Heart Attack Esakal
आरोग्य

Heart Attack : हृदयविकाराच्या झटक्याची 'ही' लक्षणं 95%महिलांमध्ये एका महिन्यांंधीच दिसतात..

आजच्या काळात हृदयविकाराचा झटका(Heart Attack) खूपच सामान्य झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

Heart Attack Symptoms: आजच्या काळात हृदयविकाराचा झटका(Heart Attack) खूपच सामान्य झाला आहे. तरुणांमध्येही हृदयविकाराचा झटका येण्याची समस्या दिसून येत आहे. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, बैठी जीवनशैली, शारीरिक हालचालींचा अभाव यामुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. हृदयविकाराच्या झटक्यादरम्यान, हृदयाच्या धमन्यांमध्ये रक्ताच्या गाठी तयार होतात आणि रक्त प्रवाह अचानक थांबतो. त्यामुळे हृदयाचे स्नायू कमकुवत होऊन हळूहळू काम करणे बंद करतात. याला मायोकार्डियल इन्फेक्शन (Myocardial infarction) म्हणतात.

ब्रिटिश हार्ट फाउंडेशन मते, पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये काही असामान्य लक्षणे दिसतात. जी महिलांमध्ये हृदयविकाराच्या झटक्याची (Heart Attack In Women) लक्षणं असू शकतात. म्हणूनच तज्ज्ञ सांगतात की, महिलांनी या लक्षणांची काळजी घेतली तर येणाऱ्या काळात जीवाला होणारा धोका टाळता येईल. जाणून घेऊयात महिलांमध्ये हृदयविकाराच्या सुरुवातीला कोणती लक्षणं जाणवतात. 

द मिररच्या मते अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनात असे म्हटले आहे की, मळमळणे हे देखील पुरुष आणि स्त्रियांच्या हृदयविकाराच्या झटक्याचे मुख्य लक्षण असू शकते. संशोधनात असे दिसून आले आहे की, हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणे असलेल्या 34 महिलांना मळमळ होते. तर 22 पुरुषांमध्ये मळमळण्याची लक्षणं जाणवली. 

हृदयविकाराचा झटकांची मुख्य लक्षणे.. 

1) जबडा, मान, पाठ, हात किंवा खांदे दुखणे हे हृदयविकाराच्या लक्षणांपैकी एक चेतावणीचे लक्षण आहे. 

2) हातांना मुंग्या येण्याची, सूज येण्याची अनेक कारणे असू शकतात. यामध्ये चुकीच्या स्थितीत झोपणे किंवा हातांचा अतिवापर करणे. 

3) संशोधनानुसार असे आढळून आले आहे की, एक किंवा दोन्ही हातांमध्ये अचानकपणे बधिरपणा जाणवणे हे हृदयविकाराचा झटक्याचे लक्षण असू शकते. 

हृदयविकाराचा झटकांची इतर लक्षणे.. 

ब्रिटीश हार्ट फाऊंडेसन महिलांमध्ये हृदयविकाराच्या झटक्याची इतर लक्षणं देखील दिसतात. जसे की, छातीत दुखणे, अस्वस्थता जाणवणे, छातीत दाब निर्माण होणे यांसारखी लक्षणे दिसतात.

हृदयविकाराचा झटका आल्यावर काय करावे?

हृदयविकाराचा झटका आल्यास, वैद्यकीय मदत घेण्यासाठी ताबडतोब रुग्णवाहिका बोलवावी. रुग्णवाहिकेची वाट पाहत असताना, एस्पिरिनची एक टॅब्लेट ( 300mg ) चघळणे आणि गिळणे. पण ही गोळी देण्याआधी हे, लक्षात ठेवा की हृदयविकाराचा झटका आलेल्या व्यक्तीला ऍस्पिरिनची ऍलर्जी नसावी. ऍस्पिरिन रक्त पातळ करण्यास मदत करून हृदयातील रक्त प्रवाह सुधारते.

हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी काही महत्त्वपुर्ण टिप्स..

1) हृदयविकाराचा झटका टाळण्यासाठी उत्तम निरोगी जीवनशैलीचे पालन करावे. 

2) ब्रिटिश हार्ट फाउंडेशनच्या मते, सकस आहार घेणे, शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असणे आणि आपल्या उंचीनुसार आपले वजन योग्य राखणे या हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत.

3) धूम्रपान टाळणे आणि अल्कोहोलचे सेवन कमी करणे 

यामुळे सुध्दा हृदयविकाराचा धोका कमी होऊ शकतो.

4) तसेच तुमचा रक्तदाब, कोलेस्टेरॉल आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवणे देखील महत्त्वाचे आहे.

टीप : वरील सर्व बाबी सकाळ फक्त माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. या बातमीतुन सकाळ कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Metro: पुणे मेट्रोचा विस्तार डोणजे, लोणीकंद ते खेड शिवापूरपर्यंत; प्रस्ताव मंजूर

Latest Marathi News: राज्यासह देशात कुठे काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर...

IPL 2026 Live: साई सुदर्शनने शतक झळकावले, RCBच्या नावावर नोंदवला गेला नकोसा विक्रम! GT ने उभे केले तगडे लक्ष्य

शिक्षण संचालकांचे आदेश! अतिरिक्त शिक्षकांच्या पगारीचा मार्ग मोकळा; शिक्षणाधिकारी, उपसंचालकांच्या लॉगिनमधून पगार बिले पाठविण्याचे आदेश, हा बदल एकदाच

Paytm Payments Bank: बँकिंग क्षेत्रात खळबळ! पेटीएम पेमेंट्स बँकेचा परवाना रद्द; आरबीआयकडून मोठी कारवाई, धक्कादायक कारण समोर

SCROLL FOR NEXT