mutton curry Paithan esakal
आरोग्य

Health News: सतत मटण खाणाऱ्यांनो सावधान; आयुष्यभरासाठी मागे लागेल 'हा' त्रासदायक आजार

हार्वर्ड विद्यापीठाच्या अभ्यासातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.

वैष्णवी कारंजकर

तुम्हालाही वारंवार मटण खायला आवडतं का? फक्त मटणच नव्हे तर कोणत्याही प्रकारचं मांस तुम्ही सातत्याने खाता का? असं असेल तर याचे तुमच्या शरीरावर घातक परिणाम होऊ शकतात. तुम्ही एका अशा आजाराच्या विळख्यात सापडू शकता, ज्याच्यामुळे तुमचं पूर्ण आयुष्य त्रासदायक होईल.

हार्वर्ड विद्यापीठामध्ये झालेल्या एका अभ्यासानुसार, कोणतंही मांस आठवड्यामध्ये दोन वेळा खाणाऱ्या लोकांना डायबेटिसचा धोका अधिक असतो. या मांसामध्ये बीफ म्हणजे गायीचं मांस, डुकराचं मांस, हरणाचं मांस, मटण यांचा समावेश आहे. हार्वर्ड विद्यापीठात झालेल्या अभ्यासामध्ये असं आढळून आलं आहे की हे मांस सातत्याने खाणाऱ्या लोकांना टाईप २ डायबेटिसचा धोका अधिक असतो.

खरं तर, मागील अनेक अभ्यासांमध्ये, मांसाचे सेवन आणि टाइप २ मधुमेह यांच्यात धोकादायक संबंध दिसून आला. आता हार्वर्ड युनिव्हर्सिटीच्या तज्ज्ञांनाही डायबेटिस आणि खाण्याच्या सवयींच्या संबंधात हा संबंध सापडला आहे.

अभ्यासाच्या निकालांमध्ये असा दावा केला जात आहे की जे लोक आठवड्यातून फक्त दोनदा मांस खातात त्यांना टाइप 2 मधुमेह होण्याचा धोका वाढू शकतो. २०१८ मध्ये जर्नल ऑफ हेपॅटोलॉजीमध्ये एक अभ्यास प्रकाशित झाला होता ज्यामध्ये असा दावा करण्यात आला होता की जे लोक जास्त मांस आणि प्रक्रिया केलेले मांस खातात त्यांच्यामध्ये फॅटी लिव्हर आणि इन्सुलिन प्रतिरोधकता दिसून येते.

अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशनमध्ये प्रकाशित केलेला हा नवीन अभ्यास हार्वर्ड टीएच चॅन स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ इथल्या संशोधकांनी केला आहे. त्यात २ लाख १६ हजार ६९५ जणांनी सहभाग घेतला. म्हणजेच हा अहवाल २ लाखांहून अधिक लोकांच्या आरोग्य डेटावर आधारित आहे. हे विश्लेषण दर दोन ते चार वर्षांनी केले जाते. या कालावधीत, २२ हजारांहून अधिक लोकांना टाइप २ मधुमेह झाला. ज्या लोकांनी सर्वाधिक मांस खाल्लं त्यांना टाईप २ मधुमेह होण्याचा धोका जास्त प्रमाणात मांस न खाणाऱ्या लोकांपेक्षा ६२% जास्त होता.

चांगली गोष्ट म्हणजे संशोधकांनी त्यांच्या अहवालात असंही सांगितलं की, मांस खाण्याऐवजी तुम्ही वनस्पती-आधारित प्रथिने (म्हणजे शाकाहारी) स्रोत म्हणजे शेंगा किंवा दूध आणि दही प्रमाणात खावे. यामुळे टाइप २ मधुमेहाचा धोका कमी होईल. दररोज मांस खाण्याऐवजी, शाकाहारी प्रोटीनयुक्त पदार्थ खा. शेंगदाणे आणि शेंगा खाल्ल्याने टाईप २ मधुमेहाचा धोका ३०% कमी होतो, तर दुग्धजन्य पदार्थ वाढवल्याने धोका २२% कमी होतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs LSG Live: रिषभ पंतला OUT न होताच मैदान सोडण्यास भाग पाडले, हेझलवूडच्या भन्नाट चेंडूवर अघटीत घडले; लखनौचे टेंशन वाढले

Parli Vaijnath News : वाढत्या विजेच्या मागणीच्या काळात परळी वीज केंद्राचा राज्याला मोठा आधार; १२५ दिवसांत ५५५.३९ मिलीयन युनीट विजेची निर्मिती

Hormuz Strait: ४८ तासांनंतर होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली होणार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची घोषणा, नेमकं काय घडलं?

Vinod Kambli Health : विनोदला ब्रेन स्ट्रोकचा धोका; माजी क्रिकेटपटू एकत्र आले, आर्थिक मदतीसाठी WhatsApp ग्रुप, मित्राची माहिती

“त्यांच्यासोबत काम मास्टरक्लाससारखं वाटायचं" अक्षय कुमारने दिला असरानी यांच्या आठवणींना उजाळा ; भूतबंगला सिनेमात केलं अखेरचं काम

SCROLL FOR NEXT