Health Tips in marathi  
आरोग्य

Health Tips : मिळतील तिथून विलायती चिंचा घ्या आणि खा, कारण...;  डॉ. चित्तवार यांचा सल्ला!

सकाळ डिजिटल टीम

लहानपणीच्या गमती-जमती प्रत्येकालाच आठवत असतात. एखादे फळ दिसले, एखाद्या ठिकाणावर लहानपणी घाललेला धुमाकूळ, मित्र, उन्हाळ्याची सुट्टी हे सगळंच डोळ्यासमोरून जातं. आता पून्हा उन्हाळ्याची सुट्टी पडेल आणि लोक गावी जातील. वाटेत जाताना कोपऱ्यावर असलेलं विलायती चिंचेचं झाडं सर्वांनाच भूतकाळात घेऊन जाईल.

लहानपणी लालबुंद विलायती चिंचा किती खाल्ल्यात याला काही हिशोबच नाही. पण,त्या झाडाखालीच पोरांचा घोळका असायचा. त्या चिंचा तूम्हीही लहानपणी खाल्ल्या असतील ना?. त्या चिंचा केवळ चवीत नाही तर आरोग्यदायी दृष्टीतूनही फायदेशीर आहेत. ते कसे जाणून घेऊयात.

भोपाळमध्ये राहणारे एंडोक्राइनोलॉजिस्ट, डायबेटोलॉजिस्ट विशेषज्ञ डॉ. सचिन चित्तवार यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्यांनी विलायती चिंचेमधील पोषक तत्वे आणि त्याचे फायदे सांगितले आहेत. विलायती चिंचेमध्ये व्हिटॅमिन सी, प्रथिने, चरबी, कार्बोहायड्रेट, कॅल्शियम, पोटॅशियम, फॉस्फरस, लोह, थायामिन, रिबोफ्लेविन असे अनेक प्रकारचे पोषक घटक भरपूर प्रमाणात आढळतात.

विलायती चिंचेत भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असल्याने ते रोगप्रतिकारशक्ती वाढवते. रोगप्रतिकारक शक्ती वाढल्यामुळे तुम्ही अनेक आजार आणि संसर्गापासून दूर राहू शकता.

व्हिटॅमिन सी शरीरात उत्कृष्ट अँटिऑक्सिडंट म्हणून कार्य करते, ज्यामुळे शरीराची अनेक प्रकारच्या हानिकारक मुक्त रॅडिकल्सशी लढण्याची क्षमता वाढते. विलायची चिंच कुठेही दिसली तर ती नक्कीच विकत घ्या आणि सेवन करा.

मधुमेहावर रामबाण उपाय

विलायती चिंच मधुमेहाच्या रुग्णांसाठीही फायदेशीर आहे. त्यामुळे साखरेची पातळी नियंत्रित राहते. यामध्ये अनेक प्रकारचे अँटीऑक्सिडंट देखील असतात, ज्याचा शरीराला फायदा होतो. विलायती चिंचेपासून तयार केलेला रस सेवन करणे देखील फायदेशीर ठरू शकते. चिंचेच्या पानांमध्ये मधुमेहविरोधी गुणधर्म असतात. त्याचे सेवन मधुमेह असणाऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकते.

पोटाची तक्रार दूर होते

विलायती चिंचेमुळे पोटाचे आरोग्यही चांगले राहते. याच्या सेवनाने पचनशक्ती मजबूत होते. पोटाशी संबंधित अनेक आजार टाळता येतात.

वजन वाढीवर प्रतिबंध करते

विलायती चिंच शरीरात खराब कोलेस्ट्रॉल वाढण्यापासून रोखते आणि चांगल्या कोलेस्ट्रॉलला प्रोत्साहन देते. याच्या मदतीने तुम्ही हार्ट अटॅक, स्ट्रोक इत्यादी टाळू शकता. यामध्ये पोटॅशियम देखील भरपूर असते त्यामुळे हे फळ हृदयाच्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरू शकते.

ऍनिमियावर गुणकारी

या चिंचेमध्ये लोह देखील पुरेसे आहे. त्यामुळे ज्यांना लोहाची कमतरता आहे त्यांनी याचे सेवन करणे आवश्यक आहे. ज्यांना ऍनिमियाचा त्रास होतोय त्यांच्यासाठी विलायती चिंच फायद्याची आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजपनं केलं की अमर प्रेम, आम्ही केलं की लव्ह जिहाद का? काँग्रेस, एमआयएमशी युतीवरून ठाकरे बंधूंचा प्रहार

Bigg Boss Marathi 6 Live Update: लीलाच्या एजेची राकेश बापटची 'बिग बॉस मराठी ६' मध्ये एंट्री

बॉलिवूडमध्ये प्रसिद्धी, शिल्पा शेट्टीच्या बहिणीला केलंय डेट ! मराठी बिग बॉसमध्ये कसा असणार राकेशचा अंदाज ?

Bigg Boss Marathi 6 : घरची गरीबी, थॅलेसेमियाशी झुंज देणाऱ्या रीलस्टार डॉन प्रभू शेळकेची Entry !

Latest Marathi News Live Update : मराठी माणसासाठी शेवटची निवडणूक, मुंबईसाठी एक व्हा; राज ठाकरेंचं आवाहन

SCROLL FOR NEXT