Health Insuracne Claim Now Became Easier | Available Just for 2 Hours' Admission As Well sakal
आरोग्य

Health Insurance Updated Rules: आता फक्त २ तास ॲडमिट होऊनही क्लेम करता येणार हेल्थ इन्शुरन्स! जाणून घ्या योजना

Health Insurance Claim After 2 Hour Hospitalization: फक्त २ तासांत हॉस्पिटलमध्ये दाखल होऊनही आरोग्य विमा क्लेम करता येणार. GST कपातीचीही शक्यता.

Anushka Tapshalkar

थोडक्यात:

  1. काही विमा कंपन्यांनी आता फक्त २ तास रुग्णालयात भरती झाल्यावरही हेल्थ इन्शुरन्स क्लेम मंजूर करण्यास सुरुवात केली आहे.

  2. ICICI लोम्बार्ड, केअर आणि निवा बुपा यांच्या योजनांत हा नवा बदल लागू असून १० लाखांपर्यंतचे कव्हर दिले जात आहे.

  3. आरोग्य व जीवन विम्यावर १८% GST हटवण्याचा विचार सुरू असून त्यामुळे हप्ते स्वस्त होण्याची शक्यता आहे.

GST Reduction Expected on Health and Life Insurance in India: आजारपण म्हणलं की हॉस्पिटल येतंच आणि हॉस्पिटल म्हणलं की महागडी बिलं. त्यासाठी बरेचजण हेल्थ इन्शुरन्स करुन घेतात. पूर्वी या इन्शुरन्सचा क्लेम करण्यासाठी पेशंटला हॉस्पिटलमध्ये कमीत कमी २४ तास तरी ॲडमिट होण्याची अट होती.

मात्र आता काही इन्शुरन्स कंपन्यांनी मोठे बदल केले आहेत. त्यामुळे आता फक्त २ तास हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होऊनही तुम्हाला हा हेल्थ इन्शुरन्स क्लेम करते येणार आहे. काय असणार आहे ही योजना जाणून घेऊया.

फक्त २ तासांतही इन्शुरन्स क्लेम शक्य

ICICI लोम्बार्ड, केअर आणि निवा बुपा या नामांकित विमा कंपन्यांनी त्यांच्या आरोग्य विमा योजनांमध्ये महत्त्वाचा aबदल केला आहे. वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे आता अनेक शस्त्रक्रिया आणि उपचार काही तासांतच पूर्ण होतात.

त्यामुळे २४ तास रुग्णालयात थांबण्याची अट रद्द करण्यात आली आहे. आता फक्त २ तास रुग्णालयात ॲडमिट झाल्यावरही इन्शुरन्स क्लेम मंजूर होणार आहे. ही सामान्य नागरिकांसाठी मोठी दिलासादायक बाब ठरते आहे.

पूर्वी मोतीबिंदू, अँजिओग्राफी किंवा केमोथेरपीसारख्या उपचारांसाठी रात्रभर रुग्णालयात थांबावं लागायचं. पण आता हे उपचार कमी वेळातच होतात. तरीही आता विमा क्लेम मिळणार आहे.

काय आहे योजनेत ?

  • ICICI लोम्बार्ड एलिव्हेट प्लॅन: १० लाखांचे कव्हर, वार्षिक प्रीमियम सुमारे ९,१९५ रु.

  • केअर - सुप्रीम प्लॅन: १० लाखांचे कव्हर, प्रीमियम १२,७९० रु. दरवर्षी

  • निवा बुपा - हेल्थ इन्शुरन्स प्लॅन: १० लाखांचे कव्हर, वार्षिक प्रीमियम १४,१९९ रु.

या योजनांमधून ग्राहकांना केवळ २ तासांसाठी रुग्णालयात ॲडमिट झाल्यानंतरही विमा क्लेम मिळू शकतो. त्यामुळे तातडीच्या उपचारांसाठी आर्थिक मदत सहज मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

GST कपातीची शक्यता – विमा हप्ते होणार स्वस्त?

दरम्यान, विमा धारकांसाठी आणखी एक महत्त्वाची बातमी. जीएसटी परिषद (GST Council) लवकरच आरोग्य आणि जीवन विम्यावर लागू असलेला १८% कर कमी करण्याचा किंवा पूर्णतः हटवण्याचा विचार करत आहे. विमा नियामक संस्था IRDAI नेही या शिफारशींना पाठिंबा दिला आहे.

जर या शिफारशी मान्य झाल्या, तर:

  • वयोवृद्धांसाठी विमा हप्त्यावर पूर्ण GST सवलत

  • ५ लाखांपर्यंतच्या आरोग्य विमा पॉलिसींवर करमुक्तीची शक्यता

  • जीवन विमा (Term Insurance) पॉलिसीवरही GST सवलत मिळू शकते

विमा क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत

विमा क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की GST कमी केल्यास विमा घेणे सामान्य लोकांसाठी सोपे होईल आणि विमा क्षेत्राचा देशात झपाट्याने विस्तार होईल. भारतात अजूनही केवळ ४०% नागरिक आरोग्य विम्याच्या संरक्षणाखाली आहेत, जे जागतिक सरासरीपेक्षा खूपच कमी आहे.

FAQs

  1. २ तासात हॉस्पिटलमध्ये दाखल होऊनही हेल्थ इन्शुरन्स क्लेम करता येतो का? (Can I claim health insurance even if I’m admitted to the hospital for just 2 hours?)
    होय, काही निवडक योजना आता २ तासांच्या हॉस्पिटलायझेशननंतरही क्लेम मंजूर करतात.

  2. या सुविधा कोणत्या विमा कंपन्यांमध्ये उपलब्ध आहेत? (Which insurance companies offer this facility?)
    ICICI लोम्बार्ड, केअर आणि निवा बुपा या कंपन्यांच्या काही योजनांमध्ये ही सुविधा मिळते.

  3. GST कमी झाल्यास हेल्थ इन्शुरन्स प्रीमियमवर काय परिणाम होईल? (If GST is reduced, how will it affect health insurance premiums?)
    GST १८% वरून कमी केल्यास प्रीमियम दर कमी होऊन विमा स्वस्त होईल.

  4. GST कपात कुठ्या पॉलिसींना लागू होऊ शकते? (Which policies might benefit from GST reduction?)
    वयोवृद्धांसाठीचे प्लॅन, ५ लाखांपर्यंतच्या हेल्थ पॉलिसी आणि टर्म लाइफ इन्शुरन्स यांना GST सवलत मिळण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: OUT or NOT OUT? जो रूटने अफलातून झेल, नोंदवला वर्ल्ड रेकॉर्ड; राहुल द्रविडचा विक्रम मोडला, पण रंगलाय वाद

World Heritage status: अभिमानाची बाब! शिवरायांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या यादीत समावेश

Shambhuraj Desai : संजय राऊतांच्या वक्तव्याची पर्यटनमंत्री शंभुराज देसाईंनी उडवली खिल्ली

खरीप हंगामात ८१,००० शेतकऱ्यांना ११४० कोटींचे पीककर्ज! ६३ हजार ८४९ शेतकऱ्यांच्या १०३० कोटी रुपयांच्या पीककर्जाचे बॅंकांनी केले नवे-जुने

Latest Marathi News Updates: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT