Processed Food Loss esakal
आरोग्य

Processed Food खाताय? होऊ शकतो कँसर, तज्ज्ञ सांगतात महत्वाचं कारण

गॅस्ट्रोएन्टेरोलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या अलीकडील अभ्यासात उंदरांवर ट्रायल घेत फर्मेंटेबल फायबर आहारात किती योग्य यावर अभ्यास करण्यात आला

सकाळ डिजिटल टीम

Health: सध्या डाएट फुड डाएट प्लान हे सगळं अनेकांच्या आयुष्यात घर करून बसलंय. अशा वेळी शरीराला योग्य डाएट तुम्ही खरंच देताय का त्याची पडताळणी करणेही महत्वाचे ठरते. प्रत्येकाच्या आहाराच्या गरजा वेगवेगळ्या असू शकतात. मात्र तरीही आहार शरीराला पोषक ठरावा असाच असावा. गॅस्ट्रोएन्टेरोलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या अलीकडील अभ्यासात उंदरांवर ट्रायल घेत फर्मेंटेबल फायबर आहारात किती योग्य आहे यावर अभ्यास करण्यात आला.

संशोधकांच्या मते ज्या उदरांच्या आहारात फर्मेंटेबल प्रोसेस्ड फायबर होते त्यांच्या मध्ये लीवर कँसरचा धोका मोठ्या प्रमाणात आढळून आला. तसेच त्यांच्या रक्तातही पित्त आम्लाचे प्रमाण जास्त प्रमाणात होते. तसेच लोकांमध्ये केलेल्या सर्वेच्या आधारे शरीरातील पित्त आम्ल पातळीची तपासणी कर्करोगामध्ये करतात. त्यामुळे अती अॅसिडिक पातळी असलेले प्रोसेस्ड फायबरयुक्त फुड शक्यतोवर तुमच्या डाएटमध्ये नसावेत.

प्रोसेस्ड फुड म्हणजे काय?

फायबर हे एक कार्बोहायड्रेट आहे जे शरीराला काही आरोग्य फायदे देते परंतु जास्त कॅलरीज पुरवत नाही. आहारातील फायबरचे संपूर्ण अन्न स्रोत हे निरोगी आहाराचा एक महत्त्वाचा घटक आहेत आणि रोग प्रतिबंधकतेसाठी फायदेशीर ठरू शकतात. त्यामुळे प्रोसेस्ड फुड शक्यतो टाळायला हवे.

फळे आणि भाज्यांसह अनेक पदार्थांमध्ये फायबर नैसर्गिकरित्या आढळते. आणि प्रोसेस्ड फुडमध्ये असणारे फायबरयुक्त घटक एका विशिष्ट वयोगटासाठी घातक ठरू शकते. असे फायबर्स कर्करोगाचं महत्वाचं कारण ठरू शकतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sri Lanka Politics: आधी मुलगा, आता पत्नी अडचणीत; महिंदा राजपक्षे ICU मध्ये, श्रीलंकेत सध्या काय घडतंय?

'त्या'व्हायरल व्हिडीओवर अखेर गौतमी पाटील बोलली, म्हणाली... 'लाज नाही वाटली?'

Latest Marathi News Live Update : काँग्रेस दिशाहीन, किरेन रिजिजू यांची टीका

Mumbai News: जीटीबीनगरवासीयांना भाड्याचा दिलासा! निवासींना २० तर गाळेधारकांना १० हजार रुपये

Pachod News : दावरवाडी परिसरातील सहा प्राथमिक आरोग्य उपकेंद्रेच पडलीत आजारी!

SCROLL FOR NEXT