Benefits of Soaked Peanuts esakal
आरोग्य

Benefits of Soaked Peanuts : भिजवलेले शेंगदाणे आरोग्यासाठी आहेत लाभदायी, जाणून घ्या फायदे

शेंगदाण्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पौष्टिक घटकांचा समावेश आढळून येतो.

Monika Lonkar –Kumbhar

Benefits of Soaked Peanuts : प्रत्येकाचे मॉर्निंग रूटीन हे वेगवेगळ्या प्रकारचे असते. कुणाला सकाळची सुरूवात ही भिजवलेले ड्रायफ्रूट्स खाऊन करायला आवडते, तर कुणाला मोड आलेल्या कडधान्यांचे सॅलेड खायला आवडते. हेल्दी ड्रिंक्स, फळे किंवा ग्रीन टीने काहींची सकाळ होते.

शेंगदाण्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पौष्टिक घटकांचा समावेश आढळून येतो. स्वयंपाक घरात अनेक भाज्यांमध्ये, विविध प्रकारच्या रेसिपीजमध्ये शेंगदाण्यांचा वापर आपण करतो. इतकचं काय, शेंगदाण्याचे लाडू देखील बनवले जातात.

परंतु, तुम्हाला हे माहित आहे का? भिजवलेले शेंगदाणे खाण्याचे अनेक फायदे आपल्या आरोग्याला होतात. कोणते आहेत हे फायदे? चला तर मग जाणून घेऊयात.

भिजवलेले शेंगदाणे खाण्याचे फायदे खालीलप्रमाणे :

गॅस आणि अ‍ॅसिडिटीपासून मिळतो आराम

शेंगदाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात लोह, मॅंगनिज, कॉपर, कॅल्शिअम आणि सेलेनियम सारखे घटक आढळून येतात. त्यामुळे, रिकाम्या पोटी भिजवलेले शेंगदाणे खाल्ल्याने गॅस आणि अ‍ॅसिडिटीपासून आराम मिळण्यास मदत होते.

त्यामुळे, ज्या लोकांना गॅस आणि अ‍ॅसिडिटीच्या समस्येचा नेहमी त्रास होतो, अशा लोकांनी आवर्जून रात्री झोपताना १०-१२ शेंगदाणे पाण्यात भिजत घालावेत. त्यानंतर, दुसऱ्या दिवशी सकाळी रिकाम्या पोटी या शेंगदाण्यांचे सेवन करावे.

पाठीचे दुखणे होते कमी

ज्यांना पाठदुखीचा त्रास आहे, अशा लोकांनी पाठदुखीवर आराम मिळवण्यासाठी नियमितपणे भिजवलेल्या शेंगदाण्यांसोबत गुळाचे सेवन अवश्य करायला हवे. शेंगदाण्यांसोबत गुळ देखील आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे.

पचनक्षमता सुधारते

शेंगदाण्यांमध्ये पोषकघटकांचे मुबलक प्रमाण आढळून येते. फायबर्सचा ही मोठ्या प्रमाणात समावेश शेंगदाण्यांमध्ये आढळून येतो. या फायबर्समुळे आपल्या शरीराची पचनक्षमता सुरळीत होण्यास मदत होते. त्यामुळे, ज्या लोकांना पचनाची समस्या आहे. अशा लोकांनी सकाळी रिकाम्या पोटी भिजवलेल्या शेंगदाण्यांचे जरूर सेवन करावे.

खोकल्यामध्ये फायदेशीर

हो तुम्ही वाचलं ते खरं आहे. भिजवलेले शेंगदाणे रिकाम्या पोटी खाल्ल्यावर तुम्हाला खोकल्यापासून आराम मिळू शकतो. तसेच, तुमचे खोकल्याचे इंन्फेक्शन देखील यामुळे थांबू शकते.

भिजवलेल्या शेंगदाण्यांमध्ये भरपूर फायबर्स असल्यामुळे, आपली रोगप्रतिकारक क्षमता मजबूत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Wani News : सप्तशृंगगडावर आज रंगणार कोजागरीचा महासोहळा; कावड यात्रेसह तृतीयपंथीयांचा छबिना उत्सव

Aapli ST App : बस स्टँडवर एसटीची वाट बघत थांबताय? तुमचं टेन्शन मिटलं! ‘Aapli ST’ अ‍ॅपवर कळणार Live लोकेशन, पण कसं? पाहा एका क्लिकवर

थैलावाचा साधेपणा! रस्त्यावर केलं जेवण, कामातून घेतला आध्यात्मिक ब्रेक

Mud Volcano: अंदमानमधील चिखलाचा ज्वालामुखी सक्रिय; भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभाग पाठवणार संशोधन पथक

Ahilyanagar News:'अहिल्यानगर शहरात प्रेम विवाहातून प्राणघातक हल्ले वाढले'; जोडप्यांचा टोकाचा निर्णय..

SCROLL FOR NEXT