health sakal
आरोग्य

Health Care News : जिममध्ये जाण्याचा कंटाळा येतोय? मग ट्राय करा 'हे' 4 व्यायाम; हृदय अन् मन राहील निरोगी

जिममध्ये जाण्याचा कंटाळा येतोय? मग ट्राय करा 'हे' 4 व्यायाम...

Aishwarya Musale

प्रत्येकाला निरोगी राहायचे असते. सध्या कामाच्या वाढत्या ताणामुळे तसेच बिघडलेल्या जीवनशैलीमुळे अनेक आजार बळावले आहेत. त्यामुळे शारीरिक आरोग्याकडे लक्ष देणं महत्त्वाचं झालं आहे. आरोग्याच्या चांगल्या सवयी लावण्याचा प्रयत्न कित्येक जण करत असतात. काहींना जिममध्ये जाऊन व्यायाम करणं शक्य होतं. पण काहींना इच्छा असूनही जिमला जाता येत नाही. अशा वेळी तुम्ही घरच्या घरी राहूनसुद्धा व्यायाम करू शकता. आणि तंदुरुस्त राहू शकता.

आज आम्ही तुम्हाला अशाच काही व्यायामांबद्दल सांगणार आहोत, ज्याचा नियमित सराव तुमचे हृदय, मन तसेच संपूर्ण शरीर निरोगी ठेवण्यास उपयुक्त ठरेल. खरं तर, आम्ही काही एरोबिक व्यायामाबद्दल बोलत आहोत जे जिम मध्ये न जाता घरी सहज करता येतात.

वॉकिंग किंवा जॉगिंग

हृदयाच्या रुग्णांना हलका व्यायाम करण्याचा सल्ला दिला जातो, त्यामुळे या लोकांसाठी वॉकिंग किंवा जॉगिंग हा सर्वोत्तम व्यायाम मानला जातो. यामुळे हृदयाच्या आरोग्यावर कोणताही अतिरिक्त दबाव किंवा परिणाम होत नाही.

एरोबिक डान्स

एरोबिक डान्स हा एरोबिक व्यायामांपैकी सर्वात लोकप्रिय आहे. अशा परिस्थितीत ते शरीरात हॅप्पी हार्मोन्सचे परिसंचरण वाढवते, जे हृदय आणि मेंदूसाठी फायदेशीर मानले जाते.

एरोबिक डान्स करताना शरीरातील रक्ताभिसरण वाढते. तसेच हृदय चांगल्या प्रकारे काम करते. पण जर कोणाला हृदयविकाराचा गंभीर आजार असेल तर त्याने एरोबिक डान्स किंवा कोणताही डान्स करताना काळजी घ्यावी. जास्त तीव्रतेने नृत्य केल्याने हृदयाच्या आरोग्यावरही नकारात्मक परिणाम होतो.

सायकलिंग

सायकलिंग हा हृदयरोग्यांसाठी एक चांगला एरोबिक व्यायाम आहे, ज्यामुळे हात आणि पाय तसेच हृदयाचे स्नायू मजबूत होतात. सायकल चालवल्याने शरीरातील रक्ताभिसरणही सुधारते. अशा प्रकारे ते हृदय निरोगी ठेवण्यास उपयुक्त आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sarfaraz Khan : रिषभ पंतमुळे भारत अ संघात सर्फराजची निवड झाली नाही; युवा फलंदाजाला संघात स्थान मिळण्यासाठी दिला गेलाय सल्ला...

Kolhapur Buffalo Road Show : कोल्हापुरात अनोखा रोड शो, Yamaha च्या मागे म्हशी पळवण्याची परंपरा; नटलेल्या म्हशी बघून तुम्हीही म्हणाल, 'सुंदरी सुदंरी...'

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये टवाळखोरांचा धुडगूस, वाहनांची केली तोडफोड

Recharge : फक्त 599 रुपयांत जॅकपॉट! रॉकेट स्पीडचं इंटरनेट; Disney+ Hotstar अन् 17 हजारवालं AI टूल फ्री, अनलिमिटेड कॉलिंग अन् इंटरनेट

Pune saras Baug : पुण्यात दिवाळी पहाट कार्यक्रमाला गालबोट; दोन गटात हाणामारी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT