आरोग्य

Health Tips : गुळापेक्षाही अधिक पौष्टीक आहे काकवी? काय आहेत फायदे जाणून घ्या!

काकवीचे अनेक फायदे आहेत जे लोकांना माहितीही नाहीत!

सकाळ डिजिटल टीम

आपल्या सर्वांना गूळ खाण्याचे अनेक फायदे माहिती आहेत. साखरेला पर्याय म्हणून गुळ खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात. पण, गुळापेक्षाही अधिक पौष्टीक अशी काकवी बऱ्याच लोकांना ऐकूनही माहिती नसेल.  

उसाच्या रसापासून गूळ बनवण्याची प्रक्रिया तीन टप्प्यातून जाते. पहिले म्हणजे ऊसाचा रस दुसरे म्हणजे काकवी आणि शेवटी गूळ तयार होतो.  सोप्या शब्दात सांगायचे तर ऊसाचा रस गरम केल्यावर गुळ बनण्यापूर्वी एक द्रव तयार होतो. ज्याला काकवी म्हणतात. म्हणजेच गूळ बनण्यापूर्वी खाण्यायोग्य उसाच्या रसापासून बनवलेले द्रव म्हणजे काकवी होय.

काकवी केवळ गुऱ्हाळ घरातच मिळते. ती वर्षभर पॅक करून साठवता येते. त्यामूळे अनेक लोक तिचे नियमीत सेवन करू शकतात. पण, अनेक लोकांना काकवीचे फायदे माहिती नसल्याने बहुगुणी काकवी लोक वापरत नाहीत. त्यामुळेच आज त्याचे फायदे जाणून घेऊयात.  

साखरेला बेस्ट पर्याय

गोड खाणे कोणाला आवडत नाही. पण, काही लोकांसाठी साखर ही विष असते. त्यामुळे नैसर्गिकरीत्या गोडवा मिळवण्यासाठी काकवी हा एक बेस्ट पर्याय आहे. आयुर्वेदात काकवीचे फायदे आणि गुणधर्माशी संबंधित अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.

शरीर मजबूत बणवते

काकवी पचायला हलकी असते.  जी शरीराला सहज पचवता येते. त्यामुळे शरीर मजबूत होते. जे जास्त शारीरिक श्रम करतात त्यांच्यासाठी काकवी फायदेशीर आहे. काकवी हाडे मजबूत करण्यातही मदत करते.

रक्त शुद्ध करते

रक्ताशी संबंधित दोषांमध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढवण्यास खूप मदत करते. याशिवाय रक्त शुद्ध करण्यास देखील मदत करते. शरीराचा थकवा दूर करून ऍनर्जी वाढवते.

काविळीवर उपचार

अनेकदा कावीळ आणि अशक्तपणा बरा करण्यासाठी ग्रामीण भागात काकवी खाण्याचा सल्ला दिला जातो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या सलग चार पराभवामागची ५ कारणं! हार्दिक पांड्या अजूनही नाही सुधरला, तर...

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT