Healthy Breakfast  esakal
आरोग्य

Healthy Breakfast : हेल्दी राहण्यासाठी खुद्द सद्गुरुंनी सांगितलं मेथीच्या दाण्यांचं महत्व, वाचा सविस्तर

सद्गुरुंनी सांगितले की स्प्राउट मूगसोबत ते स्प्राउट मेथीदाणेसुद्धा खातात

साक्षी राऊत

Healthy Breakfast : निरोगी राहण्यासाठी सकस आहार महत्वाचा असतो. योग्य आहार आपला अनेक आजारांपासून बचाव करतो. सद्गुरुंना निरोगी आयुष्याचा मंत्र चांगलाच ठाऊक आहे. त्यांच्या लेटेस्ट इंस्टाग्राम व्हिडीओमध्ये त्यांनी हेल्दी ब्रेकफास्टबाबत सांगितले आहे. सद्गुरुंनी सांगितले की स्प्राउट मूगसोबत ते स्प्राउट मेथीदाणेसुद्धा खातात. सोबतच त्यांनी याच्या फायद्यांबाबतही सांगितले. चला तर मेथी दाणे आणि मूगाचे आरोग्यदायी फायदे जाणून घेऊया.

नॅचरल ब्लड क्लिंझर

स्प्राउटेड मेथी हे एक नॅचरल ब्लड क्लिंझर आहे. जे शरीरातील रक्त शुद्ध करून शरीरात ऑक्सीजनचा फ्लो वाढवतात. सोबतच सगळे टॉक्झिक पदार्थ शरीराबाहेर काढण्यासही मदत करतात.

न्यूट्रिशनयुक्त मेथी दाणे

मधुमेहाच्या रूग्णांना रोज मेथी दाणे खाण्याचा सल्ला दिला जातो. मात्र हे दाणे प्रत्येकासाठी तेवढेच फायदेशीर आहेत. यात प्रोटीन, व्हिटॅमिन आणि मिनरल्सची चांगली मात्रा असते. जे आरोग्यासाठी फार फायदेशीर आहे.

केसांसाठी आणि त्वचेसाठी फायदेशीर

केसांना मेथीचे दाने लावण्याने केसगळती थांबते. तर मेथीचे दाणे रोज खाल्ल्यास स्किन आणि केस दोघांचेही आरोग्य चांगले राहते.

पचनशक्ती सुधारते

रोज सकाळी रिकाम्या पोटी मोड आलेली मेथी खाल्ल्यास पचनसंस्थेशी संबंधित समस्या दूर होतात. अॅसिडिटी, ब्लॉटिंग सारख्या समस्यांपासून तुम्हाला सुटका मिळते.

दूध पाजणाऱ्या मातांसाठी पोषक

बाळाला दूध पाजणाऱ्या मातांना मोड आलेले मेथीचे दाणे खाल्ल्याने फायदा होतो. (Lifestyle)

रक्तातील साखरेसाठी चांगले

रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी अंकुरलेले मेथीचे दाणे रोज खावेत.

कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करते

शरीरातील वाढते कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी मोड आलेले मेथीचे दाणेही खावेत. (Health)

मोड आलेली मेथी कशी खावी

सद्गुरु मोड आलेल्या मेथीचे दाणे आणि अंकुरित मूग खातात. मात्र, यावेळी मेथीदाण्यांचे प्रमाण एक ते दोन चमचे एवढेच ठेवावे. यापेक्षा जास्त प्रमाणात खाल्ल्यास पोटाच्या समस्या वाढतात आणि अपचनाची समस्या सुरू होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विराट कोहलीवर पाच कोटींचा आरोप करणाऱ्या फलाहारी महाराजांनी मागितली माफी, म्हणाले...

Mumbai Protest Faceoff : "काय करायचं ते करा!"; शिवाजी पार्कवर पोलिसांनी अडवताच अमित ठाकरे भडकले, पोलिसांनी घेतलं ताब्यात

३५ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीच्या शरीराचा सौदा, ठाण्यात हायप्रोफाईल देहविक्रीचे रॅकेट उघड; महिलेला रंगेहाथ अटक

Daily Horoscope: आजचे राशिभविष्य : मेषसह या राशींना व्यवसायात यश; काहींना अचानक धनलाभाची शक्यता

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT