Asthma sakal
आरोग्य

Yoga For Asthma: दम्याचे रुग्ण आहात? मग हे योगासन करा आणि आराम मिळवा!

काही लोक दम्यासाठी घरगुती उपाय करून बघतात.

Aishwarya Musale

अस्थमा ज्याला ‘दमा’ असेही म्हणतात, हा एक असा आजार आहे ज्यामध्ये फुफ्फुसांना श्वास घेणे कठीण होते. दम्यामध्ये, रुग्णाच्या श्वसनलिकेवर सूज येते, ज्यामुळे वायुमार्ग संकुचित होतात. अशा स्थितीत श्वासोच्छ्वास श्वसनलिकेद्वारे फुफ्फुसाच्या आत आणि बाहेर जातो. जेव्हा, या भागामध्ये सूज वाढते तेव्हा श्वास घेणे कठीण होते. दम्याच्या रुग्णाला श्वास लागणे, खोकला, घरघर आणि छातीत जडपणा जाणवणे अशी लक्षणे दिसतात. कधी-कधी हा आजार इतका गंभीर स्वरूप धारण करतो की त्याबद्दल काहीच सांगता येत नाही.

आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की या सोप्या योगामुळे या आजाराचे रुग्ण घरी बसून बरे होऊ शकतात. काही लोक दम्यासाठी घरगुती उपाय करून बघतात, ज्यात लगेच फरक दिसतो. दम्याच्या आजारात फुफ्फुसांना योग्य प्रमाणात ऑक्सिजन मिळत नाही, त्यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो.

ही योगासने दम्याच्या रुग्णांसाठी प्रभावी आहेत:

धनुरासन

दम्याच्या रुग्णाने धनुरासन केले तर ते त्याच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. या आसनाच्या वेळी, धनुष्याप्रमाणे स्वत: ला वाकवा. अस्थमाच्या रुग्णांनी हे आसन रोज घरीच करावे. यामुळे तुम्हाला त्वरित आराम मिळेल.

शवासन योग

शवासन योग करणे खूप सोपे आहे. असे केल्याने तुम्ही दमा सहज नियंत्रणात ठेवू शकता. या योगाने दम्याच्या रुग्णाला खूप आराम मिळतो. एवढेच नाही तर असे केल्याने टेन्शन, बीपी, मधुमेह, नैराश्य आणि हृदयविकार बरे होऊ शकतात. यामुळे स्मरणशक्ती सुधारते आणि एकाग्रताही वाढते.

पवन मुक्तासन

पवन मुक्तासन केल्याने दम्याच्या आजारात खूप फायदा होतो. या आजाराच्या रुग्णांसाठी हे आसन चांगले आहे. हे आसन व्यवस्थित केल्याने शरीरातून घाणेरडी हवा बाहेर पडते.

भुजंगासन  

भुजंगासन दम्याच्या रुग्णांसाठी खूप चांगले आहे. या योगासनामुळे छातीतील श्वासोच्छवासाचा त्रास दूर होतो. यामुळे रक्ताभिसरण सुरळीत होण्यास मदत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्राला मिळणार १२ नवे IPS अधिकारी; पाच महिला अधिकाऱ्यांचा समावेश, ३१ ऑगस्टपासून सांभाळणार जबाबदारी, वाचा यादी

MD Drugs Crackdown: न्हावरेत एमडी ड्रग्सविरोधात संयुक्त धडक कारवाई; ११.९० लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघे अटकेत तर एक फरार

Crime News: माळेगाव पोलिसांची अवैध दारू वाहतूक प्रकरणी कारवाई; दोन जण अटक, ४.४६ लाखांचा मुद्देमाल जप्त

नेपाळमध्ये निसर्गाचा कहर! भोटेकोशी नदीला महापूर, गाड्या-इमारती क्षणार्धात वाहून गेल्या, धक्कादायक VIDEO समोर...

"मी फक्त 50 रुपयांत केस कापतो"; कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचं विधान; संपत्तीबाबत भाजपचा खुलासा

SCROLL FOR NEXT