walking backwards  Esakal
आरोग्य

Health Tips: तुम्ही कधी उलट चालून पाहिले का? 'हे' आहेत उलटे चालण्याचे फायदे...

जगभरातील तज्ञ चालणे हा सर्वोत्तम व्यायाम मानतात कारण तो लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत कोणीही कधीही करू शकतो.

सकाळ डिजिटल टीम

शरीर निरोगी ठेवण्यासाठी अनेक प्रकारचे व्यायाम केले जातात. जगभरातील तज्ञ चालणे हा सर्वोत्तम व्यायाम मानतात कारण तो लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत कोणीही कधीही करू शकतो. पण तुम्हाला उलटे चालण्याचे फायदे माहित आहेत का?सरळ चालण्यापेक्षा उलट चालणे अधिक फायदेशीर आहे. यामुळे आपले मन आणि शरीर यांच्यात चांगले संतुलन निर्माण होते. दररोज 20-30 मिनिटे रिव्हर्स वॉक केल्याने मूत्रपिंड, उच्च रक्तदाब आणि मधुमेहाशी संबंधित समस्यांमध्ये आराम मिळतो. आजच्या लेखात जाणून घेऊया उलटे चालण्याचे फायदे...

1) उलट चालण्याने अनेक प्रकारच्या समस्या दूर होतात. मधुमेह, लठ्ठपणा, उच्च रक्तदाब, किडनीचे आजार, अनेक प्रकारचे कॅन्सर इत्यादीपासून आपला बचाव होऊ शकतो.

2) उलट चालल्याने गुडघ्यांवर असलेला ताण कमी होतो. यामुळे सूज कमी होते.

3) उलटे चालणे तुमच्या पायांना अधिक ताकद देते, कारण उलट चालताना अधिक शक्ती वापरावी लागते. त्यामुळे दोन्ही पायांच्या पुढच्या आणि मागच्या दोन्ही बाजूंच्या स्नायूंचा व्यायाम होतो आणि त्यांना ताकद मिळते.

4) कंबर किंवा पाठदुखी तुम्हाला त्रास देत असल्यास, उलट चालण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे या भागांच्या स्नायूंमधील ताण दूर होतो. कंबर आणि मणक्याची हाडे मजबूत असतात. पाठदुखी निघून जाते.

5) दररोज 10 मिनिटे उलट चालल्यामुळे पायांमधील ज्या स्नायूंचा फारसा उपयोग होत नाही त्यांनाही ताकद मिळते. गुडघ्यामध्ये कोणत्याही प्रकारची दुखापत किंवा वेदना होत असल्यास ती बरी होते. तसेच यामुळे शारीरिक संतुलन निर्माण करण्यास मदत होते.

6) शरीर अतिरिक्त कॅलरी जलद बर्न करते. वजन नियंत्रित ठेवण्यास मदत होते. शरीरातील ऊर्जा पातळी वाढते. यासोबतच मेटाबॉलिझमलाही चालना मिळते.

7) जेव्हा तुम्ही उलट चालता तेव्हा स्नायू आणि हाडांना ताकद मिळते आणि ते अधिक मजबूत होतात.

8) उलट चालल्याने शरीरासोबतच मानसिक आरोग्यालाही अनेक प्रकारे फायदा होतो. जेव्हा तुम्ही मागे चालता तेव्हा वेगवेगळ्या स्नायूंना फायदा होतो.

9) तुम्ही तुमच्या मनाला एकाग्र करता,शरीराबद्दल अधिक जागरूक असल्याची भावना येते.

10) दृष्टी सुधारते, विचार करण्याची क्षमता वाढवते, संज्ञानात्मक नियंत्रण वाढवते

उलट चालण्याचा सराव करून पहा, शरीरातील अनेक वेदना निघून जातील घेणार आहोत.चालणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे.आता बघू या उलटे चालताना कोणती काळजी घ्यावी?

1) ट्रेडमिलवर उलटे चालत असाल तर वेग कमी ठेवा, अन्यथा तुम्ही घसरून पडू शकता. 

2) घरात उलटे चालत असाल तर आजुबाजूला फर्निचर अथवा इतर वस्तू नसतील याची काळजी घ्या. 

3) पायाच्या टाचा सुरक्षित ठेवण्यासाठी बुट घाला. 

4) बाहेर उलटे चालत असाल तर प्राणी, व्यक्ती, खड्डे या गोष्टींची काळजी घ्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Crime: शहर हादरलं! एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह घरात आढळले; मृत्यू कशामुळे?

Mumbai News: डोंबिवलीत रस्त्यांची चाळण! नागरिकांचा संताप, प्रशासनाविरोधात रिक्षाचालकांचा ठिय्या

Nashik News : पावसामुळे रस्त्यांची दुर्दशा: सातपूर-अंबड MIDC मधील खड्डेमय रस्ते; कामगार आणि उद्योजक त्रस्त

मराठी बोलणार नाही म्हणणाऱ्या केडियांनी मागितली माफी, चूक सुधारणार म्हणत राज ठाकरेंना केली नम्र विनंती; पाहा VIDEO

मराठीसाठी सत्तेवर लाथ, Raj Thackeray यांनी सांगितला 'तो' प्रसंग । Uddhav Thackeray । Raj Thackeray

SCROLL FOR NEXT