walk sakal
आरोग्य

Health Care News : दररोज 30 मिनिटे चालल्याने शरीरात दिसतात हे जबरदस्त बदल, तासन् तास जिममध्ये घाम गाळण्याची गरज नाही

आजारांपासून दूर राहण्यासाठी दररोज ३० मिनिटे चाला..

सकाळ डिजिटल टीम

चालणे आपल्या आरोग्यासाठी खूप चांगले असते हे सर्वांनाच माहित आहे, परंतु चालण्यामुळे आपल्या शरीरात जे बदल होतात त्याबद्दल कदाचित तुम्हाला माहिती नसेल. चालणे आरोग्यासाठी चांगले मानले जाते कारण त्याचा परिणाम शरीराच्या एकूण आरोग्यावर होतो. हा केवळ पायांचा व्यायाम नाही तर त्याचा तुमच्या मेंदूवरही मोठ्या प्रमाणात परिणाम होऊ शकतो.

इतर कोणत्याही व्यायामाच्या तुलनेत, चालणे आपल्याला कमी थकवा आणते. तसेच ते वजन कमी करण्यासाठी खूप चांगले आहे. याचा तुमच्या एकूण आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. चला तर मग आज चालण्याबद्दल थोडे जाणून घेऊया.

चालण्याबद्दल संशोधन काय म्हणते?

नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन (NCBI) ने अमेरिकन आर्थरायटिस फाउंडेशनच्या वॉक प्रोग्रामवर संशोधन केले आणि 30 मिनिटे चालणे किती फायदेशीर ठरू शकते हे सांगितले. आर्थरायटिस फाउंडेशनच्या मते, ३० मिनिटे मॉडरेट वॉकिंगने स्नायूंचा कडकपणा, वेदना, चिडचिड आणि सांध्यावरील त्याचा परिणाम कमी होतो.

आपण लहानपणी चालायला शिकतो, पण मोठे झाल्यावर चालण्याचे फायदे विसरतो. आता हळूहळू चालणाऱ्या मुलांची संख्याही कमी होत आहे आणि हा योग्य मार्ग नाही. त्यामुळे मुलांमध्ये लठ्ठपणाची समस्याही वाढत असून लोकांना पायाशी संबंधित समस्याही होऊ लागल्या आहेत.

30 मिनिटे चालण्याचे काय फायदे आहेत?

जर तुम्ही दररोज 30 मिनिटे चालत असाल तर तुम्हाला हे सर्व फायदे मिळू शकतात-

दिवसातून किमान 30 मिनिटे चालल्याने अल्झायमर रोगाचा धोका कमी होतो.

चालण्याने एंडोर्फिन रिलीज होतात जे तणाव कमी करतात. याचा परिणाम तुमच्या एकूण आरोग्यावर होतो.

यामुळे डोळ्यांच्या समस्यांपासून आराम मिळू शकतो. वेगाने धावल्याने कॅलरीज कमी होतात, पण चालण्याने डोळ्यांचा ताणही कमी होतो.

चालणे हा एरोबिक व्यायाम आहे आणि याचा अर्थ असा आहे की यामुळे तुमचा ऑक्सिजन प्रवाह सुधारतो. जर शरीरातील ऑक्सिजनचा प्रवाह योग्य असेल तर विषारी पदार्थ आणि टाकाऊ पदार्थ अधिक चांगल्या पद्धतीने बाहेर काढले जातील.

हे आपल्या फुफ्फुसांसाठी देखील खूप प्रभावी असू शकते.

काही संशोधनांचा असा विश्वास आहे की मधुमेहापासून शरीराचे रक्षण करण्यासाठी चालणे चांगले आहे.

दिवसाला 10,000 पावले चालणे हे जिम वर्कआउटसारखे मानले जाते. जर तुम्ही पॉवर वॉकिंग करत असाल तर ते जिमच्या कार्डिओ रुटीनसारखेच असेल.

चालण्यामुळे सांधे समस्या कमी होऊ शकतात. जर तुमची बोन डेन्सिटी कमी असेल तर या सतत चालण्याने फ्रॅक्चरचा धोका कमी होऊ शकतो.

जर एखाद्याला पाठदुखी सारखी समस्या असेल तर हा खूप चांगला व्यायाम होऊ शकतो.

Kondhwa Gun Firing : आयुष कोमकरच्या खुनाचा बदला? सहा गोळ्या झाडून कोंढव्यात गणेश काळेचा मर्डर

Jalgaon Politics : जळगाव शहरात 'ठाकरे' गटाला मोठा हादरा! माजी महापौर नितीन लढ्ढांसह १५ नगरसेवकांनी धरला भाजपचा हात

Latest Marathi News Live Update : मनोज जरांगे पाटील डॉक्टर निर्भया यांच्या कुटुंबीयांच्या भेटीसाठी दाखल

Crime News: नाक चाव्याची दहशत! उंदरासारख्या दातांनी अर्धा डझन लोकांची कुरतडली नाकं, जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

Railway News: प्रवाशांना दिलासा! ट्रेनमध्ये ट्रान्सजेंडर लोकांकडून त्रास होतो का? वाचण्यासाठी रेल्वे प्रशासनाने सोपा मार्ग सांगितला

SCROLL FOR NEXT