Workout tips sakal
आरोग्य

Workout Tips रिकाम्यापोटी वर्कआऊट करावे का? जाणून घ्या फायदे व तोटे

रिकाम्यापोटी वर्कआऊट करावे की करू नये? यावरून तुमचाही गोंधळ उडतोय का, जाणून घ्या ही माहिती...

Harshada Shirsekar

सकाळच्या वेळेस व्यायाम केल्यानं शरीराला मोठ्या प्रमाणात फायदे मिळतात, असे म्हटले जाते. पण रिकाम्यापोटी वर्कआऊट करावे की करू नये? यावर वेगवेगळ्या प्रकारे चर्चा रंगताना दिसतात. ज्यामुळे फिटनेसप्रेमींचा गोंधळ उडताना दिसतो. वर्कआऊटपूर्वी नाश्ता करावा की करू नये? याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया…    

शारीरिक व मानसिक आरोग्य निरोगी ठेवायचं असेल तर व्यायाम करणं गरजेचं असते. नियमित व्यायाम केल्यास हृदय व रक्तवाहिन्याशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो, स्नायू मजबूत होतात, चयापचयाची क्रिया सुधारते, मूड फ्रेश राहतो यासह अनेक फायदे लाभतात. एकूणच संपूर्ण शरीराचे कार्य सुरळीतपणे सुरू राहते.

रिकाम्यापोटी वर्कआऊट करावे का?

रिकाम्या पोटी वर्कआऊट करण्याचा ट्रेंड सध्या फिटनेसप्रेमींमध्ये लोकप्रिय आहे. विशेषतः जी मंडळी जिममध्ये न जाता घरामध्येच व्यायाम करतात, ते लोक रिकाम्यापोटीच व्यायाम करण्यावर भर देतात.

यामुळे शरीरातील अतिरिक्त फॅट्स जलदगतीने कमी होण्यास तसंच शरीरातील इन्सुलिनची पातळी संतुलित राहण्यास मदत मिळते. रिकाम्यापोटी वर्कआऊट केल्यास फॅट्स झटपट बर्न होतात, असे म्हटलं जाते.

काय होऊ शकतात दुष्परिणाम?

काहीही न खाता व्यायाम केल्यानं शरीरात साठलेली अतिरिक्त चरबी झटपट कमी होण्यास मदत मिळते आणि यामुळे शरीराला ऊर्जेचा देखील पुरवठा होतो. महत्त्वाचे शरीरातील रक्तशर्करा देखील नियंत्रणात राहण्यास मदत मिळते.

पण जी मंडळी आधीपासून अशक्त आहेत, त्यांनी रिकाम्यापोटी कठीण स्वरुपातील व्यायाम करणे टाळावे. कारण यामुळे शारीरिक वेदना-दुखापती होऊ शकतात.   

  • रक्तातील साखरेची पातळी कमी झाल्यास चक्कर येणे

  • अशक्तपणा येणे

  • व्यायाम करताना बेशुद्ध होणे

  • एखादी शारीरिक दुखापत होणे 

 वर्कआऊट करण्यापूर्वी या गोष्टी ठेवा लक्षात

  • वर्कआऊट करण्यापूर्वी शरीर हायड्रेटेड असणं आवश्यक आहे. 

  • शरीरात पाण्याची कमतरता असल्यास चक्कर येणे, हृदयाचे ठोके वाढणे अशा समस्या उद्भवू शकतात. 

  • वर्कआऊटपूर्वी एखादे केळे किंवा सफरचंद खावे.

  • पोटभरून नाश्ता करणं टाळावे. 

  • आपल्या प्रशिक्षकाने दिलेल्या सल्ल्यांचे पालन करावे.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अकरावी प्रवेशाची उद्या पहिली गुणवत्ता यादी! विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर येणार मेसेज; १२.५१ लाख विद्यार्थ्यांची नोंदणी, प्रत्येक फेरीपूर्वी नावनोंदणीची संधी

Vaibhav Sooryavanshi ओपनर, सोबतीला कोण? IPL 2026 मधील अनकॅप्ड खेळाडूंची प्लेइंग इलेव्हन, तगड्या संघाला देईल टक्कर...

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातून वाहनधारकांसाठी दिलासादायक बातमी

Fishing Ban: मच्छीमारांसाठी महत्त्वाची बातमी! महाराष्ट्रात मासेमारी बंद राहणार; महायुती सरकारचा मोठा निर्णय

Loni Kalbhor Crime : बारावीच्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर अल्पवयीन मुलाकडून वारंवार अत्याचार; मुलाविरुद्ध गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT