health tips of frozen shoulder hyperactive situation  Sakal
आरोग्य

तर काय?

शरीरात कुठेही जखडलेपण जाणवत असले तर त्याचे मूळ कारण वातदोषाचे असंतुलन हेच असते. सर्वप्रथम वातंसतुलनासाठी काम करणे गरजेचे आहे.

सकाळ वृत्तसेवा

प्रश्‍न १ : माझ्या पत्नीचा खांदा एकाएकी स्टिफ झाला आहे. डॉक्टरांनी फ्रोजन शेल्डर असे निदान केले आहे. औषधे घेतले की तात्पुरते बरे वाटते, परत त्रास सुरू होतो. तिला नीट झोपताही येत नाही. काहीही काम करताना खूप त्रास होतो. कृपया यावर उपाय सुचवावा.

...श्रीमंत मसूरकर, रत्नागिरी

उत्तर : शरीरात कुठेही जखडलेपण जाणवत असले तर त्याचे मूळ कारण वातदोषाचे असंतुलन हेच असते. सर्वप्रथम वातंसतुलनासाठी काम करणे गरजेचे आहे. यासाठी रोज न चुकता खांद्यावर संतुलन कुंडलिनी सिद्ध तेलासाखे तेल गोलाकार पद्धतीने लावण्याचा फायदा होऊ शकेल.

तेल हलक्या हाताने जिरवणे महत्त्वाचे असते. त्याचबरोबरीने पाठीच्या कण्याला व संपूर्ण पाठीला हलक्या हाताने खालून वर संतुलन कुंडलिनी सिद्ध तेलासारखे तेल नियमितपणे जिरवणे जास्त उत्तम.

दिवसातून एकदा संतुलन अभ्यंग सेसमी सिद्ध तेलासारखे तेलही खांद्यावर हलक्या हाताने नक्की लावावे. याचबरोबरीने संतुलन वातबल गोळ्या, दशमूळसॅन गोळ्या, दशमूलारिष्ट वगैरे वातशामक गोष्टी घेण्याचा फायदा होऊ शकेल. शरीरात अस्थिधातूचे पोषण व्यवस्थित होण्याच्या दृष्टीने अर्धा चमचा संतुलन प्रशांत चूर्णासारखे चूर्ण सकाळ संध्याकाळ तूप-साखरेबरोबर घेतल्याचा फायदा मिळू शकेल. शक्य असल्यास तज्ज्ञांचा सल्ला घेऊन शास्त्रोक्त पंचकर्म करून घेण्याचा अथवा एखाद्या आयुर्वेदिक थेरपीचा फायदा होऊ शकेल का,हेही बघायला हवे.

प्रश्‍न २ : माझा मुलगा हायपर ॲक्टिव्ह आहे. तो दोन वर्षांचा आहे. मध्यंतरी माझ्या मौत्रिणीने अमृतशर्करायुक्त पंचामृत द्यायला सांगितले. मी त्याला ते दिल्यावर त्याच्या वागणुकीत बराच फरक जाणवतो आहे.

पण डॉक्टरांनी त्याला साखर द्यायची नाही, असे सांगितलेले आहे. काय करावे हा संभ्रम आहे. त्याला पंचामृत मनापासून आवडते. त्याला पंचामृत द्यावे की नाही, याबद्दल मार्गदर्शन करावे....विशाखा नांगरे

उत्तर : पंचामृत हे खरे तर प्रत्येकासाठी उत्तमच असते. पंचामृत सहा महिन्यांच्या बाळापासून सर्वांना कमी-अधिक प्रमाणात सर्वांनाच घेता येते. त्यात असलेल्या तूप, दूध, साखर या गोष्टी मेंदूसाठी पोषक आहेत.

पंचामृतासारखी बनवायला अत्यंत सोपी, चवीला उत्तम अशी सात्त्विक आहारात मोडणारी दुसरी गोष्ट नाही. त्याला नियमितपणे अमृतशर्करायुक्त पंचामृत देणे सुरू ठेवावे. बरोबरीने वैद्यांच्या सल्ल्याने संतुलन ब्रह्मलीन घृत, संतुलन रिलॅक्स सिरप द्यायला तसेच टाळूवर ब्रह्मलीन तेल लावायला सुरू करायला हरकत नाही. त्याच्या रोजच्या आहारात रात्रभर भिजवलेले दोन बदाम, घरचे साजूक तूप यांचा समावेश असावा. प्यायचे पाणी सुवर्णसिद्ध असावे. पंचामृत व सुवर्णसिद्ध जलाची संपूर्ण माहिती मालविका तांबे यू-ट्यूब चॅनेलवर मिळू शकेल. तज्ज्ञांचे प्रत्यक्ष मार्गदर्शन घेऊन आयुर्वेदिक थेरपी सुरू करता येऊ शकतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Cricket in Trouble: पाकिस्तानला 'नाटक' महागात पडणार, ICC ने पाठवला ई मेल! PCB ने स्पर्धेचे अनेक नियम मोडले, आता...

Asia Cup 2025 Super 4 Schedule: भारतीय संघ कोणत्या तारखांना कोणाला भिडणार? जाणून घ्या सुपर ४ चं संपूर्ण वेळापत्रक

AFG vs SL Live: लक्ष्य १७० धावांचे, पण १०१ धावा करताच श्रीलंका पोहोचली Super 4 मध्ये; अफगाणिस्तानला लटकवले, कसे ते घ्या जाणून...

Adani Group News : अदानी समूहाला मोठा दिलासा; 'SEBI'ने 'हिंडेनबर्ग'चे आरोप फेटाळले!

Khadakwasla Dam : खडकवासला धरणातून ३१ तासांनी १२६३ क्युसेक विसर्ग सुरू

SCROLL FOR NEXT