stomach pain sakal
आरोग्य

Health Care News: जेवल्यानंतर पोटात सतत जळजळ होतेय? मग हे घरगुती उपाय करून पाहा

काही खाल्ल्यानंतर पोटात, छातीत जळजळ होण्याची अनेक कारणे असू शकतात.

Aishwarya Musale

Home Remedies For Stomach Irritation And Pain:

अनेक लोकांना पोटदुखी, गॅस, लूज मोशन इत्यादी समस्यांचा सामना करावा लागतो. ही समस्या मुख्यतः मिरची मसाले खाल्ल्यामुळे उद्भवते.

यासोबतच काही लोकांच्या पोटात अॅसिडिटीची समस्या नेहमीच असते आणि ते जे काही खातात ते सहज पचत नाहीत आणि त्यांना सतत अस्वस्थ वाटू लागते.

अशी समस्या टाळण्यासाठी डायझिन किंवा कोणत्याही औषधाची मदत घेता येते, परंतु तुम्ही औषधांशिवायही उपचार करू शकता. यासाठी तुम्हाला डॉक्टरकडे जाण्याची गरज नाही, तर तुम्ही तुमच्या किचनमध्ये असलेल्या काही गोष्टींनी याला बरे करू शकता.

घरगुती उपायांबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, जे वर्षानुवर्षे लोकांच्या पचनाच्या समस्या दूर करत आहेत.

1. गूळ खा

जर तुम्हाला जेवन केल्यानंतर अस्वस्थ वाटत असेल आणि पोटात जळजळ होण्यासारख्या समस्या असतील तर तुम्ही खाल्ल्यानंतर गुळाचा तुकडा खा. ते दातांनी चावून खाण्याऐवजी काही वेळ तोंडात ठेवून चोखत राहा.

हे अन्न पचवणारे एंजाइम सोडण्यास मदत करतात, ज्यामुळे तुम्हाला अन्न पचायला पूर्वीपेक्षा खूप कमी वेळ लागतो. पोटात जळजळ होण्याची समस्या दूर करण्यासाठी हे खूप प्रभावी आहे.

2. बडीशेपचे पाणी

जर तुम्ही अन्न खाल्ल्यानंतर अॅसिडिटीच्या समस्येने त्रस्त असाल तर बडीशेपचे पाणी तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. यासाठी 1 चमचे बडीशेप एक कप पाण्यात मिसळा आणि रात्रभर राहू द्या. सकाळी चाळून घ्या. तुम्ही ते उकळूनही पिऊ शकता. चवीनुसार त्यात एक चमचा मध घालता येतो. अॅसिडिटीची समस्या दूर करण्यासाठी हे खूप फायदेशीर आहे.

3. कोरफडीचा रस

बद्धकोष्ठतेच्या समस्येवर मात करण्यासाठी तुम्ही कोरफडीच्या रसाचे सेवन करू शकता. यामुळे तुमच्या आतड्यात पाण्याचे प्रमाण वाढते, ज्यामुळे बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम मिळतो. अशा परिस्थितीत तुम्ही बाजारात उपलब्ध असलेल्या कोरफडीच्या रसाचे नियमित सेवन करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trapit Bansal: भारतीय तरुणाचा जगभरात डंका! IITian त्रपित बंसलला Meta कडून अब्जावधींची ऑफर; सॅलरी ऐकून व्हाल थक्क

Pune News : पुणे बाजार समितीच्या दिलीप काळभोर यांचा सभापतीपदाचा राजीनामा

Latest Maharashtra News Updates : मध्य वैतरणा धरणाचे तीन दरवाजे उघडले, लगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Pune court verdict : पत्नीशी दोनदा घटस्फोट, तिसऱ्यांदा लग्नाचं वचन देत केला बलात्कार? ; पुणे कोर्टाने पतीला सोडलं निर्दोष, कारण...

Viral Video: महिला पोलिसाचं धाडस! महाकाय १६ फूट लांब किंग कोब्रा पकडला, पाहा थरारक व्हायरल व्हिडिओ

SCROLL FOR NEXT