Healthy Diet Sakal
आरोग्य

Healthy Diet : वजन वाढीच्या भीतीनं गोड पदार्थ खाणे टाळताय? मग ‘या’ पौष्टिक खाद्याने क्रेविंग करा शांत

Jaggery Health Benefits : ज्या अन्नपदार्थांमध्ये साखरेचा समावेश असतो, त्यामुळे शरीरामध्ये अतिरिक्त चरबी वेगाने वाढते. पण गोड पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास काय करावे?

सकाळ डिजिटल टीम

Jaggery Health Benefits News : वजन कमी करण्यासाठी जेव्हा डाएट प्लान तयार केला जातो, तेव्हा सर्वप्रथम पदार्थांच्या यादीतून गोड पदार्थ वर्ज्य करावे लागतात. कारण साखरेचा समावेश असलेल्या अन्नपदार्थांमध्ये कॅलरीचे प्रमाण अधिक असते. यामुळे शरीरात फॅट्स वाढतात. 

म्हणूनच काही जण वेट लॉस जर्नीदरम्यान आहारात साखरयुक्त पदार्थांचा समावेश करणं टाळतात. पण गोड पदार्थ खाल्ल्याशिवाय काही जणांचा दिवसच पूर्ण होत नाही. असे लोक थोडंसं का होईना पण मिठाई वगैरे सारखे खाद्यपदार्थांचे सेवन करतात आणि मग पश्चातापही करत बसतात.  

पश्चातापाची वेळ न येताही आपण स्वीट्स खाऊ शकता, असे तुम्हाला कोणी सांगितलं तर? हो हे शक्य आहे. आहारात एका अशा खाद्याचा आपण समावेश करू शकता, ज्यामुळे स्वीट्स खाण्याचे क्रेविंग नक्की शांत होऊ शकते.  चला तर जाणून घेऊया याबद्दल सविस्तर माहिती…

गूळ खाऊ स्वीट्सचे क्रेविंग करा शांत 

गूळ हे एक नॅचरल स्वीटनर आहे, ज्यामुळे शरीराची चयापचयाची क्षमता (metabolism) मजबूत होण्यास मदत मिळते.  यामुळे शरीराची पचनक्रिया देखील (digestive) सुरळीत सुरू राहते. सोबत गुळामध्ये लोह या पोषणतत्त्वाचे प्रमाण अधिक आहे, ज्यामुळे रक्त शुद्ध होण्यासोबत शरीरात रक्ताचे प्रमाणही वाढण्यास मदत मिळते.  

रोगप्रतिकारकशक्ती वाढते

गुळाचे सेवन केल्यानं शरीराचे रोगप्रतिकारकशक्तीही मजबूत होण्यास मदत मिळते. कारण यामध्ये व्हिटॅमिन सी (vitamin c) आणि झिंक (zinc) या घटकांचे प्रमाण अधिक असते. यामुळे सांधेदुखीच्या (joint pain) समस्येतून आराम मिळतो तसंच चेहऱ्यावरील मुरुमे व डागांची समस्याही दूर होऊ शकते.

कफची समस्या दूर करण्यास लाभदायक 

दम्याची समस्या असणाऱ्या रूग्णांनी गुळाचे सेवन करणे फायदेशीर ठरू शकते. सर्दी, खोकला आणि कफशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी गुळाचा चहा प्यावा. सर्दी-खोकला, तापाची लागण झाली असल्यास बहुतांश जण काढ्यामध्ये गूळ देखील मिक्स करून सेवन करतात. तसंच गुळामध्ये फॉस्फरस हे घटक असते, जे दातांच्या आरोग्याकरिता पोषक असते. 

मधुमेहाच्या रूग्णांनी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा

पण जे लोक मधुमेहग्रस्त (blood sugar) आहेत, त्यांनी गुळाचा आहारात समावेश करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. गुळामध्ये लोह, फॉलिक अॅसिड, कॅल्शिअम आणि पोटॅशिअम यासारख्या पोषकघटकांचा मोठ्या प्रमाणात साठा आहे, जे आरोग्यास लाभदायक आहेत.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईत सेनाभवनासमोर राडा! शिवसैनिक पोलिसांच्या ताब्यात, आदित्य-तेजस ठाकरे आक्रमक

CJP Protest Streets Again : "आंदोलन करणार नाही अशी कोणत्याच बॉण्डवर सही केली नाही; पुन्हा रस्त्यावर उतरणार!"; अभिजीत दिपके यांचा थेट इशारा

Maharashtra Live News : मुंबईत ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन

Beed Jeweller Fraud: साेन्याची मोड तपासली, तरी फसवणूक झाली; धारूरच्या सराफाला १७.५० लाखांना गंडा, नेमकं काय घडलं?

Someshwar Sugar Factory: सोमेश्वर कारखान्याच्या मतमोजणीसाठी वाहतुकीत बदल; बारामती-निरा मार्गावरील रस्ता २४ तास बंद, नेमका कसा असेल बदल?

SCROLL FOR NEXT