे लक्षण आहे.

अपुऱ्या झोपेमुळेही कपाळाच्या खालच्या भागावर पींपल्स येतात. याशिवाय ताण, रक्ताभिसरणाची समस्या जाणवते. केसांत जास्त केमिकल्स किंवा तेलाचा जास्त वापर केल्यास कपाळावर पुरळ येतात. आयुर्वेदात यावर बऱ्यापैकी उपचार आहेत.

-डॉ. राहुल राऊत,

आयुर्वेद तज्ज्ञ, नागपूर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Independence Day : पाकिस्तानात स्वातंत्र्यदिनीच पसरली शोककळा, हवेत गोळीबारात चिमुकलीसह ३ ठार, ६५ गंभीर जखमी

Chh. Sambhajinagar: “मैं जा रहा हूँ” असा मेसेज पाठवून २३ वर्षीय युवकाने संपवले जीवन; वाळूज एमआयडीसी परिसर हादरला

Satara News: अकरावी प्रवेशासाठी आता ‘विशेष फेरी’; मंगळवारपासून प्रवेश निश्‍चित करता येणार, सुधारित वेळापत्रक जाहीर

Maharashtra Education: शालेय विद्यार्थ्यांच्या अभ्यासाची होतेय खिचडी; एकच शिक्षक शिकवताहेत दोन-तीन विषय, भरती ठप्प झाल्याचा परिणाम

माेठी बातमी!'सातारा जिल्ह्यातील ८४ हजार बहिणी अपात्र'; चुकीच्या पद्धतीने घेतला १५१ कोटींचा लाभ, जिल्ह्यात खळबळ

SCROLL FOR NEXT