Pregnancy Health Tips
Pregnancy Health Tips  esakal
आरोग्य

Pregnancy Health Tips : गर्भावस्थेत ग्रीन-टी घेतल्याने होते का वेळेआधी प्रसुती? जाणून घ्या तोटे

सकाळ डिजिटल टीम

Green Tea For Pregnancy : गर्भावस्था (Pregnancy)ही स्त्रीच्या आयुष्यातील एक महत्त्वाची स्थिती आहे. गर्भधारणेच्या या टप्प्यात होणारे बाळ कसे असेल, मुलगा की मुलगी याची तिला काहीही कल्पना नसते.

पण, तरीही ती त्याचे हट्ट म्हणजे डोहाळे पुरवते. एका सुदृढ आणि निरोगी बाळाला (Healthy Baby) जन्म देणे हे जणू एका मातेचे ध्येयच असते. पण, गर्भावस्थेत योग्य ती काळजी न घेतल्याने प्रसुतीमध्ये अडचणी येतात.

गर्भधारणा हा एक नऊ महिन्याचा प्रवास आहे. जिथे आईने तिच्या जीवनशैलीकडे अधिक लक्ष दिले पाहिजे. गर्भधारणेपासून बाळंतपणापर्यंत महिलांना अधिक जपावे लागते. गर्भधारणेदरम्यान तुम्हाला सकस आहार घ्यावा लागतो. गरोदर मातांनी या काळात आपल्या आहाराची अतिरिक्त काळजी घ्यावी. कारण त्याचा बाळाच्या वाढीवर परिणाम होऊ शकतो.

या दरम्यान, गर्भवती महिलांनी शरीरातील हायड्रेशन पातळी व्यवस्थित राखण्यासाठी भरपूर द्रव पदार्थ पिणे आवश्यक आहे. कारण ते प्लेसेंटामध्ये अम्नीओटिक पदार्थ तयार करण्यास मदत करते. गरोदर मातांना दररोज 8-12 ग्लास पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. काही माता ग्रीन टी पितात. याचा बाळाच्या प्रकृतीवर काय परिणाम होतो हे पाहुयात.

ग्रीन टीमुळे होतो गर्भपात

ग्रीन टीमध्ये कॅफेनचे घटक असतात. त्यामुळे बाळाशी जोडलेल्या नाळेतून रक्तप्रवाहाला हानी पोहोचू शकते. यामुळे बाळाच्या डीएनए पेशींना धोका उद्भवू शकतो. त्यामुळे गर्भपातही होऊ शकतो. गर्भधारणेदरम्यान कॉफीच्या पदार्थांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातो.

वेळेआधी प्रसुती

कॉफीमध्ये असलेले कॅफीन बाळाच्या अवयवांचा योग्य विकास होऊ देत नाही. ज्यामुळे तूमची प्रसुती वेळेआधी होऊ शकते. जन्मलेल्या बाळाचे शरीर पूर्ण विकसित नसल्याने त्यांचा मृत्यू होईल किंवा ते दिव्यांग जन्माला येईल.

वजन कमी होणे

ग्रीन टीचा गुणधर्म उत्तेजित आहे. याचे जास्त सेवन केल्याने तुमचा रक्तदाब आणि हृदयाचे ठोके वाढू शकतात. ज्याच्या बाळावर परिणाम होतो. ग्रीनटी वजन कमी करण्यास मदत करते त्यामूळे प्रसूतीवेळी बाळाचे वजन कमी होईल.

सतत वॉशरूमला जावे लागते

ग्रीन टी शरीरातील पाणी कमी करते. यामूळे तुम्हाला सतत वॉशरूमला जावे लागल्याने शरीरातील पाणी कमी होते. परिणामी प्लेसेंटामधील पाणीही कमी होईल. ज्यामूळे बाळाला पाणी कमी पडेल आणि तूम्हाला सिझेरीअन प्रसूती करावी लागेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs DC Live Score: चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात अडकले दिल्लीचे धुरंधर, पण कुलदीपच्या फिनिशिंग टचमुळे कोलकातासमोर 154 धावांचं लक्ष्य

Covid 19 : कोविडची पहिली लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञावर चीनची मोठी कारवाई; भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे केलं बरखास्त

Govinda Dance: गोविंदानं डान्स करुन केला धैर्यशील मानेंचा प्रचार; व्हिडिओ पाहा

Viral Video: गिल लावत होता फिल्डिंग अन् विराटने अचानक येऊन दिला जोरात धक्का, GT vs RCB सामन्यावेळी काय झालं पाहा

Latest Marathi News Live Update : अमित शाहांचा डिपफेक व्हिडिओ शेअर केल्यानं काँग्रेसच्या ट्विटर हँडलविरोधात गुन्हा

SCROLL FOR NEXT