हिवाळ्यात खजुर खा
हिवाळ्यात खजुर खा Google
आरोग्य

हिवाळ्यात खजुर खा ; हाडे मजबूत होण्याबरोबर हे 7 आजार होतील दूर

सकाळ डिजिटल टीम

हिवाळा सुरू झाला की स्किन कोरडी पडण्यास सुरुवात होते. याशिवाय केस गळतीला ही सुरुवात होते. यासाठी या दिवसात हेल्दी फुडचा समावेश केला पाहिजे. दुध, फळे, पालेभाज्या,अंडी, ड्रायफ्रूट्स खाणे फायदेशीर ठरते. याच बरोबर नियमित खजूरचा वापर जर केला तर याचा फायदा तुम्हाला पचनक्रिया राहण्यासाठी, हाडे मजबूत करण्यासाठी,शरीरात ऊर्जा तयार करण्यासाठा तसेच रक्ताची कमतरता दूर करण्यास मदत करते. यात लोह, खनिजे, कॅल्शियम, फॉस्फरस आणि जीवनसत्त्वे असल्याने थंडीच्या दिवसात याचा अधिक फायदा होतो. तुम्ही खजूर भिजवून, दूधातून किंवा खजूरमध्ये तूप घालून खाऊ शकता.

या आजारांपासून होईल सुटका

पचनक्रिया सुरळीत राहते

खजूरमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. रोज तीन ते चार खजूर भिजवून खाल्याने अन्नपचन चांगले होते.

हाडे मजबूत होतात

खजूरमध्ये कॅल्शिअम, पोटॅशिअम, मॅग्नेशिअम, काॅपर आणि सेलेनियम हाडांना मजबूत करण्यास मदत करतात.

शरीरात ऊर्जा राहते

खजूराला कार्बोहाइड्रेटचा स्त्रोत मानला जातो. शरीरात एनर्जी लेव्हल राखण्यासाठीही मदत करते.

रक्ताची कमतरता दूर होते

नियमितपणे खजूर खाल्ल्याने रक्ताची कमतरता दूर होते. दुधासोबत तुम्ही नियमित खजूर खाऊ शकता.

दातांच्या किडी पासून रक्षण करतो

खजूरमध्ये फ्लोरिन नावाचे तत्व असेत जे दातांवरील प्लेक काढून टाकण्यास मदत करतेच शिवाय पोकळीपासून संरक्षण करते. याशिवाय दातांचे इनॅमल मजबूत करते.

त्वचा आणि केसांसाठी उपयुक्त

त्वचेची लवचिकता टिकवून ठेवण्याचे काम खजूर करते. यात व्हिटॅमिन भरपूर प्रमाणात असते. यामुळे केस आणि त्वचेला याचा चांगला फायदा होतो.

दृष्टी वाढण्यास मदत करते

खजूरात व्हिटॅमिन ए असते. रोज नियमित खजूर खाल्याने दृष्टी वाढण्यास मदत होते.

रक्तदाबासाठी उपयुक्त

रक्तदाब कमी करण्यास खजूर मदत करते.

दुध, खजूर खाल्याने खोकल्यापासून आराम मिळतो.

निद्रानाशावर उपचार करण्यासाठी याची चांगली मदत होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : भाजपचे दिल्ली तख्त ‘महाराष्ट्र’च खेचणार : उद्धव ठाकरे

Dushyant Chautala: "...तर सरकार पाडण्यास मदत करू," माजी उपमुख्यमंत्र्याने काँग्रेसला पाठिंबा देत वाढवले भाजपचे टेन्शन

Gaurav More : गुडबाय हास्यजत्रा ; गौरवने घेतला हास्यजत्रेचा निरोप ; समीर दादा म्हणाला...

"मी माझ्या मुली घेऊन चालले..."; व्हिडिओ पोस्ट करत विवाहितेने जीवन संपवलं, दोन मुलींना दिलं विष

Latest Marathi News Live Update : MoCA ने एअर इंडिया एक्स्प्रेसकडून उड्डाणे रद्द करण्याबाबत मागवला अहवाल

SCROLL FOR NEXT