Benefits of Shalabhasana esakal
आरोग्य

Benefits of Shalabhasana : पोटाच्या समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर आहे शलभासन, जाणून घ्या करण्याची पद्धत अन् फायदे

Benefits of Shalabhasana : योगासनांचा नियमितपणे सराव केल्याने आरोग्याच्या विविध समस्या दूर होण्यास मदत होते.

Monika Lonkar –Kumbhar

Benefits of Shalabhasana : योगासनांचा नियमितपणे सराव केल्याने आरोग्याच्या विविध समस्या दूर होण्यास मदत होते. त्यासोबतच आपल्या शारिरीक आणि मानसिक आरोग्यासाठी योगा अतिशय फायदेशीर आहे. विविध प्रकारची योगासने ही विविध समस्यांमध्ये प्रभावी ठरू शकतात.

परंतु, अनेकांना असा प्रश्न पडतो की, कोणते असे योगासन आहे? जे आपली बिघडलेली जीवनशैली सुधारण्यास मदत करेल आणि विविध आरोग्याच्या समस्या दूर करण्यास लाभदायी ठरेल, तर असे एक योगासन आहे. या योगासनाचे नाव आहे शलभासन.

बिघडलेल्या जीवनशैलीशी संबंधित समस्यांवर मात करण्यासाठी शलभासनाचा सराव केला जातो. या योगासनाचा नियमितपणे सराव केल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात. शलभासन करण्याची योग्य पद्धत काय? आणि शलभासनाचे फायदे कोणते आहेत? चला तर मग जाणून घेऊयात.

शलभासन करण्याची योग्य पद्धत खालीलप्रमाणे :

  • शलभासन हे योगासन करण्यासाठी सर्वात आधी योगा मॅटवर पोटावर झोपा.

  • आता तुमच्या दोन्ही पायांमध्ये थोडे अंतर ठेवून स्थिर राहण्याचा प्रयत्न करा.

  • या स्थितीमध्ये तुमचे दोन्ही हात सरळ रेषेत तुमच्या मांड्याजवळ ठेवा.

  • आता दीर्घ श्वास घेऊन तुमचे डोके वरच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करा.

  • त्यानंतर, तुमचे हात आणि पाय हे देखील वरच्या दिशेने न्या.

  • या स्थितीमध्ये तुम्हाला तुमचे शरीर हवेत तरंगत असल्याचा भास होईल.

  • काही सेकंद या स्थितीमध्ये राहिल्यानंतर तुम्हाला शरीरात ताण जाणवेल.

  • आता हळूहळू तुमच्या सामान्य स्थितीमध्ये परत या.

शलभासन योगासनाचे आरोग्यदायी फायदे खालीलप्रमाणे :

  • शलभासन या योगासनाचा नियमितपणे सराव केल्याने पाठीचा कणा, मान, छाती आणि खांदे मजबूत होण्यास मदत होते.

  • यासोबतच फुफ्फुसांचे आरोग्य चांगल्या प्रकारे राखण्यासाठी शलभासन फायदेशीर आहे.

  • विशेष म्हणजे पोटाच्या समस्या दूर करण्यासाठी शलभासन हा रामबाण उपाय आहे. त्यामुळे, ज्या लोकांना पोटाच्या समस्या आहेत, त्यांनी दररोज शलभासनाचा सराव करावा.

  • या योगासनाचा नियमित सराव केल्याने मांड्या आणि पायांचे स्नायू मजबूत होतात.

  • मधुमेह आणि प्रोस्टेट ग्रंथींच्या समस्यांवर उत्तम उपाय म्हणजे शलभासन या योगासनाचा नियमित सराव करणे होय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT