व्हिटॅमिन एच चे महत्त्व Esakal
आरोग्य

Vitamin H च्या कमतरतेमुळे शरीरात उरणार नाही एनर्जी, ही लक्षण दिसताच घ्या योग्य आहार

व्हिटॅमिन B7 ला व्हिटॅमिन H म्हंटलं जातं. Vitamin H हे व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स समूहातील महत्वाचं व्हिटॅमिन असून याला बोयाटीन म्हणून साधारण ओळखलं जातं

Kirti Wadkar

शरीर निरोगी राहण्यासाठी तसचं शरीरात एनर्जी Energy टिकून राहण्यासाठी पोषक आहार घेणं गरजेचं आहे. रोजच्या आहारातून शरीराला आवश्यक सर्व व्हिटॅमिन्स आणि प्रथिनं मिळणं गरजेचं आहे. Health Tips in Marathi know the importance of vitamin H

प्रत्येक व्हिटॅमिनचं Vitamin शरीरासाठी वेगवेगळे फायदे आहेत. व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन बी12 हे सर्व व्हिटॅमिन शरीराला योग्य प्रमाणात मिळणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे व्हिटॅमिन एच H हे देखील शरीरासाठी अत्यंत आवश्यक आहे.

आजवर तुम्ही विविध व्हिटॅमिन्सची नाव ऐकली असतील. मात्र Vitamin H बद्दल फार कमी लोकांना माहिती असेल.

व्हिटॅमिन B7 ला व्हिटॅमिन H म्हंटलं जातं. Vitamin H हे व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स समूहातील महत्वाचं व्हिटॅमिन असून याला बोयाटीन म्हणून साधारण ओळखलं जातं.

चांगली त्वचा, केस, डोळे तसंच यकृतासाठी शरीरामध्ये व्हिटॅमिन एच योग्य प्रमाणात असणं गरजेचं आहे. यासोबतच Vitamin H चे शरीरासाठी इतरही अनेक फायदे आहेत.

Vitamin H च्या कमतरतेची लक्षणं

व्हिटॅमिन एच म्हणजेच शरीरात बायोटीनची कमतरता निर्माण झाल्यास त्याचा परिणाम खास करून त्वचा आणि केसांवर परिणाम दिसू लागतो. केस गळणे किंवा केस निस्तेज दिसणे तसंच त्वचा कोरडी आणि निस्तेज होते.

यासोबतच व्हिटॅमिन एच च्या कमतरतेमुळे काही एनिमो ऍसिड्सचं योग्य पचन होत नाही. यामुळे रक्त आणि लघवीमध्ये काही हानिकारक तत्त्व वाढू लागतात. ज्यामुळे लघवी काहीशी फेसाळ होवू शकते. तसचं भूक कमी होणं, थकवा जाणावणं अशी काही सामान्य लक्षणं दिसू शकतात.

हे देखिल वाचा-

Vitamin H चे फायदे

Vitamin H मुळे चयापचय क्रिया सुरळीत आणि जलद होण्यास मदत होते. जर तुमचं मेटाबोलिजम चांगलं नसेल तर आहारामध्ये Vitamin H युक्त पदार्थांचा समावेश करणं गरजेचं आहे.

व्हिटॅमिन एचमुळे रक्तप्रवाह उत्तेजित होण्यास मदत होते. तसंच यामुळे शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल कमी करून गुड कोलेस्ट्रॉल वाढण्यास मदत होते. व्हिटॅमिन एचमुळे हृदय निरोगी राहण्यास मदत होते.

Vitamin H हे तुमची त्वचा, केस तसंच नखं निरोगी ठेवण्यासाठी मदत करतं. व्हिटॅमिन एचमुळे कॅरेटिन वाढण्यास मदत होते. ज्यामुळे त्वचा आणि केसांवर ग्लो येतो.

Vitamin H शरीरात इंसुलिन निर्मितीस मदत करत. यामुळे ब्लड शुगर नियंत्रणात राहण्यास मदत होते.

तसचं Vitamin H किंवा बायोटीनमुळे रोगप्रिकारक क्षमता मजबूत होण्यास मदत होते.

Vitamin H साठी योग्य आहार

अंडी- अंड्यांमध्ये असलेल्या बायोटीनमुळे व्हिटॅमिन एचची कमतरता भरून निघण्यास मदत होते. अंड्यामधून १० mcg बायोटीन शरीराला मिळतं.

बदाम- बदामाचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. बदामाच्या सेवनामुळे देखील शरीरासाठी आवश्यक व्हिटॅमिन एच उपलब्ध होतं.

रताळं- शाकाहारी लोकांसाठी किंवा उपवासाच्या दिवसांमध्ये देखील रताळ्याच्या सेवनातून पुरेसं बायोटीन शरीराला मिळू शकतं. जवळपास एका लहान आकाराच्या किंवा अर्धा वाटी उकडलेल्या रताळ्यामध्ये २.४ mcg बायोटीन उपलब्ध असतं.

नट्स आणि सीड्स- ड्राय फ्रूट्ससोबतच सुर्यफूलाच्या बियांमध्ये मोठ्या प्रमाणात बायोटीन उपलब्ध असतं. यामुळे आहारामध्ये सुकामेवा किंवा सुर्यफुलांच्या बियांचा समावेश करणं फायदेशीर ठरू शकतं.

याचसोबत पालक, ब्रोकोली, दूध तसंच रावस मासा यांचा आहारामध्ये समावेश केल्यास शरीराला आवश्यक असणारं Vitamin H मिळू शकतं.

हे देखिल वाचा-

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana eKYC Deadline Extension: मोठी बातमी! लाडक्या बहिणींना सरकारकडून दिलासा; अखेर eKYC साठी जाहीर केली मुदतवाढ

Drone Delivery Service: दूध, किराणा, पॅकेजेस… सगळं थेट ड्रोनने घरी पोहोचणार! मुंबईत पहिली निवासी ड्रोन डिलिव्हरी सेवा सुरू होणार, पण कधी?

Property Tax : नियमीत करदात्यांना २५ टक्के सवलत द्या; अभय योजनेतून तीन दिवसात १५.२७ कोटी वसूल

Pune Water Supply Close : पुणे शहराच्या बहुतांश भागाचा पाणी पुरवठा गुरूवारी राहणार बंद

Deglur Nagarparishad Election : नगराध्यक्षपदासाठी ११ उमेदवारी अर्ज; तर नगरसेवकपदासाठी १८९ जणांचा अर्ज

SCROLL FOR NEXT