पोटदुखीपासून सुटका Esakal
आरोग्य

Stomach Pain आणि अतिसाराचा त्रास होतोय, मग हे घरगुती उपाय करून पहा

तर पोटदुखीच्या Stomach Pain त्रासामुळे कोणत्याही कामामध्ये लक्ष केंद्रित करणं अशक्य होतं. अनेकदा अशुद्ध पाण्यासोबतच खराब अन्नं तसंच तिखट किंवा जंक फूडमुळे Junk Food पोट बिघडतं

Kirti Wadkar

अनेकदा चुकीच्या खाण्यामुळे तसंच खास करून पावसाळ्याच्या दिवसांमध्ये अशुद्द पाण्यामुळे पोटदुखी आणि अतिसार किंवा जुलाबाची समस्या निर्माण होवू शकते. लूज मोशन म्हणजेच जुलाबाच्या समस्येमध्ये अनेकदा वारंवार टॉयलेटला Toilet जावं लागत असल्याने अशक्तपणाही जाणवू शकतो. Health Tips Marathi How to get relief from Stomach Pain

तर पोटदुखीच्या Stomach Pain त्रासामुळे कोणत्याही कामामध्ये लक्ष केंद्रित करणं अशक्य होतं. अनेकदा अशुद्ध पाण्यासोबतच खराब अन्नं तसंच तिखट किंवा जंक फूडमुळे Junk Food पोट बिघडतं. यामुळे पोटदुखी सुरू होवून जुलाब Dicentry लागतात.

अशावेळी तुम्ही सुरुवातीला काही घरगुती उपाय करु शकतात. या उपायांमुळे पोटदुखी कमी होण्यास मदत होईल शिवाय अतिसार किंवा जुलाबाचा त्रासही कमी होण्यास मदत होईल.

मीठ आणि साखरेचं पाणी- मीठ आणि साखर हे दोन पदार्थ प्रत्येक घरामध्ये उपलब्ध असतातच. हे दोन पदार्थ तुम्हाला जुलाब आणि पोटदुखीचा त्रास कमी करण्यासाठी उपयोगी पडतील. यासाठी तुम्हाला पाण्यामध्ये केवळ थोडं मीठ आणि थोडी साखर टाकून चांगलं एकत्रित करायचं आहे. हे पाणी थोड्या थोड्या वेळाने दिवसभर प्यावं.

मीठ आणि साखरेच्या पाण्याच्या सेवनामुळे जुलाब थांबण्यास मदत होते. तसचं जुलाबामुळे आलेला अशक्तपणाही दूर होतो आणि शरीर हायड्रेट राहतं.

लिंबाचा रस- लिंबाच्या रसामुळे आतड्यांची स्वच्छता होण्यास मदत होते, तसंच जुलाब रोखण्यासाठी लिंबाचा रस उपयुक्त ठरतो. यासाठी तुम्हाला एक कप पाण्यामध्ये एक लिंबाचा रस पिळून या पाण्याचं सेवन करायचं आहे. दिवसातून ३ वेळा तरी लिंबाच्या पाण्याचं सेवन करावं.

हे देखिल वाचा-

सुंठेचं सेवन- आयुर्वेदानुसार सुंठेचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. जुलाब रोखण्यासाठीदेखील सुंठ हा एक उपयुक्त पर्याय आहे. यासाठी एक ग्लास पाण्यामध्ये अर्धा चमचा सुंठ पावडर मिसळून याचं सेवन करावं.

तुम्ही ताकामध्ये देखील सुंठ पावडर मिसळून सेवन करू शकता. सुंठेमुळे जुलाब थांबण्यास त्वरित मदत होईल. तसंच यामुळे पोटदुखी देखील कमी होईल.

जीऱ्याचं पाणी- जुलाब कमी होण्यासाठी आणि जुलाबामध्ये आलेला अशक्तपणा दूर करण्यासाठी जीऱ्याचं पाणी उपयुक्त ठरेल. यासाठी १ लिटर पाण्यामध्ये १ चमचा जीरं टाकून चांगलं उकळावं. पाणी आटून अर्ध होईपर्यंत उकळावं.

त्यानंतर हे पाणी गार करून थोडं थोडं दिवसभर त्याचं सेवन करावं. यामुळे त्रास कमी होऊन पोटाला आराम मिळेल.

बडीशेप- जुलाबातील त्रास कमी कऱण्यासाठी बडीशेपेचं सेवन करावं. यासाठी १ चमचा भाजलेल्या बडिशेपेमध्ये १ चमचा कच्ची बडिशेप मिसळावी आणि त्याचं सेवन करावं. दिवसातून २-३ वेळा या बडीशेपेचं सेवन केल्यास जुलाब कमी होण्यास मदत होईल तसंच पोटदुखीचा त्रासही कमी होईल.

नारळाचं पाणी- नारळाचं म्हणजेच शहाळाच्या पाण्यामुळे जुलाबांचा त्रास कमी होण्यास मदत होते. नारळाच्या पाण्यामध्ये असलेल्या पोटॅशियम आणि सोडियम सारख्या इलेक्ट्रोलाइट्समुळे शरीरातील इलेक्ट्रोलाइटचं संतुलन राखण्यास मदत होते.

नारळ पाण्यातील हे गुणधर्म जुलाबामुळे होणारं डिहायड्रेशन रोखण्यास मदत करतात तसचं रक्ताभिसरण योग्य होण्यास मदत होते.

या काही घरगुती उपायांसोबतच जुलाबामध्ये आराम मिळण्यासाठी हलका आहार घ्यावा. मूग डाळीची खिचडी किंवा दही भात असा हलका आहार घेतल्यास त्रास कमी होण्यास मदत होईल.

हे देखिल वाचा-

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed Cyber Fraud: विधवेची सरकारी मदत सायबर भामट्याने लांबवली; सिम कार्डाच्या सहाय्याने खाते केले लिंक

Latest Marathi News Live Update : निलेश घायवळच्या अडचणी वाढणार? आणखी एक गुन्हा दाखल होण्याची शक्यता...

Beed News: पेट्रोलमध्ये आढळले पाणी; बीड शहरातील पंपावर नागरिक झाले संतप्त

RSS 100 Years : सोलापुरात २२७० स्वयंसेवकांचे पथसंचलन; अनेक ठिकाणी पुष्पवृष्टी; राष्ट्रीय पंचसूत्रीची घोषणा

Pankaja Munde: पण, आमच्या लेकरांच्या ताटातले घेऊ नका;आरक्षणावरून पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांचे मत

SCROLL FOR NEXT